Skip to main content

केस सरळ करावे की नाही?

केस सरळ करावे की नाही?

Published on 24/11/2010 - 10:54 प्रकाशित मुखपृष्ठ
हेअर स्ट्रीटनिंग हा कुरल्या केसाना सरळ करण्याचा उपाय किती परिणामकारक असतो.. त्याने काही दुष्परिणाम होतात का..मी नेटवर बरीच माहिती वाचली पण मन द्विधा अवस्थेत आहे.. कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे आणि आता काहीतरी वेगळे करायचे आहे केसांचे.. सरळ करणे हा उपाय सुचवायचा नसल्यास कुरल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते सुचवा. आपल्यापैकी कुणी केले असल्यास तुमचे अनुभव पण सांगा.

याद्या 21613
प्रतिक्रिया 71
खाली आलेल्या सर्व प्रतिक्रिया वाचून तुम्ही एका गंभीर आणि वैश्विक समस्येला तोंड फोडले आहे याची जाणीव झाली. त्याबद्दल आपले अभिनंदन. शिवाय दर्जेदार व फुटकळ नसलेल्या धाग्यांअभावी मिपावर निर्माण झालेली पोकळी या धाग्याने भरून काढली या बद्दल आभार! कुठलेही केस सरळ वा कुरळे करून घेण्याचा वा देण्याचा वा झालेले पाहण्याचा अनुभव नसल्याने त्यावर मी काहीही मतप्रदर्शन करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.

In reply to by विजुभाऊ

हो ना मी पण ऐकले आहे की डोके पूर्ण टक्कल केले की नवीन ग्रोथ चांगली येते. पण ट्राइ करायची भीती वाटते.. आलेच नाही परत केस तर काय घ्या..

शक्यतो 'हेअर स्ट्रेटनिंग' ह्या भानगडीत पडु नका. एक तर ती प्रोसेस एकदाच करुन भागत नाही, दर महिन्याला केस वाढले की पुन्हा ते करावेच लागते, त्याचा दर वेळी ताप आहेच. शिवाय बर्‍याचदा ह्यामुळे केस गळतात. अजुन केसांच्या आरोग्याच्या दृष्तीने इतरही दुष्परिणाम आहेत. शक्यतो ह्या भानगडीत न पडलेले उत्तम :)

In reply to by छोटा डॉन

माझ्या इथल्याच एका मैत्रिणीने केस सरळ केले आहेत आणि (इ.स. २०१०च्या) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तिचे केस सरळच दिसत आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे काही रसायन लावून केस सरळ केले आहेत त्यामुळे नीट काळजी घेऊन केस धुतले की केस सरळच रहातात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. अर्थात केस वाढताना पूर्वी होते तसेच वाढणार आणि काही महिन्यांनी/वर्षांनी (केसांच्या लांबी आणि वाढीवर अवलंबून) केस पुन्हा कुरळे होतीलच. केसांचं गळणं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. तुम्हाला एवढाच कंटाळा आला असेल तर केस सरळ करून पहाच. पण त्याआधी सरळ केस कुरळे कसे करायचे आणि करावे का नाही याबाबत काही सल्ला मला द्या.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तर म्हणेन की चांगले आहे केस नॅचुरली सरळ आहेत ते! कुरळे केस मेण्टेन करणे खूप अवघड असते आणि मेण्टेन नाही केले की बिलकुल चांगले दिसत नाही. पण ते सर्व करायची तयारी असेल तर प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही..

In reply to by रमणरमा

केस मेण्टेन करण्यासाठी मला खास कष्ट करावे लागत नाहीत. आता केस गळण्याचं प्रमाण अंमळ जास्त आहे त्याचा दोष मी पुण्याच्या पाण्याला लावून मोकळी होते, त्यामुळे ती ही चिंता नाही. रमणरमाजी, पुण्याचा उल्लेख तुमच्या धाग्यात केला आहे, आता धागा हिट व्हायला पाहिजे. नाही झाला, तर पुण्याच्या पाण्यातच दोष आहे ही माझी थिअरी सिद्ध होईल. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या सहजासहजी त्याने आपला गुण सोडला तर काय बिशाद! चालायचेच.. काही दिवसाणी तुम्ही केस गळले तरी चालतील पण मला पुण्यातच राहायचे आहे असे म्हणाल :) ( ही लव्हज मी ही लव्हज मी नॉट च्या चालीवर धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )

In reply to by रमणरमा

धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )
हे म्हणतांना डोक्यावरचा एक एक केस उपटा म्हणजे केस सरळ करावे की नाही हा प्रश्न पडणार नाही!

