कोडे

एक प्रसिद्ध कोडं घालते आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना ते माहीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी ,याचे उत्तर जालावर शोधण्याआधी कृपया प्रामाणिक प्रयत्न करावा. कोडे सहज सापडू नये म्हणून थोडे अनुवादित केले आहे. (१) एक गाव असतं त्याला म्हणू यात गंगापूर.

तुम्हाला भारताबाहेर कोणत्या देशात स्थाईक व्हायला आवडेल? जमल्यास कारणही स्पष्ट करा.

Comments

टारझन नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

परु, माझ्या प्रतिसादाला तुझ्यासारख्या स्वतंत्र आणि प्रथितयश प्रतिसादकाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र म्हणजे एक तर्‍हेचा 'shot-in-the-leg'च आहे. धन्यवाद. 'माझा मस्कापाव ' (my butter toast) मला धागे खोटी करायच्या व बुच योग्य जागी मारायच्या सूचना नेहमीच देत असतो! (इंग्रजीत टोस्ट चहाबरोबर आणि मग केक कॉफीबरोबर येते तर मराठीत खाद्यरचना वेगळीच असते. न्याहारी मोठी असल्यास च्या बरोबर काय खाल्लं होतं हे विसरायलाच होते हे खरे आहे!) - बुचन लावे

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by टारझन

बुच मारणे हा प्रकार मिपावर फारसा वापरले जात नाही अशी चर्चा झाल्यावर टारुमांनी एका बैठकीत सात बुचं मारली असं ऐकिवात आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा - पत्र

अवलिया नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by अवलिया

त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले
श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो) आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ? आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा. (माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?)

अवलिया नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो) धन्यवाद या आपुलकीबद्दल >>>आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. वाटणारच.. दिवसा आपल्याला काहीही चक्रावुन टाकते.. संध्याकाळ नंतर आपण जरा ताळ्यावर येता हे काय आम्हाला माहित नाही? असो. >>>कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. एकदा माणसाचे मन चक्रावले की काहीही पोखरले जाते. >>>श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? अभ्यास वाढवा >>>आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ? यात खोडसाळ पणा काहीच नाही. कसा ते समजावुन सांगावे >>>आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा. तथास्तु ! >>(माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?) छे छे तुम्हाला गजकर्ण झाला आहे हे आम्हास ज्ञात आहे.

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by अवलिया

सर्वात आगोदर लगोलग उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद या आपुलकीबद्दल
धन्यवाद मानुन लाजवल्याबद्दल आपले देखील धन्यवाद.
वाटणारच.. दिवसा आपल्याला काहीही चक्रावुन टाकते.. संध्याकाळ नंतर आपण जरा ताळ्यावर येता हे काय आम्हाला माहित नाही? असो.
काहितरी गल्लत होते आहे का? आम्ही सकाळी देखील ताळ्यावरच असतो. हान आता आपल्या सारख्या काही विद्वानांशी वाद आम्ही सकाळ प्रहरी टाळतो हे मात्र खरे.
एकदा माणसाचे मन चक्रावले की काहीही पोखरले जाते.
आमचे मन चक्रावले आहे हा तर्क आहे का अनुमान ? हे आपण कशावरुन ठरवलेत ? ह्याअगोदार आपणास असा काही स्वानुभव आहे काय?
अभ्यास वाढवा
विद्याभ्यास का मिपाभ्यास ? वाढावायची गरज असल्यास कोणत्या क्षेत्रात ?
यात खोडसाळ पणा काहीच नाही. कसा ते समजावुन सांगावे
आपण पडद्यामागच्या गोष्टींची चर्चा अशी सार्वजनीक का करता ? काय मिळते ह्यातुन आपल्याला ?
छे छे तुम्हाला गजकर्ण झाला आहे हे आम्हास ज्ञात आहे.
अतिशय घृणास्पद अशी वैयक्तीक पातळीवरील हिणकस टिका. आपण आजकाल सकाळ सकाळ अपेयपान करावयास लागला आहात हि चर्चा खरी असल्याचा आज साक्षाक्तार झाला.

