Skip to main content

तुमची रास कोणती ?

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 06/01/2011 15:32 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 4217
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by विनायक प्रभू

तुम्ही चुचु काकुंना गाय म्हणता आहात की गायीची कृष्णवर्णिय चुलतबहिण? नाही दोघी हम्मा करुनच हंबरतात असा संशय मला आहे म्हणुन विचारतोय. ;-)

In reply to by Nile

काहीही म्हणा पण कृष्णवर्णिय अजिबात चालायचे नाही त्याएवजी गॉरवर्णिय म्हणा ;)

In reply to by Nile

चांगला कौल. एकूण मिपाकरांची संख्या किती आहे हो संपादक? प्रत्येक राशीला साधारण १/१२ मिपाकर आले पाहिजेत. माझी रास -कन्या.(साहजिकच शरद उपाध्ये ह्यांचा कार्यक्रम मी कधीही पाहत नाही!!)

In reply to by चिरोटा

जावदे रे भेंडी. तो म्हातारा काहीही बरळत असतो. नामस्मरण काय अन खडे काय अन मणी काय. उगा लक्ष देउ नकोस. कन्या असो नाहीतर अजून काय असो. जी मेलावर ये ना बे.

In reply to by अप्पा जोगळेकर

मेष राशीचे कुणीच कसे नाही ????? मग मिपावर इतकी भांडणे कशी काय होतात ? :) अमोल

In reply to by धमाल मुलगा

मी पण मी पण मी पण वृश्चिक डंख मारणारी, नांगी तुटली तरी हरकत नाही पण डंख मारणारच. हर्षद.

In reply to by अवलिया

नाना कन्या राशिचा असावा..कारण कायम त्याच्या खवत कन्यांचे जाणेयेणे असते ;)

In reply to by अवलिया

नाना "मीन" राशीचे आहेत. कारण सांगते. त्यांच्याकडे सहानुभूती आहे. त्यांना अध्यात्माची आवड आहे.

In reply to by शुचि

>>त्यांच्याकडे सहानुभूती आहे. =)) =)) =)) नान्या, बघ रे बाबा तुझ्याबद्दल काय काय गैरसमज पसरलेत. ;)

In reply to by शुचि

नाना "मीन" राशीचे आहेत. कारण सांगते. त्यांच्याकडे सहानुभूती आहे.
घ्या ! आता हा सहानुभूतीच्या चिलिमा करुन ओढायला मोकळा.

In reply to by अवलिया

तरास किंवा त्रास --- १च चान्स असला तरी आणखी काही ऑप्शन्स खग्रास खंडग्रास मुडदेफरास

In reply to by प्रियाली

ओ भयाली बै... आपलं प्रियाली तै... रास ओळखायला लावली होती, अन तुम्ही काय लिव्हलंय ? ऑ !! :)

In reply to by अवलिया

मकर नक्की. आणि ते मस्तानी वगरै राहू द्या. मकरेचे कुणाला काही देत नाहीत! ;)

माझी रास मकर आहे. मला या बद्दल फक्त येव्हडे माहित आहे की स्वामी शनी आहे, आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. गोष्ट मिळते पण शेवटी ...

In reply to by मी-सौरभ

शिंगांना धार लाऊन आलोय मी.. कालच सर्जाला "see off" करून आलो.... म्हणाला वारीला जातोय.... (( वृषभ ))

कोणी मीन आहे असे म्हणतात तर कोणी वृश्चिक ..त्याने काही फरक पडतो असे वाटत नाही... बाय द वे.. जगात बाराच प्रकारची माणसे असतात का..?

