Skip to main content

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

'रोगापेक्षा इलाज भयंकर'!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी मंगळवार, 05/12/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
'रोगापेक्षा इलाज भयंकर'! शिक्षण विभागाच्या विविध घोषणांनी शिक्षण क्षेत्र व्यथित झाले असल्याची ओरड सुरु असतानाच पुन्हा एका नव्या घोषेंनेनें प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. पटसंख्या कमी असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला असून, ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली, अशा शाळांवर आता बंदीचे गंडांतर येणार आहे. अर्थात, 'शाळा बंद' ऐवजी स्थलांतरित हा शब्द वापरून शासनाने निर्णयामागील त्रीव्रता कमी केली असली तरी. स्थलांतराचे नियम आणि अटींमध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील विध्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची श्यक्यता आहे.

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

लेखक स्वलिखित यांनी मंगळवार, 05/12/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाम अली साहब... सालगीराह मुबारक हो , तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये..

व्यथा

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 05/12/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे.

इस्लामची हिजरी कालगणना.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 05/12/2017 07:24 या दिवशी प्रकाशित केले.

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 05/12/2017 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर (आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. ) मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'. नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला. तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो....

दरस बिना..

लेखक समयांत यांनी मंगळवार, 05/12/2017 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक. दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे. शांतता आणि अस्वस्थता एकाच वेळी जाणवते अश्यावेळी, शांतता म्हणजे दुपारची काहिली संपणारी असते म्हणून, आणि अस्वस्थता यासाठी कि संधिप्रकाशाचा खेळ सुरु होणार काही वेळाने म्हणून. एक एक पळ युगासारखा भासतो, श्वासांचे स्पष्ट येणेजाणे दिसते, येणारा लौकर जातो पण जाणारा मात्र रेंगाळत राहतो.

स्टुडीओ अपार्टमेंट

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 04/12/2017 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई-वडिलांच्या मनाविरुद्ध हट्टाने हे स्टुडीयो अपार्टमेंट शेवटी घेतलच. वर्षभर इथे राहाते आहे भाड्याने. आता अगदी आपलसं वाटत. स्टुडीओ अपार्टमेंट ही इमारत शेवटून दुसरी; शेजारी एक बंगला आहे. तिथे कोणीच राहत नाही. दिवसभर माळी मामा आणि वॉचमन असतात. त्यांच्या समोरची दोन माजली इमारत पण बहुतेक रिकामीच आहे. माझ्यासारखं दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी रहात. पण बहुतेक सतत प्रवास वगैरे करत असेल. क्वचितच दिवा दिसतो त्या बाल्कनीत.... ते ही जेम-तेम संध्याकाळी. मग सगळच शांत. आई आली होती समजावायला. "विकत कशाला घेतेस? भाड्याने राहा. नोकरी बदललीस तर उगाच पैसे अडकतील. त्यात मोठी असली तरी एकच खोली. काय हा वेडेपणा!

||दत्त स्तुती ||

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 04/12/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग ||दत्त स्तुती || अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ || तीन शिरे सहा हात रूप तुझे हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१|| अनसूया माता पतीचरणी लीन चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२|| त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३|| भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५|| वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६|| औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर दर्शन देई भक्

मायबाप समुद्र

लेखक जागु यांनी सोमवार, 04/12/2017 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजावर अथांग पसरलेला, शंख, शिंपले-मोती, मासे, अनेक पाण वनस्पतींची जीवसृष्टी आपल्या उदरात पालन-पोषण करत सदा चैतन्यमय असणारा सागर ह्याबद्दल कितीही लिहिले तरी त्याच्या अफाट गुणवत्तेपुढे कमीच आहे. ह्याच्या अमर्याद आकाराप्रमाणेच ह्याच रूपही तितक्याच तोला-मोलाच. ह्याच्या रूपाला नूर चढतो तो सूर्यास्ताच्या सोहळ्याला. मावळतीचा सूर्य एखाद्या लावण्यवतीच्या कुंकवासारखा आकाशाच्या कपाळी लावण्यमय होतो. स्वतःच्या तेजोमय लाल-केशरी रंगाची तो आभाळात उधळण करत आपल्या सोनं किरणांनी सागराला सोनेरी करतो.