टारझन नवीन

In reply to by अवलिया

परिकथेतील राजकुमार यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्‍या अवलियांचा मण:र्पुव्क णिषेद! - (आमोनिया) *त्रेश

नेत्रेश नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्‍या राजकुमारांचा मण:र्पुव्क णिषेद!

टारझन नवीन

In reply to by आमोद

ते आपल्यासारख्या मंद ड्युप्लिकेट आय.डी.ज ला कळणार नाही. :) जय विजय करण्याआधी आपल्या मिसळपाव वरील परंपरेविषयी सांगा :) - कागोद

आमोद नवीन

In reply to by टारझन

ठिक आहे. आम्ही मंद असू पण हे जरा समजाऊन सांगण्याची क्रुपा करावी. बाकी चालुदे. (ईनोद करताना पाय घसरुन पडु नका ह्या शुभेच्छा). बाकी प्रवेश प्रतिबंधीत होण्यापेक्शा आयडी ड्युप्लिकेट असलेले परवडले!!

टारझन नवीन

In reply to by आमोद

तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय की मन भरुन आले ;) आपण मिसळपाव ला आणि परंपरेला णावं ठेवण्यापेक्षा अजुन भरभरुन लिहावं ही विनंती :) बाकी मग तुम्ही ओरिगिनल की डुप्लिकेट ते कळेलंच :) आमच्यासाठी ड्युप्लिकेट आयडी असण्यापेक्षा प्रतिबंधीत झालेले परवडले :)

मुलूखावेगळी नवीन

झुमरीतलय्या बॉलीवुड च्या स्वप्नातला देश :)

छोटा डॉन नवीन

In reply to by विलासराव

विलासरावांशी सहमत २०१४ साली : ब्राझिल ( रियो ) २०१८ साली : रशिया ( मॉस्को ) २०२२ साली : कतार आता बोला, काय स्किम आहे ? - छोटा डॉन

ऋषिकेश नवीन

इतरः भुतान, मंगोलिया, मालदिव, मायक्रोनेशिया वगैरे तत्सम पॉलिटीकली इनर्ट तरीही (की म्हणूनच?) स्वस्थ जीवन जगता येणार्‍या देशात!

क्लिंटन नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आखाती देश (सौदी अरेबिया आणि इराण सोडून) कारणे प्रॅक्टिकल आहेत. एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. बिपीन बरोबर ना? हे सगळे फायदे ध्यानात घेता अमेरीकेपेक्षा आखाती देश चांगले.राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला? सौदी आणि इराण का नको?कारण आमच्या हिलरीला बुरख्यात ठेवायला मला अजिबात आवडणार नाही.

Pain नवीन

In reply to by क्लिंटन

नवीन माहितीबद्दल धन्यवाद. नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. ते खरे आहे का ? रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते असे कतारमधल्या एकांनी सांगितले आहे. डोर सिनेमात दाखवलेली परिस्थितीही थोडी भीतीदायक वाटली होती.

क्लिंटन नवीन

In reply to by नगरीनिरंजन

अहो असेच काही घडायचे असेल तर ते घडतेच. दिल्लीमध्ये परवा रात्री एका तरूणाने गाडीतून उतरताना मागे कोण चालत येत आहे हे न बघता गाडीचे दार उघडले आणि ते चालत येणाऱ्यांना लागले या कारणावरून मागून येणाऱ्यांनी त्या तरूणाची गोळ्या झाडून हत्या केली.असे होते म्हणून दिल्लीत राहणे कोण सोडतं का?तसेच काहीसे.

क्लिंटन नवीन

In reply to by Pain

डोर सिनेमात काय दाखविले आहे हे माहित नाही.माझी बहिण १३+ वर्षे आखाती देशांमध्ये राहत आहे.तिला रमझानमुळे काही प्रॉब्लेम आल्याचे ऐकिवात नाही.काही ठिकाणी हॉटेलातून खाणे पॅक करून घरी घेऊन जाता येते. ऑफिसात दुपारचे जेवण करता येत नाही असेही कधीही ऐकले नाही.अधिक माहिती या प्रदेशात स्वत: राहिलेले लोक देऊ शकतील.

