Skip to main content

आल्फा मेल

विनायक प्रभू यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे. हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते? ह्याची व्याख्या काय? ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते? ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते? ----------------------------------------------------------------------------------------- रोज आपल्या बायको किंवा होणार्‍या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक. आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल. अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल. पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

प्रकाश१११ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

जयंत कुलकर्णी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

[नीळकंठेश्वर] - नव वर्ष, नवी जागा

पारा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.

शाळा

मृत्युन्जय यांनी या दिवशी प्रकाशित केले.
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.