In reply to by छोटा डॉन

डानराव हे केसांच्या बाततीतले तज्ञ मानले जातात. माझी केस सध्या काहिशी गॉन केस आहे. पण माझ्या आणि डॉनरावांच्या बाबतीत दोन साम्य स्थळे आहेत. १) आम्ही दोघे ही सहा महिन्यातून एकदा न्हाव्या ला भेट देतो २) आमचे केस कापण हे प्रत्येक न्हाव्याला आव्हानात्मक वाटते

केसाविषयी सर्व शंका डॉनराव यांच्याकडे विचाराव्या.

In reply to by नितिन थत्ते

डॉनरावांचे ऐकु नये, त्यांच्या केसांपेक्षा जावळीचे(पुर्वीचे) जंगल बरे अशी वदंता आहे.

हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार असतात परमनंट स्ट्रेटनिंग आणि आय्रनिंग परमनंट (?)स्ट्रेटनिंग जर योग्य काळजी घेतली तर जास्तित जास्त ४-५ महिने टिकत. आय्रनिंग मॅक्झिमम २-३ दिवस टिकत. पण दोन्हिमुळे केस खुप प्रमाणात गळतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पॉईंट टू बी नोटेड रमा ताई... याचाच अर्थ, या महिला आपल्याला इतका वेळ चूकीचा सल्ला देऊन आपली दिशाभूल करत होत्या. वेळीच सावध व्हा आणि डॉन्रावांचे ऐका.. :)

In reply to by स्वानन्द

आता एक कौल टाकते ... १. डॉनरावांचा सल्ला ऐकावा २. महिला मंडळाचे ऐकावे ३. डॉनरावांचे ऐकल्यासारखे दाखवून महिला मंडळाने सांगितलेले करावे ४. महिला मंडळाचे ऐकल्यासारखे दाखवून डॉनरावांचा सल्ला वापरावा. अरे हाकानाका :)

In reply to by रमणरमा

अरे ध्यानप्रेमी स्वानंद, माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत, माझे केस गळतात. माझ्या मैत्रिणीचे केस नैसर्गिकरित्या कुरळे आहेत, तिने ते सरळ करवून घेतले आहेत आणि तिचे केस गळणं एवढं होऊनही वाढलेलं नाही. रमणरमाजी, तुम्ही या पोरग्यांकडे लक्ष देऊ नका; 'पाशवी' शक्तींचा विजय असो, विजय असो, विजय असो.

केसांची निगा कशी राखावी याबद्दल नंदनचे मत ऐकायला आवडेल. @ अदिती, पॅराशूट्चं कसलं तरी 'थेरपी' नावाचं चंदेरी रंगाच्या बाटलीतलं तेल वापरून पाहिलं. केस गळायचे पुष्कळच कमी आलेयत माझे.

In reply to by मस्त कलंदर

नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका देतो असं आमचं मत हो! ;-) मके, खुलाशाबद्दल धन्यवाद. ते ही वापरून पहाते, पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ते तर आहेच. भल्याभल्यांचे हातपाय गळतात. केस तर मामुली गोष्ट आहे. गळाले तर त्यात काय विशेष?

In reply to by स्वानन्द

केसांना मामुली म्हणतोस? अरे इथे एक आख्खा धागा निघालाय त्यावर आणि म्हणे मामूली! याला कोणीतरी पाशवी शक्तींचा हिसका दाखवलाच पाहिजे!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ... एकच धागा ना... पुण्याच्या पाण्यावर तर धागेच धागे निघतात... त्यापुढे हा असा एखादा केस... सॉरी धागा म्हणजे काहीच नाही. बाकी सत्त्व गुणांपुढे पाशवी शक्तींना नमते घ्यावेच लागेल. इतिहासच आहे तसा. :) ( उदाहरणादाखल : शक्तीमान विरुद्ध किल्विष ) हा हा हा.... सत्वगुणी ( स्वानन्द )

In reply to by मस्त कलंदर

नंदनला उगाच मध्ये आणु नका!! त्याची 'केस'च वेगळी आहे, त्याच्या डोस्क्याला आख्ख्या मराठी जालविश्वाचा ताप आहे.