गणपा नवीन

In reply to by क्लिंटन

क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९ वर्षांच्या दुबईच्या वास्तव्यात रमझानमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाही. सध्याच्या मंदीच्या काळात तिथे बरेच जणांच्या नोकर्‍यांवर घाला आला होता अस ऐकल. (पण या मंदीच्या फेर्‍यातुन कोण वाचलय म्हणा.) म्हणुनच किलंटनने मांडलेल्या अनेक मुद्यांशी सहमत आहे. पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं.

पर्नल नेने मराठे नवीन

In reply to by गणपा

* पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं. बघ ना....अगदी साधे ड्राइव्हिन्ग लाइसेन्स पण चटकन देत नाहिन. साधारण १०-१२००० दिर्हम्स उकळतात.

पर्नल नेने मराठे नवीन

In reply to by Pain

*नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. काधुन घेत नाहित्, ९९% हिच पद्धतच असते. ऑफिसकडे पास्पोर्ट रहातो. आमच्या बाबतित नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये. व मी नव्र्याच्या जिवावर आयमिन वि़सावर सो माझापण माझ्याकडेच आहे. * रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते बंदी नसते पॅन्टरीत जाउन खाता/पिता येते ...फक्त त्यांच्या समोर खायचे नाही कारण त्यांना पण इछ्चा होइल ना..म्हणुन त्यान्चा मान राखायचा. डोर पाहिला नाहिये.

आमोद शिंदे नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये.
मी चुकुन नव्र्याची पप्पी ओफिसने घेत्ली नाही असे वाच्ले!

पर्नल नेने मराठे नवीन

In reply to by क्लिंटन

*राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला? मिळतच नाही राष्ट्रीयत्व.. अगदी फ्री होल्ड मधे प्रोपर्टी घेतलीत तरी देत नाहित. *एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, घराची भाडी तगडी असतात ...हा एक प्रकारचा तॅक्स्च झाला असे आम्हाला वाटते. *बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते हे खरे आहे.

आमोद शिंदे नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

घराची भाडी तगडी असतात ...हा एक प्रकारचा तॅक्स्च झाला असे आम्हाला वाटते.
घराची भाडी इतरत्र नसतात काय? आम्ही तग्डी भाडी भरुनही वर तॅक्स देतो.

आशिष सुर्वे नवीन

नायजेरीया.. एकदा जाऊन तर बघा.. राजे होऊन रहाल तिथे...

शिल्पा ब नवीन

बाकी ठीक पण आपण या कौलातून काय साधणार? तुम्ही कुठे स्थाईक आहात? कुठे व्हायचंय ? काय कारण? अवांतर म्हणजे खालील रोचाकाहून रोचक प्रतिसाद.

प्रदीप नवीन

In reply to by शिल्पा ब

नोव्हेंबर व डिसेंबरच्या महिन्यांत आतापर्यन्त २४ कौल इथे काढले गेलेले आहेत. त्यातील ३ ~ ४ वगळता इतर सर्व कौल यथातथाच होते. ह्या सुमारे २०+ पाचकट कौलकारांनी त्यांच्या कौलांच्या प्रतिसादाचे प्रिंटआउट्स घेऊन त्यांच्या सुरळया करून योग्य ठिकाणी घातल्या असाव्यात असा कयास आहे!

नेत्रेश नवीन

In reply to by शिल्पा ब

मिपावर सार्‍या जगभरातुन लोक येतात. प्रत्येकाला आपल्या देशात रहाण्याचे फायदे-तोटे माहीत असतात. कौल काढताना मला त्या देशांपद्दल जी माहीती होती ती मी कंसात दिली आहे. त्या व्यतीरीक्त अजुन माहीती मि़ळावी, तसेच विवीध देशांत स्थाईक व्हायचे फायदे-तोटे जाणुन घ्यावे आणी आपले ज्ञान वाढवावे हाच या कौलामाजचा उद्येश आहे.

बारक्या_पहीलवान नवीन

In reply to by शिल्पा ब

आमोद शिंदे - खरे आहे . प्रदीप - प्रयत्न करतो भाउ . टाईप करताना गरबड होते. शिल्पा ब - भारताबाहेर स्थाईक व्हायचा विचारही करु शकत नाही शिल्पाताई. आपले पुणे तिथे काय उने. बा.प.

