अस्सल झणझणीत विदर्भातली भाजी येथे देत आहे.
साहित्य : चनादाळ पिठ दिड वाटी, आले लसुन पेस्ट २ टीस्पुन, कीसलेले सुके खोबरे २० ग्राम, तेल १०० ग्राम, कडीपत्ता, हिरवि मिर्चि २, कोथी॑बीर, तिखट, मिठ, हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार.
कृती : चनादाळ पिठात तिखट, मिठ, हळ्द, जिरे स्वादानुसार घालुन भिजवावे. जाडसर पोळी लाटून चौकोनी काप करावेत. कढईत तेल घालुन का॑दा परतावा. त्यात चिरलेली हिरवी मिर्ची ,कडीपत्त,तिखट, मिठ, कीसलेले सुके खोबरे ,आले लसुन पेस्ट ,हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार घालून फोडणी द्यावी.