निशाणा..तुला दिसला ना..?
लेखनप्रकार
बिल्ला आणि नाग हे हिंदी सिनेमातले अवतार झाले.
जसे हिंदी पिच्चर आता सेन्सिबल निघतात, तसेच मराठी "चित्रपटांची" क्वालिटी भलतीच सुधारली आहे. क्वालिटी वॉल्स एकदम.
श्वास्..वळू..नटरंग..काय काय पाहतो आणि ऐकतो. सगळं नवलच..हाय टेक..
माझ्या कोवळ्या मनावर वाईट संस्कार होण्याच्या दिवसांत मराठी सिनेमे कसे झकास होते..
अं..अं..करणारा लक्ष्या..गावरान..
डॅम इट..करणारा महेश कोठारे..शहरी..
अशोक सराफ्..कशातही घाला त्याला व्यंजन म्हणून..अगदी कॉलेज बॉय म्हणूनही..
प्रिया अरुण गावाकडची मैना, म्हणून ती लक्ष्याची.
किशोरी शहाणे, निवेदिता वगैरे महेश कोठारेच्या..
उरेल ती अशोक सराफला..
आपल्या हिरॉईनीला बघितलं की तीन सेकंदात स्वप्न सुरु.
गाणी कध्धी कध्धी न विसरता येणारी..
"खेळ कुणाला दैवाचा कळला..तू असो..मे असो.हा असो.ही असो..कुणी असो.."
"मंगला गं मंगला..गं मंगला गं मंगला..तुझासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला.."
....
"साजणा" "दिवाणा" "ये ना" हे सर्वात पेट्ट शब्द..
रुपेरी वाळूत म्हणू नका, माडाच्या बनात म्हणू नका..
मनाच्या धुंदीत.. लहरीत ..मिठीत्..कुशीत..स्वप्नात ..मसणात..
उपरिनिर्दिष्ट सर्व स्थळी "ये ना.."
..अश्विनी ये ना..
..ये ना राणी तू ये ना..
ये ना सजणा ये ना..निशाणा तुला दिसला ना..
आणि हे सर्व कोल्हापूरच्या एखाद्या म्युनिसिपल गार्डन सदृश बागे मधे..
मागे कर्दळीची फुलं..लाल लाल..
हीरो हीरोइनचे ओठ एकामेकांजवळ आले की एकदम ही फुलं एकमेकांना चुंबतात..
घट्ट चटेरी पटेरी टी-शर्ट (जत्रा .आवाज..वगैरे दिवाळी अंकातला गुंड असला टी-शर्ट घालूनच जन्माला येतो.. !!) घातलेला अशोक सराफ आणि निवेदिता (आता ही देखील सराफच..!! व्याडेश्वरा रे.. !!) वगैरे एक हात "हेल मोगेम्बो" केल्याप्रमाणे वर करून एकामेकांपासून दूर दूर तिर तिर तिर तिर करत तिरक्या दिशेत पळत जातात..
असे ....म्हणजेच "नृत्ये : सुबल सरकार.."
वा..मोगेम्बो खुश हुआ..!!
मराठी सिनेमांची नावं आहाहाहा....
चल गम्मत करू..
टोपीवर टोपी..
धमाल बबल्या गणप्याची
थरथराट..
धडाकेबाज..
कमाल माझ्या बायकोची..
हळद रुसली कुंकू हसलं..
खट्याळ सासू नाठाळ सून ..
गंमत जंमत ..
दे दणादण..
हमाल दे धमाल..
....एकूण सगळी धमाल..आणि गोलमाल..!!
वाचने
29600
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by प्रमोद्_पुणे
अलका कुबल, दीपक शिर्के,
हॅ हॅ हॅ भन्नाट लिवलंय
In reply to हॅ हॅ हॅ भन्नाट लिवलंय by स्पा
अशी गाणी लागली कि.. "sound
In reply to हॅ हॅ हॅ भन्नाट लिवलंय by स्पा
भारी आयडिया आहे
हाण्ण तिच्यायला....
