Skip to main content

असहाय्य

मराठे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
मला त्यांनी दत्तक घेतलं होतं... नाही "पाळलं होतं" हा शब्दप्रयोग जास्त बरोबर आहे. मला जन्म देणारी आई मला आठवत नाही. पण माझी काही तक्रार नाही. हे नविन घर मला आवडलं होतं. बहुतेक सगळे माझ्याशी चांगले वागत होते. मला चांगलं खायला मिळत होतं, राहायला चांगलं ऐसपैस घर होतं. विशेष म्हणजे मी रात्री उशीरापर्यंत जागत राहिलो तरी मला कोणी बोलायचं नाही. तुम्हाला घरच्यांबद्धल सांगतो, प्रथम माझी आई.... सुशीला नाडकर्णी. आई माझे खूप लाड करायची. सुरवातीला मी तिला आई म्हणायला जरा घाबरत होतो, पण काही दिवस गेल्यावर मग सर्रास आई म्हणायला लागलो. पण मला वाटतं तिला त्यात काही वेगळेपण जाणवलंही नाही.

भारी पडली जात

गंगाधर मुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
भारी पडली जात पोळून गेले तरी कधीच मी, आखडले ना हात तुझे जिंकणे असे भावले, की खात राहिलो मात बोलत होती ती अशी की, मी गुंतून गेलो पार जरा न कळले केव्हा कशी ती, उलटून गेली रात वाटेवरती काटे बोचरे, पसरून होते दाट आता पोचलो कसाबसा मी, कित्येक खस्ता खात एकच गुन्हा समान झाला, परी सजा वेगळी त्यात आतंकवादी मजेत बाहेर, साध्वी सडते आत सूर बोबडे ऐकून माझे, मुरडून घेती नाक नसेल जर का आवड माझी, मी बसू कशाला गात? नारळ फुटला, प्रसाद वाटू, बोलून गेलेत काल वाट पाहतोय इथे अजूनी, घासून बसलो दात निकाल आला, करुनी माझ्या, परिश्रमास मातीमोल कर्तृत्वाचा बोर्‍या वाजला, नि भारी पडली जात भिती मन

प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

शरदिनी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई जैताच्या गावात ऊर्जेची उईउई रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा अडम तडम तडतड बाजा ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा एआरडॅनी जयहो राजा अडम तडम तडतड बाजा गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा शरद

तुमची रास कोणती ?

अमोल केळकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
Nile

In reply to by विनायक प्रभू

तुम्ही चुचु काकुंना गाय म्हणता आहात की गायीची कृष्णवर्णिय चुलतबहिण? नाही दोघी हम्मा करुनच हंबरतात असा संशय मला आहे म्हणुन विचारतोय. ;-)
06/01/2011 - 15:49 Permalink
चिरोटा

In reply to by Nile

चांगला कौल. एकूण मिपाकरांची संख्या किती आहे हो संपादक? प्रत्येक राशीला साधारण १/१२ मिपाकर आले पाहिजेत. माझी रास -कन्या.(साहजिकच शरद उपाध्ये ह्यांचा कार्यक्रम मी कधीही पाहत नाही!!)
06/01/2011 - 17:03 Permalink
अप्पा जोगळेकर

In reply to by चिरोटा

जावदे रे भेंडी. तो म्हातारा काहीही बरळत असतो. नामस्मरण काय अन खडे काय अन मणी काय. उगा लक्ष देउ नकोस. कन्या असो नाहीतर अजून काय असो. जी मेलावर ये ना बे.
06/01/2011 - 17:31 Permalink
स्पा

In reply to by पर्नल नेने मराठे

कर्क शेम टू शेम
06/01/2011 - 15:45 Permalink
परिकथेतील राजकुमार

In reply to by शुचि

नाना "मीन" राशीचे आहेत. कारण सांगते. त्यांच्याकडे सहानुभूती आहे.
घ्या ! आता हा सहानुभूतीच्या चिलिमा करुन ओढायला मोकळा.
07/01/2011 - 11:59 Permalink
Nile

In reply to by प्रियाली

अहो र सायलंट आहे, तुम्हा हुश्शार लोकांना एव्हढं पन समजत नाय?
07/01/2011 - 04:26 Permalink
गणेशा

माझी रास मकर आहे. मला या बद्दल फक्त येव्हडे माहित आहे की स्वामी शनी आहे, आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. गोष्ट मिळते पण शेवटी ...
06/01/2011 - 19:22 Permalink
शुचि

कर्क (पुष्य) जळी - स्थळी-काष्ठी-पाषाणी रडूबाई रास सारखी रडत असते. पूर्वी तर फार, आता बरं आहे.
06/01/2011 - 19:53 Permalink
उपेन्द्र

