मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" एकान्त "

पेशवे बाजीराव तिसरे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

वाचने 2628 वाचनखूण प्रतिक्रिया 1

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 23:32
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा.. या ओळी आवडल्या. असा एकांत आजच्या फास्ट लाइफ मध्ये मिळाला तर?...