मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाडका रजनी

वेताळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचा आवडता लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड आज ६१ वर्षाचा झाला(मला अजुन आश्चर्य वाटते).त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व रजनी फॅन्सकडुन त्याचे हार्दिक अभिनंदन.त्याने नुकताच एश्वर्या रॉय सोबत रोबोट हा विक्रमी उत्पन्न मिळवुन देणारा चित्रपट केला आहे.भविष्यात तो अजुनही जोमाने नवे मनोरंजक चित्रपट सर्वाना देईल अशी मी आशा करतो. परत एकदा रजनी चे अभिनंदन.

भट्के कुत्रे आणि आरोग्य

जयेश माधव ·
भटक्या कुत्र्या॑मुळे आरोग्याची समस्या दिवसे॑दिवस बिकट होत चालली आहे.कोर्ट अश्या कुत्र्या॑ना मारण्याची परवानगी देत नाही आणि सरकार कि॑वा महानगर पालिका त्या॑चा ब॑दोबस्त करण्यास असमर्थ आहे मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने करावे काय??... मु॑बई महानगर पालीकेच्या आकडेवारी प्रमाणे मागील ५ वर्षात २.८४ लोका॑चा भटक्या कुत्र्या॑नी चावा घेतला आहे तर फक्त २००९ या वर्षी ७७००० हजार लोका॑ना चावा आणि १८ लोका॑चा म्रुत्यू झाला आहे.अशी ही परीस्थीती चि॑ताजनक नाही का?

ती का पडली...

५० फक्त ·
लेखनप्रकार
ती का पडली... आज दुपारी दुरदर्शनच्या असंख्य चॆनल पॆकी एकावर तो चित्रपट लागला होता. खरंतर त्याच वेळी दुसरी कडे हरे रामा हरे क्रुष्णा लागला होता, पण स्त्रीहट्टापुढे (स्वस्त्री, परस्त्री नव्हे) नाईलाज झाल्याने तो चित्रपट पाहात होतो. त्यातच या अतिशय महत्वाच्या सीननंतर माझ्या ४ वर्षाच्या मुलानं वरील प्रष्ण विचारला. ती का पडली ? त्या संपुर्ण चित्रपटाला कलाटणी देणारा असा प्रसंग,माझी बायको अतिशय गुंग झालेली आणि अचानक हा प्रश्ण, ती का पडली ? बायकोचाच एकदमच मुड्च गेलाच होच. या चित्रपटाविषय़ी माझे व बायकोची स्वतंत्र व टोकाची व भिन्न (नेहमीप्रमाणे) मते आहेत.

सायना ही नं. १ झाली. Saina Is No. 1

चिंतामणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सायना नेहवाल हॉंगकॉंग सुपर सिरीज विजेती चीनच्या सिक्‍झिअन वॉनला 15-21, 21-17, 21-17 ने हरविले वर्षभरातील तिसरे सुपर सिरीज विजेतेपद Now Saina Is No. 1 समस्त भारतीयांना, विषेशतः महीला वर्गाला अभिमान वाटेल अशी बातमी बातमी आहे ही. सायनाचे अभीनंदन.

आसवे तो हुंदका टाळुन गेली..............

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
आसवे तो हुंदका टाळुन गेली पापणीला सारखी जाळुन गेली जागली जी रात्र माझ्या लोचनी ती फसवीण्याचा वायदा पाळुन गेली मी जरा केला उभा माणूस मनीचा "जात" आली आडवी चाळुन गेली स्वप्न माझे कागदी हळुवार इतके कातरिची धार ओशाळुन गेली फासले असेल ही काळे - त्या माणसांनी "ती" तरी कधी- हा चेहरा कुरवाळुन गेली ? रंगला तो सावळा भजनात ऐसा मृदुंगाला थाप गोंजारून गेली उपोषणाने ही जीव जात नाही सिध्धिच तपला कंटाळुन गेली तो गुन्हा होता जरासा लाघवी "चूक" ती......

सामाजीक सवयी

शैलेन्द्र ·
मिपावरील नुकत्याच उडालेल्या एका धाग्यावरिल एका प्रतिक्रीयेने एका झटक्यात मी १२-१५ वर्ष मागे गेलो, बुद्धीमत्ता वगैरे सोडा पण वेगवेगळ्या सामाजीक/भौगोलीक परिस्थीतील लोक किमान मागील पीढीपर्यंत तरी काही सवयी, गुण/अवगुन बाळगुन होते हे मान्य करायला हवे. बी एस्सीला असताना, कोकणात शैक्षणीक सहलीनिमीत्त आमचा सगळा वर्ग गेला होता. दापोली कृषी विद्यापीठ बघुन झाल्यावर केशवराजला गेलो. परत येता येता सपाटुन भुक लागलेली. खाली वाडीत मस्त जेवण झाले आणी आमच्या एका मित्राने ताटातच हात धुतले. यजमानांच्या चेहर्‍यावरची नाराजी सहज वाचता येत होती.

सायबानू मीच त्यो .... भाग १

स्पा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक उदास संध्याकाळ "नागरगोजे" गावावर उतरू लागली होती, गेल्या पंधरवड्यात अशा काही घटना तिथे घडल्या होत्या कि ते छोटंसं गाव चांगलंच हादरून गेलं होतं. "नागरगोजे" सोलापूर-बीड महामार्गावरील तालुक्याच एक ठिकाण . तालुक्याचं असलं तरी मुळ गाव लहानच, फक्त "उसाची मोठी बाजारपेठ" आणि "कोर्ट" यामुळे बऱ्यापैकी गजबजलेलं. त्या भागातली जमीन "अफाट सुपीक" मुख्य पिक हे "ऊस" . गावाच्या आजूबाजूला आता हळूहळू उसाचे कारखाने उघडू घातलेले होते.गावापेक्षा गावाबाहेरच्या लोकांचीच गावात गर्दी जास्त .. यामुळे एकदा संध्याकाळ होऊन सगळी लोक आपापल्या मुक्कामी परतली .. गाव परत चिडीचूप....

युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी

पाषाणभेद ·
काव्यरस
युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो: आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ|| ती: नको नको आता नको, माझा बा आनल काठी तो: नको तू अशी दुर पळू नको नको तू अशी दुर राहू नको दोन प्रेमाच्या फुलामधी तिसरा भुंगा तू आनू नको ती: असं नको करू, जवळ नको येवू माझा भाऊ लागलं आपल्या पाठी तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१|| तो: ते बघ तुला दिसतंय काय ती: काय? तो: अगं, ते बघ तुला दिसतंय काय एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय ते बघ...