Skip to main content

झिंग थिंग..!!

Published on 24/11/2010 - 18:09 प्रकाशित मुखपृष्ठ
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे.. आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली .. पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!! संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली.. हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !! मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने.. गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!! कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला.. लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं.. त्याचा पुनर्जन्म झाला.. आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !! ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही.. लाईम अँड लेमोनी लिम्का..

याद्या 31082

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

Published on 24/11/2010 - 15:14 प्रकाशित मुखपृष्ठ
अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस. अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच!

याद्या 11398

जीव गुंतला ( चाल : खेळ मांडला )

Published on 24/11/2010 - 15:11 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे उसवला श्वास राजा संपला प्रवास तरी न्हाई प्राण सोडला ...

याद्या 1995
काव्यरस

माझिया केसानो!!

Published on 24/11/2010 - 12:03 प्रकाशित मुखपृष्ठ
"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे. अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली ) कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे. माझिया केसानो सरळ व्हा ना, माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा... तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो || माझिया केसां जरा चमक ना, माझिया केसां जरा चमक ना, घालवु कशी मी ही तुझी रूक्षता... टकलि न मी वाढतोस तू आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!...
लेखनविषय:

याद्या 1413

केस सरळ करावे की नाही?

Published on 24/11/2010 - 10:54 प्रकाशित मुखपृष्ठ
हेअर स्ट्रीटनिंग हा कुरल्या केसाना सरळ करण्याचा उपाय किती परिणामकारक असतो.. त्याने काही दुष्परिणाम होतात का..मी नेटवर बरीच माहिती वाचली पण मन द्विधा अवस्थेत आहे.. कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे आणि आता काहीतरी वेगळे करायचे आहे केसांचे.. सरळ करणे हा उपाय सुचवायचा नसल्यास कुरल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते सुचवा. आपल्यापैकी कुणी केले असल्यास तुमचे अनुभव पण सांगा.

याद्या 21613

इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स

Published on 24/11/2010 - 10:36 प्रकाशित मुखपृष्ठ
मित्रानो बाजारात रोज नवनवीन प्रॉडक्ट्स येत आहेत. आपणही येथे काही नवी उत्पादने तयार करायची आहेत. इथे त्यांची झैरात करायची आहे. एकच अट आहे ही प्रॉडक्ट्स इनोव्हेटिव्ह असायला हवीत. एखादे जुनेच प्रोडक्ट नव्या प्रकारे उपयोगात येऊ शकेल , एखादे प्रोडक्ट जुन्याच प्रॉडक्ट्चे नवे व्हर्शन असेल. तर एखादे अगदीच नवे असेल. त्या प्रॉडक्टचे फायदे इथे लिहायचे आहेत. प्रॉडक्टची झैरात करायची आहे. उदा: "पटापट" रीयूजेबल बबलगम. जगात प्रथमच रीयूजेबल बबलगम एकदाच खा महिनाभर वापरा. याचे फायदे महा बचत बबल गमचा खर्च किमान तीस पटीने कमी. दात पाडायच्या खर्चात १०० % बचत टूथपेस्ट च्या खर्चात बचत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1659

बिहार निवडणूक निकाल

Published on 24/11/2010 - 10:34 प्रकाशित मुखपृष्ठ
बिहार निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे घवघवीत यश. त्याबद्दल नीतिश कुमार यांचे अभिनंदन !!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9951

रक्षण

Published on 24/11/2010 - 10:12 प्रकाशित मुखपृष्ठ
डोळे मिटून मी आत डोकावतो तेव्हा मला एक वाघुळ दिसतं. तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये ते गरागरा फिरत असतं. बाहेरच्या प्रकाशाला अंधार नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं, गोंगाट असल्यावर काही नाही पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं.... सकाळी जेव्हा मी उठतो मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं, बाहेर सृष्टी सजत असते शब्दरहित पण नवनव्या ढंगानं. गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात आणि मूकपणे कळ्या उमलतात. तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो, गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो.... बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात मला एक मांजर दिसतं. कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून स्वतःचंच पोट चाटत असतं. बस यायच्या थोडंसं आधी, का कोण जाणे पण ते वळतं, टा
लेखनविषय:

याद्या 1232
काव्यरस