In reply to by उपेन्द्र

सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, रवि, राहू, केतू हे ग्रह परत १२ राशी, या ग्रहांच्या युती/प्रतियुती, योग, एकमेकांवर दृष्टी असणे यातून संभवणारे गुणधर्म वगैरे धरता खूप परम्युटेशन्स्/काँबिनेशन्स होतात. पण "ज्योतिषाची मूळाक्षरं" हे १२ स्वभाव आहेत असे मी ऐकून आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अय्या खुळ्या की काय! ६.८ पद्मसुद्धा होतील! ही सगळी वेगवेगळी काँबिनेशन्स १२ कॅटेगरीत मात्र अगदी फिट्ट बसतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती एवढी कॉबिनेशन्स नाही होणार. पण "फ्री विल" म्हणून देखील काहीतरी आहेच आहे. म्हणजे जरी "कर्क" राशीचे लोक हे चांगले स्वयंपाकी असतात असं आपण म्हटलं तरी कोणी जर स्वतः होऊन ठरवलं की नाही त्या क्षेत्रात लक्ष घालणार तर तो गुणविशेष दुर्लक्षिलेलाच रहाणार. कुंभ राशीचे लोक कितीही "बुद्धीप्रधान" म्हटलं तरी जर कोणी बुद्धीला गंज चढू द्यायचं ठरवलं तर कोणी त्या व्यक्तीला अडवू शकणार नाहीच. शिवाय जेनेटिकली देखील काही मर्यादा, गुण येत असतातच. मदर टेरेस या "कन्या" सूर्य राशीच्या होत्या म्हणजे सगळे कन्या सूर्य राशीचे त्यांच्यासारखे कर्तुत्ववान आणि सेवातत्पर निघतात का? नाही. अगदी त्यांच्या जन्मवेळेवर जन्माला आलेली व्यक्तीही नाही. कारण गुणसूत्रे, पालन-पोषण तसेच काही गोष्टी ज्या मानवी मेंदूला अजूनी अज्ञात आहेत. मला वाटतं ज्योतिष ही विद्या "शक्यता आणि कल" दर्शविण्यासाठी उपयोगाची आहे. बाकी फी विलवर बरचसं अवलंबून आहे.

In reply to by शुचि

बाकी फी विलवर बरचसं अवलंबून आहे.
स्वभावावरून राशी ओळखणार्‍यांच्या फ्री विलवरही बरंच अवलंबून असावं. मला बर्‍यापैकी ओळखणार्‍या काहींनी (सांपल साईझ साधारण दहा!) माझी रास काय हे शोधायचा प्रयत्न केला. तीन-चार राशी 'घेऊन' झाल्यावर शेवटी मी "आता हवेत तीर मारणं अजून आठ-नऊ प्रयत्नात बंद होईलच" असं म्हटल्यावर मला रास विचारली. आणि सांगितल्यावर "शक्यच नाही" किंवा "हां, असं असू शकतं, काय सांगता येत नाही" असल्या टाईपची उत्तरं दिली. तर मुद्दा असा की फ्री विलवरच बरचसं अवलंबून आहे तर वृश्चिक काय नायतर भुजंगधारी काय, काय फरक पडतो? पेपरातपण रोज छापून येतंच की... मेष: अपघाताची शक्यता, वृषभः आरोग्याची काळजी घेणे ....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझी मेष आहे :) हो की नाही? जर मी बरोबर ओळखलं असेन तर हरलीस हे कबूल कर.

In reply to by शुचि

मी हरणार काय, हरले हे पण मान्य! फारतर अजून फारतर ११च वेळा प्रयत्न करावा लागेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असो पण निदान लग्न किंवा चंद्र मेषेचा असेल :). बरं मी हरले. :) हे बरय माझा "ढोल" झालाय सगळे आपले बडवतात. तिकडे मी ज्ञान पाजळलं की केळकर साहेब उपहासाने म्हणतात "वा वा नवी माहीती मिळाली" म्हणजे आणि इथे आपले मला "ज्योतिष विषयाच्या बाजूने" समजून विरोधी पक्ष माझी तासडतो :( :(

In reply to by शुचि

चंद्र मेषेचा म्हणजे काय? मला जेवढं ग्रहगणित माहित आहे (आणि स्वतःची जन्मवेळ सांगितलेली आठवते) त्याप्रमाणे मेष रास तेव्हा उगवतीला नक्की नव्हती. (माझी सौररास ओळखणं फार कठीण नाही, माझ्या वाढदिवसाला गिफ्ट नाही निदान मला बड्डे विश करणारे बरेच लोक आहेत.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उगवतीला मेष नव्हती म्हणजे लग्न मेष नाही. चंद्र आहे का मेष राशीत? नावावरून (आद्याक्षर) कुंभ वाटते आहे अक्चुअली.

