Skip to main content

खिचडी : दिवाळी निमित्त सहकाऱ्यांनी सादर केलेले एक छोटे नाटक.

Published on 23/11/2010 - 07:49 प्रकाशित मुखपृष्ठ
दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे. सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2390

विडा

Published on 23/11/2010 - 04:56 प्रकाशित मुखपृष्ठ
जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला.

याद्या 4767

प्रतिबिम्ब

Published on 22/11/2010 - 23:39 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे. माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात धीरोदात्तपणे प्रतिक्षा करत आहेत. हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले. जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो. आज इथे संतजन लोटले आहेत. एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत. त्यांचा आनंद ...
लेखनविषय:

याद्या 1292
काव्यरस

आज अचानक गाठ पडे....

Published on 22/11/2010 - 22:59 प्रकाशित मुखपृष्ठ
काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती. शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4082

कर्ण हा दानशूर होता, पराक्रमी होता पण त्याचावर खरच अन्याय झाला होता का ?

Published on 22/11/2010 - 20:45 प्रकाशित मुखपृष्ठ
मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची आई कून्ती कोणत्याही राज्याची राणी अथवा सून असताना झाला न्हवता,नीयोग क्रीया म्हणून तर नक्कीच न्हवे. मग केवळ कून्ती पूत्र म्हणून कर्ण हा पांडव अथवा एखाद्या राज्याचा वारस ठरतो काय ? कर्ण दानशूर होता, पराक्रमी होता म्हणून त्त्याने स्वतःचे राज्य बहूबळावर निर्माण करणे योग्यच आहे, त्या़स् क्षत्रिय न मानणे हे चूक आणी अन्यायकारकच.

याद्या 11945

म्हातारा

Published on 22/11/2010 - 19:43 प्रकाशित मुखपृष्ठ
अरुंधती ची म्हातारपणाची प्रार्थना वाचली आणि दै. सकाळ ४/४/२०१० मधे आलेली कविता देशोदेशीच्या सदरात कॉन्स्टंटाईन पी कवाफी या ग्रीक कवि ची म्हातारा ही कविता आठवली.
लेखनविषय:

याद्या 1626
काव्यरस

एलओएलझेड!

Published on 22/11/2010 - 18:08 प्रकाशित मुखपृष्ठ
मला पहिल्यांदा कळायचंच नाही. "एलओएल' आणि "एलओएलझेड' म्हणजे काय ते! मला वाटायचं, सॉफिस्टिकेटेड भाषेत शिवी देण्यासाठी "वायझेड' म्हणतात, तशीच काहितरी शिवी असावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3633

खाजकविता २ - दाढी , झुरळ आणि कविता...

Published on 22/11/2010 - 17:28 प्रकाशित मुखपृष्ठ
झुरळाने मिशा फेंदारुन एकदा कविता करायचे ठरवले.. बिळात बिळात मिशा टाकुन. नुसते विषय हुडकले.. त्याला विषय मिळाले खुप पण सुचली नाही कविता.. अहो,कविता फक्त करता येते.. दाढी खाजवता खाजवता.. एकदा झुरळाला कशीबशी एक कविता सुचली.. मिशामिशा फेंदारुन त्याने झुरळीसमोर वाचली.. झुरळी म्हणाली त्याला.. काय पण हुरळलाय गडी.. अहो...जरा सबुरीने... कविता केलीये..आता तुम्हाला फुटेल दाढी.. दाढीवालं झुरळ..म्हणताच.. झुरळ दचकलं जाम .. आपल्या मिशाच बर्या बुवा.. कविता करणे आपले नाही काम..
लेखनविषय:

याद्या 2357
काव्यरस

महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "

Published on 22/11/2010 - 17:04 प्रकाशित मुखपृष्ठ
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 अर्ध्या तासात वेरूळ आले सुद्धा ...... मला नुकतीच झोप लागली होती.... परत बस मधून उतरा.... तेसुद्धा १ च्या रणरणत्या उन्हात...... जीवावर आलं होत.... "पण" वेरूळ ला जाण्याचीच एवढी ओढ होती, कि बाकीचे त्रास त्यापुढे नगण्य वाटत होते..... एका मोठ्या "उद्यानासमोर" बस थांबली .......समोरच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या दिसत होत्या.... बघूनच मन "प्रसन्न" झालं.... आमच्या गाईड ची पीर पीर सुरु झाली . इथे एकूण ३४ लेण्या आहेत .

याद्या 10697