बारक्या_पहीलवान नवीन

असहमत - आखाती देश सौदी अरेबिया सोडून, क्लिंटन ह्याचे म्हणणे पटत नाही. त्याचे प्रामाणिक मत आहे, वाद घालायचा नाही (हिलरीला बुरख्यात ठेवायला अजिबात आवडणार नाही). दिल्ली, मुंबईलाहि गुन्हे प्रमाण भरपूर झाले आहे. सौदी सेफ वाटते ( चोराच्या राज्यात चोरी कोण करणार! ). मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी). सहमत - पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, (बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर - हल्ली सगळ्यांना) कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते ....वैगरे वैगरे बर्याच माहिती अर्धवट असतात. अरबी नवीन पिढी अमेरिका किवा युरोप ला शिकला आहे. विचारसरणी बदलत आहे. बरच काही नवीन आले आहे. बा.प.

प्रदीप नवीन

In reply to by बारक्या_पहीलवान

मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी).
[उद्वेगाने: आप की तरह मराठी लिखते है क्या वो सौदी मे गये हुवे मराठी लोग?] [आता थोडे सावरून: अहो , जरा मराठीतून मराठी लिहा की, साहेब! तुम्हाला 'सौदीत माझे वास्तव्य ४ वर्षे आहे. सौदीत बरेच मराठी लोक आले आहेत' असे लिहायचे असावे?] बाकी चालू दे (c: आजानूकर्ण)

आमोद शिंदे नवीन

In reply to by बारक्या_पहीलवान

अहो पण ह्या सौदी (किंवा आखाती) देशा मध्ये गोर्‍या माणसांना वेगळी वागणूक देतात म्हणे. गोर्‍या माणसाची पात्रता/अनुभव इ. कमी असले तरी पगार आणि हुद्दा त्यांचाच जास्त असतो म्हणे. त्यापेक्षा अमेरिका काय वाईट?

ह्य ह्य..

लेखनप्रकार
"..मला काल रात्रीच कळलं. मग पंचवटीने आलो सकाळी निघून." "बसायला जागा मिळाली का पण?" "हो..रिकामी होती आज एकदम..झोपून आलो..ह्य ह्य.." "ह्य ह्य.." ... "बरं.. काय झालं एकदम?.." "काल रात्री चांगले होते. सकाळपासून जोक्स बिक्स करत होते. योगासनं पण केली.. रात्री पिठलं टाक म्हणाले. मग टी.व्ही. बघत बसले होते. एकदम संडासला लागली म्हणाले. त्यांना कमोड लागतं ना. ते अशोकनं आतल्या बाथरूम मध्ये बसवलंय..फोल्डिंग टाईपचं. मग जरा हात धर म्हणाले अशोकला..तेव्हाच त्याला शंका आली. ..आणि मग संडासच्या वाटेतच त्यांचा तोल गेला..काहीतरी बोलले म्हणे अशोकशी आणि एकदम डोळे फिरवले." "बरं झालं पटकन गेले.

माझे खोलपण असेच उथळ उथळ

लेखनविषय:
माझ्यात खोलवर पोहचायचे सगळेच दरवाजे बंद, सगळ्याच वाटा बंद, पण माझा कोश आणि मी दोघेही वाट बघतोय, माझ्या माणसांची ... तुम्हाला सापडेल अशी एखादी चोरवाट, अतिशय खोल जाणारी अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत... पण हो मनापासून मला भेटायची ओढ, माझ्यापर्यंत पोहोचायची इच्छा असणाऱ्यासाठीच, अशा चोरवाटा, "जाणून बुजून ठेवलेल्या चोरवाटा !!!" वरून जरी वाटत असेल "मी" उथळ पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण कारण माझे खोलपण असेच फसवे अन उथळ उथळ...

खवय्यांचा स्वर्ग कोणता ???

Comments

टारझन नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

आमच्या "चुचु सदन" ला वगळल्याबद्दल पण तिव्र निशेध. कुकर फुटका असला म्हणुन काय झालं .. कच्च्या भाज्याही खुप चविष्ठ करते हो ती :)

५० फक्त नवीन

In reply to by जागु

आपण सर्वांनी मागच्या जन्मी काहीतरी फार मोठी पुण्यकर्मे केली आहेत, म्हणुन या खवय्यांच्या स्वर्गात, हिंदुस्थानांत जन्मलो आहोत. इथलं प्रत्येक गाव, प्रत्येक घर या स्वर्गाचं एक एक दालन आहे. त्यामुळं भेदभाव तो कसा करावा हे कळत नाही. हर्षद.

