शाळेत असतांना ज्या कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे
१] देवी दयावती दवडसि दासाची दु:खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत
२] कुरुकटकासि पहाता,
तो उत्तर बाळ गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि,
बालिश बहु बायकांत बडबडला !
मोरोपंत
लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर ( विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ) ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच.
अमेरीकेला मत दिले आहे