Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो
भाग १
आज बाबा हट्टालाच पेटले होते. मला माहीत आहे तुला कशात करीअर करायचे आहे ते, परंतू स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने आपल्या प्रदेशाचा, समाजाचा व त्यांचा विकास करणार्या यंत्रनांचा तुझा अभ्यास होइल. आणि इथे शहरापेक्षा तुझ्या मामाच्या गावी तुला ह्या गोष्टी जवळून अभ्यासता येतील. बाबा मागे हटायला तयार नव्हते. मला स्पर्धा परिक्षांबद्दल ओ का ठो माहीती नव्हती आणि तीच्या वाटेला जायचेही नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून बाबांना म्हटले, दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझे कॉलेज सुरू होइल तिकडे लावलेल्या क्लासची फी वाया जाईल.
मिसळपाव