प्रचेतस नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

'इतर' मध्ये टाकलेच आहे ना. :) मुंबईच्या प्रसिद्ध (?) खाद्यसंस्कृतीबद्दल जास्त माहीत नाही(वडापाव सोडून) त्यामुळे मुंबईचा उल्लेख टाकला नाही. त्याबद्दल क्षमस्व. :)

निनाद मुक्काम … नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

१०० % सहमत बाकी खवय्यांचा स्वर्ग म्हणजे दुबईतील करामा आणि डेरा (हि भारतीय बहुल भागांची नवे आहेत .) येथे भारतातील प्रसिध्द उपहारगृह हजेरी लावून आहेत . .मुंबईला इतर मध्ये समाविष्ट करतात हा नवीन जावई शोध आहे . बाकी मला वाटते धागाच्या मालकाने अजून जीवाची मुंबई केलेली दिसत नाही .

स्पा नवीन

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद ला जोरदार अनुमोदन. उपर दिये हुये सब स्वाद आपको बम्बैमे चख्नेको मिलेंगे वरील सर्वांना मत दिले आहे

आजानुकर्ण नवीन

'पुणे'ला मत दिले आहे. जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकर.

सुहास.. नवीन

In reply to by आजानुकर्ण

'पुणे'ला मत दिले आहे. जाज्ज्वल्य अभिमानी पुणेकर. ईतर पर्याय : एक गणपाचे किचन , एक माझे किचन !

विजुभाऊ नवीन

In reply to by आजानुकर्ण

एक शंका : जाज्वल्य याचा अर्थ जळाऊ असा होतो का? पुण्यातले मार्जोरीन चे सॅन्डवीच , ब्ल्यू नाईलची तंदूरी चिकन , एकदा खाऊन बघा. बाकी स पेठे तल्या एस पी ज ची बिर्यानी एकदम बकवास. तिरंगाची बिर्यानी तेलकट असते.

चिंतामणी नवीन

In reply to by विजुभाऊ

एस पी ज ची बिर्यानी एकदम बकवास. तिरंगाची बिर्यानी तेलकट असते. O K. पण दोराबजीतील खाउन बघीतली का?

प्रचेतस नवीन

In reply to by दिपक

हो हो हो... गणपा हा पर्याय हवाच. माननीय संपादक मंडळाला विनंती की त्यांनी गणपाला कौलात अ‍ॅड करावे.

पंगा नवीन

'व्यक्ती तितक्या प्रकृती' या न्यायाने, आणि खाण्यालायक असे इतके विविध प्रकार जगभर इतक्या ठिकाणी विखुरलेले असताना, खवय्याचा एकच असा स्वर्ग जगात कोठेही असू शकणे केवळ अशक्य आहे. 'इतर' या पर्यायास मत दिले आहे.

ऋषिकेश नवीन

मुंबई कुठाय? वरील सर्व भागांतील सर्व पदार्थ एकाच ठिकाणी उत्तम मिळण्याचे हे एकमेव शहर असावे :) हा कौल मुंबईसह आलाच पाहिजे ;)

गणपा नवीन

In reply to by ऋषिकेश

ऋशी १००% सहमत.. मुंबईत जगातलं काय मिळत नाही? आमच्या लाडक्या मुंबईचा समावेश न केल्याबद्दल धागाकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :) जे गरीबातल्या गरीबाच माणसाचं अन्न आहे त्या वडापावला मुंबईची संस्कृती नाही म्हणायच तर काय म्हणायच? आवांतर : हल्ली मॉल मध्ये मिळणारा बर्गर सदृष्य वडापाव पाहीला की कीव येत. वल्ली साहेब एकदा मुंबईच्या खाऊगल्लीला भेट द्याच.

