भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात. तर सध्या,) भाऊंच्या ओळी जश्या आहेत तश्याच आपल्यासमोर (तुमच्यासमोर) ठेवत आहे. (आठवून लिहितो आहे, एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर लगेच कळवा. डॉ. बिरुटेंच्या सांगण्यावरून काही बदल केले आहेत).
जाणकारांना सांगण्याची गरज नाही तरीही एक सुचवू इच्छितो (आम्ही पडलो 'सल्लेखोर' स्वभावाचे!) गझल्/चारोळी वाचताना ह्याक्रमाने वाचाव्या- पहिल्या दोन ओळी सलग, मग पुन्हा त्याच ओळी, मग फक्त तिसरी ओळ दोनदा (इथे चौथ्या ओळीविषयी उत्सुकता ताणली गेली नसेल तर उसनी आणावी. अर्थात भाऊंच्या चारोळ्या ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाहीत) आणि शेवटी चौथी ओळ (एकदाच. ती कशाला दोनदा वाचायची?). हा प्रयोग खालच्या ओळी वाचताना करून पहा, मजा येईल वाचताना.
दोस्त हो,
पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे
पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले
वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले
पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा
माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे
वाचने
62526
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
मस्त गझल !!!
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सापडला.
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त गझल !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त
In reply to मस्त by शिवाजी होळगे
धन्यवाद
ही गझल वाटत नाही.
चंद्र
In reply to चंद्र by सुनील
भाऊसाहेबांची चंद्रावरची कविता... हीच का ती?
In reply to भाऊसाहेबांची चंद्रावरची कविता... हीच का ती? by अविनाश ओगले
बहुधा नाही
In reply to बहुधा नाही by सुनील
या ओळी आहेत का ?
In reply to या ओळी आहेत का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही
व्वा!!
In reply to व्वा!! by ऋषिकेश
हेच,
दोस्तहो मैफील आपुली
वा!
सांगेल
In reply to सांगेल by रिकामटेकडा
क्लास !!!!!!
खल्लास
शायर आणि सूर्य
जिंदादिल ...
छान!
In reply to छान! by अनंत छंदी
अहो मी केवळ वाचक
मला आवडलेली अजून एक
आवडते शेर
In reply to आवडते शेर by सुनील
काही माहीत नाही
In reply to आवडते शेर by सुनील
स्वप्न
मला आवडलेली अजून एक
भाउसाहेबांचा व्हिडिओ
भाऊसाहेब पाटणकर
भाउ साहेब म्ह णजे आराध्य दैवत
असा धोका दिला हाय ! तु आहे
सुपरलाईक!
भाऊसाहेबांचा एक मिश्कील शेर
भाऊसाहेब म्हणतात-
फार भारी! आधी वाचली होती तरी
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by लई भारी
प्रतिसाद
भुले बिसरे गीत. :)
मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब ?
In reply to मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब ? by चौकटराजा
मृत्यू
In reply to मृत्यू by कर्नलतपस्वी
जियो!
मस्तं धागा !
अरे यार.. :(
शायरी
In reply to शायरी by युगंधर
क्या बात!
तू नळीवर हे सापडले
विलक्षण धागा. रसिकांसाठी
मस्त...
एक बार.....अगं माय गं...! :)
In reply to एक बार.....अगं माय गं...! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा! मस्तं!
In reply to एक बार.....अगं माय गं...! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या वळणाचा शेर वाटला
In reply to या वळणाचा शेर वाटला by शुचि
अहाहा.....
काय नाव आहे भाउसाहेब
जिंदादिली हे नाव आहे गझल
In reply to जिंदादिली हे नाव आहे गझल by रुमानी
आहाहा नावही शोभेलसं आहे.
विशेष माहिती पूर्ण लेख ......
झकास
मस्त
झकास धागा.
In reply to झकास धागा. by चौथा कोनाडा
छान माहिती
सुन्दर