मिपावरील नुकत्याच उडालेल्या एका धाग्यावरिल एका प्रतिक्रीयेने एका झटक्यात मी १२-१५ वर्ष मागे गेलो, बुद्धीमत्ता वगैरे सोडा पण वेगवेगळ्या सामाजीक/भौगोलीक परिस्थीतील लोक किमान मागील पीढीपर्यंत तरी काही सवयी, गुण/अवगुन बाळगुन होते हे मान्य करायला हवे.
बी एस्सीला असताना, कोकणात शैक्षणीक सहलीनिमीत्त आमचा सगळा वर्ग गेला होता. दापोली कृषी विद्यापीठ बघुन झाल्यावर केशवराजला गेलो. परत येता येता सपाटुन भुक लागलेली. खाली वाडीत मस्त जेवण झाले आणी आमच्या एका मित्राने ताटातच हात धुतले. यजमानांच्या चेहर्यावरची नाराजी सहज वाचता येत होती.