कोणी मीन आहे असे म्हणतात तर कोणी वृश्चिक ..त्याने काही फरक पडतो असे वाटत नाही... बाय द वे.. जगात बाराच प्रकारची माणसे असतात का..?
06/01/2011 - 23:05 Permalink
शुचि

In reply to by उपेन्द्र

सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, रवि, राहू, केतू हे ग्रह परत १२ राशी, या ग्रहांच्या युती/प्रतियुती, योग, एकमेकांवर दृष्टी असणे यातून संभवणारे गुणधर्म वगैरे धरता खूप परम्युटेशन्स्/काँबिनेशन्स होतात. पण "ज्योतिषाची मूळाक्षरं" हे १२ स्वभाव आहेत असे मी ऐकून आहे.
07/01/2011 - 02:15 Permalink
Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अय्या खुळ्या की काय! ६.८ पद्मसुद्धा होतील! ही सगळी वेगवेगळी काँबिनेशन्स १२ कॅटेगरीत मात्र अगदी फिट्ट बसतात!
07/01/2011 - 02:43 Permalink
शुचि

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती एवढी कॉबिनेशन्स नाही होणार. पण "फ्री विल" म्हणून देखील काहीतरी आहेच आहे. म्हणजे जरी "कर्क" राशीचे लोक हे चांगले स्वयंपाकी असतात असं आपण म्हटलं तरी कोणी जर स्वतः होऊन ठरवलं की नाही त्या क्षेत्रात लक्ष घालणार तर तो गुणविशेष दुर्लक्षिलेलाच रहाणार. कुंभ राशीचे लोक कितीही "बुद्धीप्रधान" म्हटलं तरी जर कोणी बुद्धीला गंज चढू द्यायचं ठरवलं तर कोणी त्या व्यक्तीला अडवू शकणार नाहीच. शिवाय जेनेटिकली देखील काही मर्यादा, गुण येत असतातच. मदर टेरेस या "कन्या" सूर्य राशीच्या होत्या म्हणजे सगळे कन्या सूर्य राशीचे त्यांच्यासारखे कर्तुत्ववान आणि सेवातत्पर निघतात का? नाही. अगदी त्यांच्या जन्मवेळेवर जन्माला आलेली व्यक्तीही नाही. कारण गुणसूत्रे, पालन-पोषण तसेच काही गोष्टी ज्या मानवी मेंदूला अजूनी अज्ञात आहेत. मला वाटतं ज्योतिष ही विद्या "शक्यता आणि कल" दर्शविण्यासाठी उपयोगाची आहे. बाकी फी विलवर बरचसं अवलंबून आहे.
07/01/2011 - 03:06 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by शुचि

बाकी फी विलवर बरचसं अवलंबून आहे.
स्वभावावरून राशी ओळखणार्‍यांच्या फ्री विलवरही बरंच अवलंबून असावं. मला बर्‍यापैकी ओळखणार्‍या काहींनी (सांपल साईझ साधारण दहा!) माझी रास काय हे शोधायचा प्रयत्न केला. तीन-चार राशी 'घेऊन' झाल्यावर शेवटी मी "आता हवेत तीर मारणं अजून आठ-नऊ प्रयत्नात बंद होईलच" असं म्हटल्यावर मला रास विचारली. आणि सांगितल्यावर "शक्यच नाही" किंवा "हां, असं असू शकतं, काय सांगता येत नाही" असल्या टाईपची उत्तरं दिली. तर मुद्दा असा की फ्री विलवरच बरचसं अवलंबून आहे तर वृश्चिक काय नायतर भुजंगधारी काय, काय फरक पडतो? पेपरातपण रोज छापून येतंच की... मेष: अपघाताची शक्यता, वृषभः आरोग्याची काळजी घेणे ....
07/01/2011 - 03:15 Permalink
शुचि

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असो पण निदान लग्न किंवा चंद्र मेषेचा असेल :). बरं मी हरले. :) हे बरय माझा "ढोल" झालाय सगळे आपले बडवतात. तिकडे मी ज्ञान पाजळलं की केळकर साहेब उपहासाने म्हणतात "वा वा नवी माहीती मिळाली" म्हणजे आणि इथे आपले मला "ज्योतिष विषयाच्या बाजूने" समजून विरोधी पक्ष माझी तासडतो :( :(
07/01/2011 - 03:23 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by शुचि

चंद्र मेषेचा म्हणजे काय? मला जेवढं ग्रहगणित माहित आहे (आणि स्वतःची जन्मवेळ सांगितलेली आठवते) त्याप्रमाणे मेष रास तेव्हा उगवतीला नक्की नव्हती. (माझी सौररास ओळखणं फार कठीण नाही, माझ्या वाढदिवसाला गिफ्ट नाही निदान मला बड्डे विश करणारे बरेच लोक आहेत.)
07/01/2011 - 05:22 Permalink
शुचि

