आपण सर्वांनी मागच्या जन्मी काहीतरी फार मोठी पुण्यकर्मे केली आहेत, म्हणुन या खवय्यांच्या स्वर्गात, हिंदुस्थानांत जन्मलो आहोत. इथलं प्रत्येक गाव, प्रत्येक घर या स्वर्गाचं एक एक दालन आहे. त्यामुळं भेदभाव तो कसा करावा हे कळत नाही.
हर्षद.
'इतर' मध्ये टाकलेच आहे ना. :)
मुंबईच्या प्रसिद्ध (?) खाद्यसंस्कृतीबद्दल जास्त माहीत नाही(वडापाव सोडून) त्यामुळे मुंबईचा उल्लेख टाकला नाही. त्याबद्दल क्षमस्व. :)
१०० % सहमत
बाकी खवय्यांचा स्वर्ग म्हणजे दुबईतील करामा आणि डेरा (हि भारतीय बहुल भागांची नवे आहेत .)
येथे भारतातील प्रसिध्द उपहारगृह हजेरी लावून आहेत .
.मुंबईला इतर मध्ये समाविष्ट करतात हा नवीन जावई शोध आहे .
बाकी मला वाटते धागाच्या मालकाने अजून जीवाची मुंबई केलेली दिसत नाही .
एक शंका : जाज्वल्य याचा अर्थ जळाऊ असा होतो का?
पुण्यातले मार्जोरीन चे सॅन्डवीच , ब्ल्यू नाईलची तंदूरी चिकन , एकदा खाऊन बघा.
बाकी स पेठे तल्या एस पी ज ची बिर्यानी एकदम बकवास. तिरंगाची बिर्यानी तेलकट असते.
'व्यक्ती तितक्या प्रकृती' या न्यायाने, आणि खाण्यालायक असे इतके विविध प्रकार जगभर इतक्या ठिकाणी विखुरलेले असताना, खवय्याचा एकच असा स्वर्ग जगात कोठेही असू शकणे केवळ अशक्य आहे.
'इतर' या पर्यायास मत दिले आहे.
ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं काय मिळत नाही?
आमच्या लाडक्या मुंबईचा समावेश न केल्याबद्दल धागाकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)
जे गरीबातल्या गरीबाच माणसाचं अन्न आहे त्या वडापावला मुंबईची संस्कृती नाही म्हणायच तर काय म्हणायच?
आवांतर : हल्ली मॉल मध्ये मिळणारा बर्गर सदृष्य वडापाव पाहीला की कीव येत.
वल्ली साहेब एकदा मुंबईच्या खाऊगल्लीला भेट द्याच.
पुणे ला मत दिले आहे.
कारण ..
चितळेंकडची बाकरवडी,
मुंजोबाच्या बोळातल्या बेडेकरची मिसळ,
विश्रामबागवाड्याजवळची श्री उपहारगृहाची मिसळ,
तुळशीबागेतल्या श्री दत्त उपहारगृहाची मिसळ, भजी,
डेक्कनवरच्या आप्पाची काकडी खिचडी,
दिपाली-रुपालीतले सगळे दाक्षिणात्य पदार्थ,
फर्ग्युसन रोडवरच्या 'हॉर्न ओके प्लीज'मधले आणि गणेशनगरच्या अभिरुचीमधले सगळे पंजाबी पदार्थ,
मेहेंदळे गॅरेजजवळच्या 'स्विकार' ची, पूना बोर्डींग हाऊसची रविवारची थाळी
'स्विकार' शेजारच्या 'निसर्ग'मधले मासे आणि खेकड्यांचे सगळे पदार्थ
दोस्तहो तुर्तास इतकंच खाऊन पहा त्यावर नळस्टॉप चौकातल्या 'शौकीन'मधलं कुठलंही पान खाऊन बघा न् मग स्वर्गाची भाषा करा.
शौकिन...