माझ्या एका मैत्रिणिने केस सरळ करून घेतले आहेत. तिचे जरा अतिच कुरळे केस होते. केसात कंगवा तरी जात असेल की नाही असे वाटण्याइतपत कुरळे. आता सरळ केल्यावर छान दिसतात तिचे केस. केस गळतात असे तिच्याकडून अजूनतरी ऐकले नाही. आणि एकदा केले की २-३ महिने ते छान रहातात. (नक्की किती महिने ते तिला विचारून सांगते). ही मैत्रीण यूसमधे रहाते. भारतात केस सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये नक्की किती काळजी घेतात , काय काय वापरतात ते मला माहित नाही . तरीही आपण एकदा ट्राय करुन पहावे आणि चांगल्या पार्लरमधून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केस सरळ करून घ्यावेत .

केस सरळ करून घेण्याबद्दल महिला मंडळाने दाखव्लेल्या उत्सहाबद्द्ल धन्यवाद! आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!! मूजीक > न न ना ना नाना न न ना ना नाना / मूजीक> माझे केस सरळ करणार :)

In reply to by रमणरमा

आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!! तसे असेल तर , केल्या नंतर "बिफोर" / "आफ्टर" छापाचे फोटु पण डकवा या धाग्यावर...

या लेखातील केसांसंबंधी विचारलेला प्रश्न पाहुन आमच्या डोक्यात एक भयानक जोक आला आहे.. पण सध्या तो मोह आवरता घेतो. (इच्छुकांनी व्यनि करावा!)

In reply to by शिल्पा ब

शिल्पा आणि रमणमणा ताई... __/\__ तो ज्योक मी तुम्हाला सांगितला तर माझी इमेज डगाळाली जाऊन मला सदस्यत्त्वाचा राजीनामा द्यवा लागेल.. ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

रमणमणा =)) =)) इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! =)) =))

In reply to by पैसा

त्यांच सदस्यनाम उच्चरायला इतकं कॉमप्लीकेटेड आहे की नीटपणे रिकॉलच झालं नाही.. शेवटी जसं आठवलं तसं लिहिलं! असो. मिपावरवचे भाषाशास्त्रज्ञ यावर अधिक प्रकाश टाकु शकतील. _ इंटेश.

In reply to by इंटरनेटस्नेही

फिंटेश मिपावरच्या भाषाशास्त्रज्ञ ना काय विचारतोस..मी सांगते ना... रमणरमा माझ युजर नेम आहे.. रमा हे खर खर नाव आहे.. त्याच उलट केल की मार होत... हे हे हे ( समझदार को इशारा काफ़ि होता है ) आणि हो फिंटेश मुद्दाम लिहल आहे. फिटटम फाट झाली आता.

In reply to by मेघवेडा

इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! लोल्स! :) पण क्रिएटीव्हीटे लै भारी आहे तुमची.. !

झाले ? ;) (" केस कुरळे होणे" हा एक पुण्यातला वाक्प्रचार आहे?) कुरळ्या केसांवर काहीही उपाय नाही हे सत्य गेल्या ३० वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे. सरळ केसांचे मित्र "तुझं बरं आहे, काही मेंटेनन्स नाही " असं म्हणून उलट वरती मीठ चोळतात.. केस ट्रीम करताना त्यांच्या पहिल्या "टर्नींग पॉईटच्या" च्या जवळच कापणं आणि ते वारंवार करत रहाणं हाच एक उपाय आहे. नसतात काही गोष्टी नशिबात सोडून द्या. :)

रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे अतोनात कुरळे केस सरळ करून घेतले त्याला निदान सहा वर्षे तरी झालीत. तशी कोणतीच तक्रार नाही. सहावर्षापूर्वी तिने पाच हजार कि असेच कितीतरी पैसे मोजले होते.

देवाने जे न्याचरलि दिलय ...त्यात कहितरि तथ्य असावे ... माझे स्वत:चे केस बिल्डिन्गच्या प्लानच्या काग्दान सारखे आहेत. कितिदहि सरळ केले तरि त्यान्चि आपलि सुरळी होतेच. त्यामुळे वैताग आला कि मी हेअर श्टाइल बदलतो... :)