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
अलका कुबलवरुन...
In reply to अलका कुबलवरुन... by चिगो
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं!
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
>लक्ष्याचा ड्यान्स.. दोन्ही
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
हॅ,हॅ , हॅ ,हॅ
In reply to हॅ,हॅ , हॅ ,हॅ by चांगभलं
+१ असेच म्हणतो... लई बेकार
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
आणि लक्ष्याचा ड्यान्स..
In reply to हाण्ण तिच्यायला.... by धमाल मुलगा
माहेरची साडी हा एक अत्यंत
>>>>अशोक सराफ आणि निवेदिता
In reply to >>>>अशोक सराफ आणि निवेदिता by ढब्बू पैसा
अगदी अगदी.... १००%
मस्त मस्त ! मिपाच्या गगनात
In reply to मस्त मस्त ! मिपाच्या गगनात by परिकथेतील राजकुमार
+१
एकदम मस्त लिहिले आहे ...
न्हेमीपर्मानंच लै नंबरी
आणि जरा...
लेख मस्त.
अगदी अगदी. गावचा इनामदारही
हॅ हॅ हॅ मस्त धागा..
In reply to हॅ हॅ हॅ मस्त धागा.. by योगी९००
बरोबर आहे .. त्या काळानुसार
In reply to बरोबर आहे .. त्या काळानुसार by गणेशा
+ १
In reply to + १ by मेघवेडा
ऐस्याच बोल्ती मै
In reply to हॅ हॅ हॅ मस्त धागा.. by योगी९००
हसून मरायची वेळ
In reply to हॅ हॅ हॅ मस्त धागा.. by योगी९००
सुर्यकांत,चंद्रकांत यांच्या इतक्या मर्दानी भूमिकांना
हा हा हा !!
एक महत्वाचं राहिलं. लोलकातून
In reply to एक महत्वाचं राहिलं. लोलकातून by गवि
+१
अगदी अगदी. गावचा इनामदारही
मस्त धागा आणि अत्युच्च प्रतिसाद!!
भन्नाट लिहीले आहे!
आणि त्याच्याही पूर्वीच्या
झकास!
जबरदस्त लेख!
In reply to जबरदस्त लेख! by समीरसूर
समीर..
In reply to जबरदस्त लेख! by समीरसूर
पांढरी साडी असं सगळं
In reply to जबरदस्त लेख! by समीरसूर
भन्नाट
मस्त मस्त...
आठवणार्या काही व्हिलन
खल्लास....
जबरा धागा आहे. गगनविहारी,
एक नंबर... हसून हसून लोट्पोट
In reply to एक नंबर... हसून हसून लोट्पोट by सही रे सई
सहमत
In reply to सहमत by किसन शिंदे
बराच जुना धागा कोणीसा उत्खनन
हेल मोगेम्बो
जबराट....
लेख वाचनात आला नव्हता पण आता
आणि हे सर्व कोल्हापूरच्या
In reply to आणि हे सर्व कोल्हापूरच्या by मराठी_माणूस
शिक्षण झाले सारे शिवाजी
In reply to शिक्षण झाले सारे शिवाजी by गवि
शिक्षण झाले सारे शिवाजी
मस्त........!!!
जबरा!
हा हा हा
हृदयी वसंत फुलताना
In reply to हृदयी वसंत फुलताना by इरसाल
तो
In reply to तो by प्रचेतस
बाजीगर
In reply to बाजीगर by मस्त कलंदर
शांताराम बापूंचा नातू ना हा?
In reply to शांताराम बापूंचा नातू ना हा? by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो.
जबरा धागा आहे. धागा आणि
झकास
एक लंबर..
हा धागा पुन्हा वर काढतोय .................
मजा आली.
बरेच दिवसानी पुन्हा हसलो.
हॅहॅहॅ
खो खो ;);)