नाना, आयॅम स्वारी! पण शौकीननं निव्वळ भ्रमनिरास केला.
अरे, पान खायचं तर ते कसं एकदम सणसणीत लावलेलं हवं..उगं चाकलेटपान अन गुलकंद पानमध्ये काय मजा?
शौकिनवाल्याकडं एकसोबीस-तीनसो घ्या, नायतर फुलचंद घ्या! भट्टी बिघडलेलीच. अहो, 'सादा पान' सुध्दा गडबड! कात-चुना, कतरी-केसरी सुपारी, किंऽचित थंडक, एक वेलदोडा, एक लवंग जाळून... आता हे काय लै लै अवघड आहे काय? पण नाय...तेही गंडिवलंच पठ्यानं!
पानासाठी शौकिनांनी शौकिन टाळणं हे बरं. आमच्या एका दोस्ताच्या भाषेत 'पच्च...(आपल्या विजारीवर शिंतोडे उडू नये म्हणून कसरत आपणच करायची!) ह्यॉ:! तिकडॉ क्कॉय पॉन मिळ्टं कॉ? ऑयलॉ...णिव्वॉळ जनॉनॉ पॉन डेटॉट रँऽऽ.... पच्च.....' :D
शौकीनपेक्षा भांडाकरकर रस्त्यावरचं रविराजचं पान झक्कास. झालंच तर, बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुतीसमोरच्या टपरीवरही ब्येस पान बांधतो. आणि आकुर्डीला रत्नलोक हाटिलाच्या कंपाउडमधल्या टपरीवरही भारी पान लावतो .
अगदी अगदी! आज धमालरावांशी सहमत व्हावं लागलं! :-)
ज्याला सणसणीत पान खायचंय त्याने "झगामगा मला बघा" टाईप दुकानात जाण्यात काय हशील??
१. बाजीराव रस्त्यावर "जगन्नाथ पान" आहे. झकास्स!!
२. आणि कोथरुडमध्ये शिवाजी महाराज पुतळ्यापाशी कुमारची पानाची टपरी!
पान खाऊन जीव हलका होणे म्हणजे काय ते इथे नक्की समजणार!! :-)
बाकी खाद्यपदार्थांवर आख्खा लेखच टाकलाय मी आज!! पुण्यक्षेत्री सुखी आहोत!!!
--असुर
त्यापेक्षा सीटी प्राईड कोथरूड कॉर्नरवर टपरीवर कलकता साधा पान मागा, एक्दम ढींच्याक मीळतं, तंबखू नसून सूध्दा तो साध पान अस्ले राप्चीक बनवतो की बस चघळतच रहावे.. पून्ह दूसरीकडे साधं पान खानारच नाय तूम्ही...
साल्याहो एक्दा कल्याण शीळ रोडवरच्या शालू बारची गावठी कोंबडी हाणून पाहा आणि मग सांगा इतर मिजाशी. >>>
कधी येऊ ?
सुहास
आमच्या फुकटच्या खाण्याला प्रांत, धर्म , जात , वर्ण , वश बघीतल्या जात नाहीत. डुकराहार वर्ज्य !!
वरील सर्व ला मत दिले आहे.
भारतात प्रत्येक प्रदेशाची, शहराची खासियत असतेच.
मला खाणं या प्रकारात इंटरेस्ट आहे पण बाहेर फारसं खाल्लं जात नाही हेही खरं.
आई घरी सगळे पदार्थ करायचीच पण तरी बाहेर खाण्यासाठी विचारल्यास," काय मेले भिकेचे डोहाळे!"
असं ऐकावं लागायचं. दोन्ही आज्ज्या तर बाहेर खाण्याच्या विरूद्ध असल्याने 'जे काय खायचं असेल ते घरी करून खा. कसलं पाणी, कसलं तेल वापरतात इ. ' असे सांगत. तरीही 'कंटाळा येतो' अशी तक्रार केल्यावर 'कंटाळा कसा येतो?' असे आईने खडसावले.
