दोन क्षण विरंगुळ्याचे - पानशेत
श्रीनिवास च्या भावाबहिणींच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो. पानशेतला त्याच्या बहिणीच फार्म हाऊस आहे. तिथे जमायच ठरलं. पानशेतला मी प्रथमच जात होते. शिवाय श्रीनिवास च्य भावाबहिणींना भेटायची उत्सुकता होती.
सलग सुट्टी आल्याने आम्ही आधी औरंगाबाद - शेगाव दौरा करून साधारण साडेतीन/ चारच्या दरम्यान पानशेतला पोहोचलो. पानशेतच धरण दिसल आणि नंतर दिसणार्या पाण्याने डोळ्यांचा बरं वाटलं. औरंगाबाद, नगर असे रखरखीत प्रदेश पार करून आल्याने या पाण्याच्या नुसत्या दर्शनाने डोळ्यांचा थकवा दूर गेला.गुगल मॅप प्रमाणे चाललो होतो . हळूहळू वस्ती विरळ होऊन डोंगर चढायला लागलो.
मिसळपाव