मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे खोलपण असेच उथळ उथळ

फ्रॅक्चर बंड्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्यात खोलवर पोहचायचे सगळेच दरवाजे बंद, सगळ्याच वाटा बंद, पण माझा कोश आणि मी दोघेही वाट बघतोय, माझ्या माणसांची ... तुम्हाला सापडेल अशी एखादी चोरवाट, अतिशय खोल जाणारी अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत... पण हो मनापासून मला भेटायची ओढ, माझ्यापर्यंत पोहोचायची इच्छा असणाऱ्यासाठीच, अशा चोरवाटा, "जाणून बुजून ठेवलेल्या चोरवाटा !!!" वरून जरी वाटत असेल "मी" उथळ पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण कारण माझे खोलपण असेच फसवे अन उथळ उथळ...

वाचने 1240 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रकाश१११ 27/12/2010 - 14:08
माझ्यात खोलवर पोहचायचे सगळेच दरवाजे बंद, सगळ्याच वाटा बंद, पण माझा कोश आणि मी दोघेही वाट बघतोय, माझ्या माणसांची . आवडले.लिहित राहा .