मनोपदेश भाग १ (E Book 221)
प्रिय वाचकहो,
'मनोपदेश - मनाचे श्लोक' या समर्थ रामदास स्वामींच्या अतुलनीय ग्रंथाच्या १० भागापैकी भाग १ची प्रस्तावना, फलश्रुती समाप्ती सादर करत आहे. श्लोक १ ते २० चा प्रत्येकी मराठी, हिंदी व इंग्रजीत जेमिनी विद्याधर यांनी केलेला अर्थ व भाष्य आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाडी ग्रंथ महर्षी, जसे की अगस्त्य, भृगु, अत्री आणि अन्य यांच्या दिव्य मार्गदर्शनाने प्रेरित होऊन, प्राचीन भारतीय ज्ञान आणि आध्यात्मिक विचारांचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली.
याद्या
1226
इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)
भाग १: इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी
भाग ३: इतिहास्यास्पद (३) स्वातंत्र्यदिनाचा व्याप (की ताप?)
पुरेसे प्रतिनिधी मिळाल्यावर कार्यक्रमाच्या तयारीसाठी गांधीजींनी सगळ्या व्याख्यात्यांची 'गोलमेज' परिषद आयोजित केली. मात्र यमसभेत मेज नसल्यामुळे ती नुसतीच 'गोल' परिषद झाली. त्यातून ‘परिषद’ ह्या शब्दाचा ज्या पक्षाशी संबंध असतो त्या पक्षाशी गांधीजींचा संबंध नसल्यामुळे त्यातून त्यांना मिळाला तो फक्त ‘गोल’! गांधीजींचा ‘ओन गोल’...
याद्या
924
पाउली पैंजणांचा मला भार आहे
पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..
शेजावरी स्वप्नकळ्यांचा
मूक शृंगार आहे
कुंकवाचा चंद्रमा
त्यालाही डाग आहे...
नजरेत भावनांचा
भरला बाजार आहे..
आरसा मनाचा
त्यालाही भेग आहे..
अंतरात श्वासांचा
खोल वार आहे..
सावल्यांच्या मिठीत
माझा संसार आहे...
पाउली पैंजणांचा
मला भार आहे..
रात्रीस चांदण्यांचा
अबोल दाह आहे..
-शब्दमेघ..एक मुक्त स्वैर स्वच्छंदी जीवन
(१९ ऑगस्ट २०२५)
(चार वर्षांनंतर पहिल्यांदा)
लेखनविषय:
याद्या
2516
काव्यरस
अनवधानातील गमतीजमती . . .
डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या.
याद्या
9727
स्वातंत्र्यदिन झाला, पण नागरीकांना स्वातंत्र्य आहे का?
आधी पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा हा रिपोर्ट पहा:
”पळून गेलेल्या बायकोसाठी आंदोलन… डीवायएसपीची पेकाटात लाथ! पोलिसांना असा अधिकार आहे का?“
जालनाचे पोलिस उपधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार्या नागरिकाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ज्या त्वेषाने लाथ मारली ते पाहून एक नागरीक म्हणून रक्त उसळले. त्या कुटुंबातील छोटी मुलगी पण आपल्या काकांना पोलीस धरून नेत असताना असाहाय्यपणे मागे जात असलेली दिसते. तिच्या समोरच कुलकर्णी यांनी हा प्रकार केला.
याद्या
5191
चांगल्या बातम्या - १
नमस्कार!
येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे.
आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा.
Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.
याद्या
6705
ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम
# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
__________________________________________
"प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?"
"भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !"
"ख्या ख्या ख्या "
"ख्या ख्या ख्या "
गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा !
तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच !
याद्या
8260
गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी
गीतारहस्य -प्रकरण८
( पान क्र. १०२-११८)
**विश्वाची उभारणी व संहारणी
सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.
प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.
याद्या
810
इतिहास्यास्पद (२) स्वातंत्र्यदिनाची तयारी
भाग १: स्वातंत्र्यदिनाची कल्पना
इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना
भाग २: स्वातंत्र्यदिनाची तयारी
स्वातंत्र्यदिन म्हणजे काय हे समजावण्यापासून जिथे तयारी आहे तिथे हे खायचं काम नव्हतं. पण यमदेवांना त्यावरही उपाय सुचला. त्यांनी गांधीजींवर ही जबाबदारी सोपवली.
याद्या
1694
मिसळपाव