Skip to main content

छायाचित्रे अशीही

Published on गुरुवार, 18/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
"डास, किडे, बुरशी अशा गोष्टींचे अतिसुंदर फोटो" असं म्हणून काही लिहायला सुरुवात केली तर पुढे वाचावं की नाही अशी शंकाच येईल नाही तुम्हाला. पण शंका न घेता खालील दुवा बघा. निसर्ग आपला चमत्कार कोणत्या स्वरुपात दाखवेल सांगता येत नाही. नायकोन कंपनीने आयोजित केलेल्या या छायाचित्र स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते सर्वच फोटो एका वेगळ्या सूक्ष्म दुनियेचे दर्शन घडवणारे आहेत. मिपा वर खूप चांगले छायाचित्रकार आणि दर्दी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत म्हणून हा दुवा आपणा सर्वांना द्यावासा वाटला. आवडेल अशी अपेक्षा आहे :) दुवा : http://www.nikonsmallworld.com/gallery/year/2010/1

याद्या 1872

दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमांवरील निर्बंध

Published on गुरुवार, 18/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3039

१५ करोड द्या, नाहीतर टाटा गुडबाय

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
१५ करोड म्हणजे तर खरेतर टाटा यांच्या हाताचा मळ. पैशांच्या गड्ड्या फेकून ते आपले इप्सित सध्या करू शकले असते. पण सामाजिक नीती मुल्ये जपत त्यांनी लाच देण्यास नकार दिला. आज बजाज यांनीदेखील त्याला सहमती दिली आणि 'हे करावेच लागते' असे सांगितले. टाटांसारख्या उद्योगपतींची ह्या देशातून अशी जर प्रतारणा होत असेल तर लवकरच हा देश कुठे रसातळाला जाईल हे सांगायला नको. बाकींच्या शेकडो भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांबद्दल न बोललेलेच बरे. Minister sought Rs.

याद्या 3086

मी पुरुष बिच्चारा

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा तरी
लेखनविषय:

याद्या 1847
काव्यरस