Skip to main content

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

Published on शनीवार, 19/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
लेखनविषय:

याद्या 62548
Taxonomy upgrade extras

प्रेम

Published on शनीवार, 19/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3984

चारोळी

Published on शनीवार, 19/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
खरच तुझ्या आठवनिंना दुसरी कुठलीच तोड नाही ...... तुझ्या आठवण झऱ्यां इतकी तर साखरही गोड नाही !!!

याद्या 2184

संमेलनांना शुभेच्छा...

Published on शनीवार, 19/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आई सरस्वती आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मिसळपाव डॉट कॉम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा देत आहे.... आपला, (आंतरजालीय मराठी साहित्यिक) तात्या.

याद्या 4729

तुम्ही काय कराल....?

Published on शनीवार, 19/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
पेशवे बाजीराव तिसरे यांच्या "एकांत"कवितेवरून मनात एक विचार आला. खरेच माणसाला या धक्काधक्कीच्या जीवनात एक दिवस दिला आणि त्याला सांगितले तुला काही हवे ते तू कर... हा दिवस तुझा एकट्याचा. तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? तुमची राहिलेली कामे, इच्छा पुर्ण कराल? कि एकांत पणाचा कंटाळा येईल? मला अशावेळी वॉकमन मधून (इतरांना त्रास होऊ नये म्हणून) कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 12725

" निरंतर "

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो.. कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो.. बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे.. आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा.. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..
लेखनविषय:

याद्या 2237

" एकान्त "

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..
लेखनविषय:

याद्या 2628

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

Published on शुक्रवार, 18/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता? आज शुक्रवार आहे म्हणून काम नाही आणि त्यात हा नवा जॉब्...खूप बोर होतय म्हणून मी मिपा वर लोकांना सल्ले देत बसलेय. सगळे लेख आणि कविता वाचुन झाल्यात्..तुम्ही अशा मोकळ्या वेळात काय करता? मला काहीतरी आयडीया द्या ना.

याद्या 22900