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उगवतीला मेष नव्हती म्हणजे लग्न मेष नाही. चंद्र आहे का मेष राशीत? नावावरून (आद्याक्षर) कुंभ वाटते आहे अक्चुअली.
07/01/2011 - 05:32 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by शुचि

नावावरून (आद्याक्षर) कुंभ वाटते आहे अक्चुअली.
झाला ना घोळ! माझं कागदोपत्री असलेलं नाव हे मातोश्रींनी माझ्या जन्माच्या निदान चार वर्ष आधीच ठरवून ठेवलं होतं. राहिलं वापरायचं नाव, अदिती, ते आमच्या शेजारच्या आजीने माझ्या भावाच्या नावाशी जुळतं म्हणून त्याला विचारलं, तर भावाने अदिती म्हणूनच हाक मारायला सुरूवात केली. बालाऽदपि सुभाषितम् ग्राह्यम् म्हणून तेच नाव जास्त वापरलं जातं! तर कोणत्या नावावरून माझी रास कुंभ वाटते? ;-) चंद्र मेष राशीत असेल तर माझी भारतीय ज्योतिषाप्रमाणे रास मेष असली पाहिजे. माझ्या आठवणीप्रमाणे ते नाही हे आधीच लिहीलेलं आहे. आणि सौररास स्वभावावरून ओळखायचे तर आमचे राको आणि आम्ही एकाच स्वभावाचे असले पाहिजे. माझ्या माहितीतले इतरही काही त्याच सुमारास जन्मलेले पण सगळ्यांचे स्वभाव म्हणजे चामड्याची टोकं आहेत, त्यात एकसूत्रता शोधणं कठीण काम आहे.
07/01/2011 - 05:42 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by शुचि

अगं पण सौर रास तरी मेष आहे का????????? :
होय. पण ती शोधणं अगदीच सोपं आहे, निळ्यालाही ते शोधता आलं तर तुला का येऊ नये??
07/01/2011 - 05:48 Permalink
शुचि

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही आदिती हे माझं टोटल लॉजीक आहे. मला नीट व्यक्त करता येणार नाही पण अजून एक सांगते तुझं लग्न नक्की मिथुन आहे.
07/01/2011 - 05:51 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by शुचि

ईऽऽऽऽ, मिथुन नाही, त्याचं नाव अभीर आहे. ;-) हे माझं लग्न-मुंज मला कधी कोणी सांगितलं नाही, माझी पत्रिकाही कोणी बनवली नाही आणि मला जन्मतिथीही नीटशी आठवत नाही. त्यामुळे हे क्विक गणित करणं मला शक्य नाही. ... हँग ऑन अ सेक ... मेष राशीत सूर्य होता आणि लग्नरास मिथुन असेल तर माझा जन्म दुपारी बाराच्या आत झाला असला पाहिजे. नाही, मला सांगितल्याप्रमाणे जन्मवेळ ती नाही.
07/01/2011 - 06:05 Permalink
परिकथेतील राजकुमार

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

साला लोकाचे धागे कसे हॅक करावेत हे आमच्या अदिती आणि निळ्याला विचारा. शुचि मामी तू नको हो त्यांच्या नादी लागुस. त्या लोकांच्या 'वरपर्यंत' ओळखी आहेत, ते सुटतील आणि तु सापडशील. एकतर तु आपली बिचारी दुर्लक्षीत पँथरवाली असल्याने आधीच तुझ्यावर काही लोकांचा राग राग आहे.
07/01/2011 - 11:39 Permalink
Nile

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निळ्यालाही ते शोधता आलं तर तुला का येऊ नये??
आमच्या समृद्ध पारंपारिक ज्ञानावर उडवलेलेले हे आधुनिकोत्तर ज्ञानाच्या अभिमानाचे शिंतोडे खपवुन घेतले जाणार नाहीत, सांगून ठेवतो!
07/01/2011 - 05:52 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by मृत्युन्जय

इना, नको रे या भलत्या फंदात पडूस ... ते माझं व्हीडीओकॉनचं वॉशिंगमशीन फार आवाज करतंय ते रिपेर करून दे पाहू आधी!
07/01/2011 - 22:05 Permalink
मृत्युन्जय

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मॅडम कंजुषपणा कमी करा जरा. कुठल्याही मशिनला ५ वर्षात घरघर सुरु होते. आता तुमच्याच वयाच्या असलेल्या मशिनची किती वेळा दुरुस्ती करुन घ्याल? साधारणपणे कंजुष माणसांची जी रास असते तीच असावी बहुधा तुमची ;)
08/01/2011 - 10:23 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by मृत्युन्जय