तरीही प्रामाणिकपणे सांगायचं तर हाटेलात जायला आवडतं.
आम्च्या मुम्बईला
आमच्या "चुचु सदन" ला
In reply to आम्च्या मुम्बईला by पर्नल नेने मराठे
मुंबई-महाराष्ट्र.
In reply to आमच्या "चुचु सदन" ला by टारझन
आपण सर्वांनी मागच्या जन्मी
In reply to मुंबई-महाराष्ट्र. by जागु
वा !
In reply to आमच्या "चुचु सदन" ला by टारझन
इतर
In reply to आम्च्या मुम्बईला by पर्नल नेने मराठे
१०० % सहमत बाकी खवय्यांचा
In reply to आम्च्या मुम्बईला by पर्नल नेने मराठे
+१
In reply to १०० % सहमत बाकी खवय्यांचा by निनाद मुक्काम …
पुणे
अर्थातच ,
In reply to पुणे by आजानुकर्ण
एक शंका : जाज्वल्य याचा अर्थ
In reply to पुणे by आजानुकर्ण
तेजस्वी
In reply to एक शंका : जाज्वल्य याचा अर्थ by विजुभाऊ
दोराबजीतील खाउन बघीतली का?
In reply to एक शंका : जाज्वल्य याचा अर्थ by विजुभाऊ
’गणपा’
हो हो हो
In reply to ’गणपा’ by दिपक
गणपा ....
In reply to हो हो हो by प्रचेतस
व्यक्ती तितक्या प्रकृती
+१
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती by पंगा
+२
In reply to +१ by सहज
+१
In reply to व्यक्ती तितक्या प्रकृती by पंगा
मुंबई कुठाय? -- मुंबईसह आलाच पाहिजे
ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं
In reply to मुंबई कुठाय? -- मुंबईसह आलाच पाहिजे by ऋषिकेश
+२ सहमत..ईतर ला मत दिले
In reply to ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं by गणपा
अधिक माहिती द्या
In reply to ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं by गणपा
गणपा, अरे कुठे फेडशील हे पाप?
In reply to ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं by गणपा
मुंबईचा वडापाव...
In reply to ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं by गणपा
पुणे तेथे काय उणे.
शौकिन... नाना, आयॅम स्वारी!
In reply to पुणे तेथे काय उणे. by नाना बेरके
अगदी अगदी! आज धमालरावांशी
In reply to शौकिन... नाना, आयॅम स्वारी! by धमाल मुलगा
सहमत!
In reply to अगदी अगदी! आज धमालरावांशी by असुर
सहमत
In reply to शौकिन... नाना, आयॅम स्वारी! by धमाल मुलगा
तुळशीबागेतल्या श्री दत्त उपहारगृहाची मिसळ?????????
In reply to पुणे तेथे काय उणे. by नाना बेरके
मुंबई हा पर्याय नसल्याने
साल्याहो एक्दा कल्याण शीळ
In reply to मुंबई हा पर्याय नसल्याने by अप्पा जोगळेकर
तिथल्याच टुरीस्ट हॉटेलची पालक
In reply to मुंबई हा पर्याय नसल्याने by अप्पा जोगळेकर
जिथे कुठे दुसरा कोणी बील
खवय्यांचा स्वर्ग कोणता जर
स्वताच स्वयंपाकघर...
अजुनहि एकटेच का?
In reply to स्वताच स्वयंपाकघर... by मी-सौरभ
वरील सर्व ला मत दिले
आजच्या दिवसापुरतं आमच्या
रेडी टु कुक प्रॉडक्ट मिळतात
रेडी टु कुक प्रॉडक्ट मिळतात
In reply to रेडी टु कुक प्रॉडक्ट मिळतात by अवलिया
माझे किचन फ्लोअर. प्रेमाने