In reply to by शुचि

नावावरून (आद्याक्षर) कुंभ वाटते आहे अक्चुअली.
झाला ना घोळ! माझं कागदोपत्री असलेलं नाव हे मातोश्रींनी माझ्या जन्माच्या निदान चार वर्ष आधीच ठरवून ठेवलं होतं. राहिलं वापरायचं नाव, अदिती, ते आमच्या शेजारच्या आजीने माझ्या भावाच्या नावाशी जुळतं म्हणून त्याला विचारलं, तर भावाने अदिती म्हणूनच हाक मारायला सुरूवात केली. बालाऽदपि सुभाषितम् ग्राह्यम् म्हणून तेच नाव जास्त वापरलं जातं! तर कोणत्या नावावरून माझी रास कुंभ वाटते? ;-) चंद्र मेष राशीत असेल तर माझी भारतीय ज्योतिषाप्रमाणे रास मेष असली पाहिजे. माझ्या आठवणीप्रमाणे ते नाही हे आधीच लिहीलेलं आहे. आणि सौररास स्वभावावरून ओळखायचे तर आमचे राको आणि आम्ही एकाच स्वभावाचे असले पाहिजे. माझ्या माहितीतले इतरही काही त्याच सुमारास जन्मलेले पण सगळ्यांचे स्वभाव म्हणजे चामड्याची टोकं आहेत, त्यात एकसूत्रता शोधणं कठीण काम आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं पण सौर रास तरी मेष आहे का????????? : कारण ती असेल तर मी बरोब्बर ओळखलं.

In reply to by शुचि

अगं पण सौर रास तरी मेष आहे का????????? :
होय. पण ती शोधणं अगदीच सोपं आहे, निळ्यालाही ते शोधता आलं तर तुला का येऊ नये??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही आदिती हे माझं टोटल लॉजीक आहे. मला नीट व्यक्त करता येणार नाही पण अजून एक सांगते तुझं लग्न नक्की मिथुन आहे.

In reply to by शुचि

ईऽऽऽऽ, मिथुन नाही, त्याचं नाव अभीर आहे. ;-) हे माझं लग्न-मुंज मला कधी कोणी सांगितलं नाही, माझी पत्रिकाही कोणी बनवली नाही आणि मला जन्मतिथीही नीटशी आठवत नाही. त्यामुळे हे क्विक गणित करणं मला शक्य नाही. ... हँग ऑन अ सेक ... मेष राशीत सूर्य होता आणि लग्नरास मिथुन असेल तर माझा जन्म दुपारी बाराच्या आत झाला असला पाहिजे. नाही, मला सांगितल्याप्रमाणे जन्मवेळ ती नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

साला लोकाचे धागे कसे हॅक करावेत हे आमच्या अदिती आणि निळ्याला विचारा. शुचि मामी तू नको हो त्यांच्या नादी लागुस. त्या लोकांच्या 'वरपर्यंत' ओळखी आहेत, ते सुटतील आणि तु सापडशील. एकतर तु आपली बिचारी दुर्लक्षीत पँथरवाली असल्याने आधीच तुझ्यावर काही लोकांचा राग राग आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुझी कन्या रास का रे पर्‍या? काय सारखा पोरींसारखा रडतोस रे दुर्लक्षित पाखरा? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निळ्यालाही ते शोधता आलं तर तुला का येऊ नये??
आमच्या समृद्ध पारंपारिक ज्ञानावर उडवलेलेले हे आधुनिकोत्तर ज्ञानाच्या अभिमानाचे शिंतोडे खपवुन घेतले जाणार नाहीत, सांगून ठेवतो!