प्रचेतस नवीन

In reply to by गणपा

गणपाभौ, मुंबईच्या खाउगल्लीबद्दल अधिक माहिती द्याच. पुणेकर असूनही फारसा मुंबई फिरलो नाही अजून. तुम्ही टाकलेला वडापावचा फोटू मस्तच. तोंड पाणावले. :)

उपेन्द्र नवीन

In reply to by गणपा

कशाला हो हा फोटो टाकला .. एक तर अत्ताच हापिसातून घरी आलो.. आता बाहेर पडून वडापाव हाणल्याशिवाय चैन पडणार नाही..

नाना बेरके नवीन

पुणे ला मत दिले आहे. कारण .. चितळेंकडची बाकरवडी, मुंजोबाच्या बोळातल्या बेडेकरची मिसळ, विश्रामबागवाड्याजवळची श्री उपहारगृहाची मिसळ, तुळशीबागेतल्या श्री दत्त उपहारगृहाची मिसळ, भजी, डेक्कनवरच्या आप्पाची काकडी खिचडी, दिपाली-रुपालीतले सगळे दाक्षिणात्य पदार्थ, फर्ग्युसन रोडवरच्या 'हॉर्न ओके प्लीज'मधले आणि गणेशनगरच्या अभिरुचीमधले सगळे पंजाबी पदार्थ, मेहेंदळे गॅरेजजवळच्या 'स्विकार' ची, पूना बोर्डींग हाऊसची रविवारची थाळी 'स्विकार' शेजारच्या 'निसर्ग'मधले मासे आणि खेकड्यांचे सगळे पदार्थ दोस्तहो तुर्तास इतकंच खाऊन पहा त्यावर नळस्टॉप चौकातल्या 'शौकीन'मधलं कुठलंही पान खाऊन बघा न् मग स्वर्गाची भाषा करा.

धमाल मुलगा नवीन

In reply to by नाना बेरके

शौकिन... नाना, आयॅम स्वारी! पण शौकीननं निव्वळ भ्रमनिरास केला. अरे, पान खायचं तर ते कसं एकदम सणसणीत लावलेलं हवं..उगं चाकलेटपान अन गुलकंद पानमध्ये काय मजा? शौकिनवाल्याकडं एकसोबीस-तीनसो घ्या, नायतर फुलचंद घ्या! भट्टी बिघडलेलीच. अहो, 'सादा पान' सुध्दा गडबड! कात-चुना, कतरी-केसरी सुपारी, किंऽचित थंडक, एक वेलदोडा, एक लवंग जाळून... आता हे काय लै लै अवघड आहे काय? पण नाय...तेही गंडिवलंच पठ्यानं! पानासाठी शौकिनांनी शौकिन टाळणं हे बरं. आमच्या एका दोस्ताच्या भाषेत 'पच्च...(आपल्या विजारीवर शिंतोडे उडू नये म्हणून कसरत आपणच करायची!) ह्यॉ:! तिकडॉ क्कॉय पॉन मिळ्टं कॉ? ऑयलॉ...णिव्वॉळ जनॉनॉ पॉन डेटॉट रँऽऽ.... पच्च.....' :D शौकीनपेक्षा भांडाकरकर रस्त्यावरचं रविराजचं पान झक्कास. झालंच तर, बाजीराव रस्त्यावर दक्षिणमुखी मारुतीसमोरच्या टपरीवरही ब्येस पान बांधतो. आणि आकुर्डीला रत्नलोक हाटिलाच्या कंपाउडमधल्या टपरीवरही भारी पान लावतो .

असुर नवीन

In reply to by धमाल मुलगा

अगदी अगदी! आज धमालरावांशी सहमत व्हावं लागलं! :-) ज्याला सणसणीत पान खायचंय त्याने "झगामगा मला बघा" टाईप दुकानात जाण्यात काय हशील?? १. बाजीराव रस्त्यावर "जगन्नाथ पान" आहे. झकास्स!! २. आणि कोथरुडमध्ये शिवाजी महाराज पुतळ्यापाशी कुमारची पानाची टपरी! पान खाऊन जीव हलका होणे म्हणजे काय ते इथे नक्की समजणार!! :-) बाकी खाद्यपदार्थांवर आख्खा लेखच टाकलाय मी आज!! पुण्यक्षेत्री सुखी आहोत!!! --असुर

आत्मशून्य नवीन

In reply to by धमाल मुलगा

त्यापेक्षा सीटी प्राईड कोथरूड कॉर्नरवर टपरीवर कलकता साधा पान मागा, एक्दम ढींच्याक मीळतं, तंबखू नसून सूध्दा तो साध पान अस्ले राप्चीक बनवतो की बस चघळतच रहावे.. पून्ह दूसरीकडे साधं पान खानारच नाय तूम्ही...

