नाही ... (गझल)
लेखनविषय:
काव्यरस
नाही मला कधीही नव्हते म्हणायचे
'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ?
अवरुन घेत जातो माझ्या मनास मी
तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे
मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी
कोणा कुणास आता मग शांतवायचे ?
घालीत भीक नाही मी संकटा तुला
तू सारखे कशाला दारी फिरायचे ?
माझ्याच काळजाचे खत घातले तरी
कोमेजती ऋतू का माझे फुलायचे
मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू
आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ?
- स्वानंद
वाचने
1444
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
माझ्याच काळजाचे खत घातले तरी
कोमेजती ऋतू का माझे फुलायचे
मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू
आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ?
सुरेख!! खूप आवडली गझल.
घालीत भीक नाही मी संकटा तुला
तू सारखे कशाला दारी फिरायचे ?
माझ्याच काळजाचे खत घातले तरी
कोमेजती ऋतू का माझे फुलायचे
मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू
आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ?
अतिशय सुरेख
मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी कोणा कुणास आता मग शांतवायचे ? माझ्याच काळजाचे खत घातले तरी कोमेजती ऋतू का माझे फुलायचेसुरेख गझल.
मस्त !!! :)
आशय अत्यंत सुंदर.. शब्द अत्यंत सुंदर..
"+आयचे" या रदीफच्या आधी काही ठिकाणी "अ" काही "इ" तर काही "उ" आले आहेत.
"फुलायचे, शिवायचे, विस्कटायचे"
सर्व अ , सर्व इ किंवा सर्व उ असते तर आणखी स्मूथ..
पण तो तर फॉर्मचा भाग झाला..
आशय महत्वाचा आणि तो तर सुंदरच.
माझ्याच काळजाचे खत घातले