माझा जन्म झाला तेव्हा वॉशिंग मशीन्स भारतीय बाजारात होती का? नसतील तर विधान मागे घ्या. त्यातून आठवड्यातनं फक्त वीस वेळा वापरलं तर पाच वर्षात मशीन कसं तुटतं? साधी ग्यारेंटीच ५ वर्षांची होती. मशीनची रास सांगा आधी!
09/01/2011 - 05:11 Permalink
मृत्युन्जय

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होती. तुझे मॉडेल १९६० चे नाही ना? बाकी न वापरता ठेवली तर मशिन्स जास्त लवकर खराब होतात.
11/01/2011 - 14:26 Permalink
चिप्लुन्कर

माझी रास कोणती असे मी जेन्वा आई ला विचारात असे त्यावर आई नेहमी तांदुळाची रास असे म्हणत असे . मला हे लहान पणी कळत नसे म्हणून मी सगळ्यांना माझी रास तांदुळाची म्हणून सांगत असे पण आता विंचू रास असून पण तांदुळाची नाही तर गव्हाच्या राशी एवडा आकार होऊ घातला आहे.
07/01/2011 - 13:30 Permalink
तिमा

कुठल्याही पध्दतीने कर्कच. आणि नक्षत्र पुनर्वसु.
12/01/2011 - 20:38 Permalink

श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाचे पत्ते

रोमना यांनी या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या मी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांवर (आंतरजालावर उपलब्ध माहिती, तसेच इतर उपलब्ध माहिती वरुन) ब्लॉग बनवीत आहे. आणि त्यांत वेगवेगळ्या ठीकाणचे स्वामींच्या मठाचे पत्ते देण्याचा मी विचार करीत आहे. तरी कृपया आपल्याला माहित असलेल्या मठांचे पत्ते (जमल्यास संपुर्ण), मठाचा वेळ व त्या मठाशी निगडीत माहिती देण्याचा आपला विचार असल्यास आपले स्वागत आहे. यापाठी माझी एकच भावना आहे की जे प्रवासाच्या निमित्ताने विविध ठीकाणी भ्रमण करीत असतात आणि आपल्या आराध्य मुर्तीचे दर्शन घेऊ इच्छीतात त्यांना सुविधा व्हावी. सध्या ब्लॉग अपुर्ण अवस्थेत आहे.

'फेसबुक' वर आहेस का?

दैत्य यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
फेसबुक........फेसबुक चा तो निळा रंग बघूनच कंटाळा येतो... कधी ह्या कंटाळ्याचा डोंगर पार करून समजा बघितलं तर पुलंनी वर्णन केलेल्या पानवाल्याच्या ठेल्याची आठवण येते...हेच पहा ना.... सगळ्या मित्रांचे ठराविक फोटोज ( गळ्यात हात टाकून 'ये दोस्ती नही छोडेंगे' वगैरे)........काही मित्रांचा ग्रुप ---ज्यांचे नेहेमी दारू पिताना फोटोज ( टायटल: 'इश्कने दर्दी बनाया' किंवा 'आज थोडी पी ली है' ).... ....मग अजून एक मित्रांचा समूह ज्यांचे नेहेमी कुठल्या तरी गोऱ्या मुलीबरोबर किंवा मेणाचा पुतळा असलेल्या गोऱ्या अभिनेत्री-बरोबर (उदा. शकिरा वगैरे) फोटोज...

भाकरी निर्मिती एक कला..

डॉ.श्रीराम दिवटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे. तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं.

अपेक्षाच्या पालखीचे ८४ फेरे...

दिनेश५७ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जागतिकीकरणाच्या 'रेट्या'ची चर्चा फार; पण प्रत्यक्षात मराठी साहित्य मात्र या 'रेट्या'ने ढिम्मदेखील हललेले नाही, या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली; ते एक बरे झाले ! जागतिकीकरणासोबत 'माणूस' पुढे जात राहिला, मराठी 'साहित्य' मात्र तिथेच राहिले. ----- ---- ------ परीक्षेची सगळी प्रश्नपत्तिका अगोदरपासूनच समोर आहे, परीक्षेच्या तयारीलाही भरपूर वेळ मिळालेला आहे, तरीदेखील पेपर सोडवायची वेळ झाली, की कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखी अवस्था व्हावी, हातपाय थरथरू लागावेत, शरीराला कंप सुटावा, तोंडाला कोरड पडावी आणि सगळे शरीर शक्तिहीन होऊन जावे, अशी अवस्था यंदादेखील ठाण्यात भरलेल्या ८४ व्या साहित्