चिंतामणी नवीन

In reply to by नाना बेरके

कुठेशी आहे हे उपहार गृह??????? मला वाटते तुला "श्रीकृष्ण" म्हणायचे असावे.

अप्पा जोगळेकर नवीन

मुंबई हा पर्याय नसल्याने इतरला मत दिले आहे. साल्याहो एक्दा कल्याण शीळ रोडवरच्या शालू बारची गावठी कोंबडी हाणून पाहा आणि मग सांगा इतर मिजाशी.

सुहास.. नवीन

In reply to by अप्पा जोगळेकर

साल्याहो एक्दा कल्याण शीळ रोडवरच्या शालू बारची गावठी कोंबडी हाणून पाहा आणि मग सांगा इतर मिजाशी. >>> कधी येऊ ? सुहास आमच्या फुकटच्या खाण्याला प्रांत, धर्म , जात , वर्ण , वश बघीतल्या जात नाहीत. डुकराहार वर्ज्य !!

रेवती नवीन

वरील सर्व ला मत दिले आहे. भारतात प्रत्येक प्रदेशाची, शहराची खासियत असतेच. मला खाणं या प्रकारात इंटरेस्ट आहे पण बाहेर फारसं खाल्लं जात नाही हेही खरं. आई घरी सगळे पदार्थ करायचीच पण तरी बाहेर खाण्यासाठी विचारल्यास," काय मेले भिकेचे डोहाळे!" असं ऐकावं लागायचं. दोन्ही आज्ज्या तर बाहेर खाण्याच्या विरूद्ध असल्याने 'जे काय खायचं असेल ते घरी करून खा. कसलं पाणी, कसलं तेल वापरतात इ. ' असे सांगत. तरीही 'कंटाळा येतो' अशी तक्रार केल्यावर 'कंटाळा कसा येतो?' असे आईने खडसावले. तरीही प्रामाणिकपणे सांगायचं तर हाटेलात जायला आवडतं.

नरेशकुमार नवीन

In reply to by अवलिया

रेडी टु कुक प्रॉडक्ट मिळतात ते ठिकाण
तुम्हाला 'रेडी तु कुक' ऐवजी 'रेडी तु ईट' असे म्हनायचे आहे का ? बाजारात सगळिकडे जे काही (भाज्यांपासुन धान्यांपर्यंत) मिळते ते रेडी तु कुक च असते.

कंटाळून गेलेय ...!!!

लेखनविषय:
काव्यरस
किती वर्ष झाली किती काळ गेला कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या पोरांच्या नातेवाईकांच्या संसाराचे ओझे ..! कर्तव्याचे ओझे ..!! ह्याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर करण्याचे ओझे हु...श्श ..!! कंटाळून गेलेय आता . ह्या सुखी {?} संसाराला प्रत्येकाची तर्हा निराळी पोरांच्या , पोरींच्या छान केलेय म्हणत..... सतत फटकारत , कधी कुरवाळत नि बळजबरीने मुद्दाम उत्साहाचे सलाईन.... थकून गेलेय्रे आता .. गोड शब्दाचे पेग घशात ढकलायचे नि उत्साह आणायचा ओढून ताणून.....

अनुप्रास

लेखनविषय:
लेखनप्रकार
शाळेत असतांना ज्या कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे १] देवी दयावती दवडसि दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर ! मोरोपंत २] कुरुकटकासि पहाता, तो उत्तर बाळ गडबडला, स्वपरबळाबळ नेणुनि, बालिश बहु बायकांत बडबडला ! मोरोपंत लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर ( विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ) ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच.

पूर्णब्रह्म!

लेखनप्रकार
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला. संध्याकाळचे साडेआठ वाजले होते. जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्‍या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती. अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती.
Subscribe to