Skip to main content

बॉडीलाईन - ३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/07/2015 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , अ‍ॅशॅस मालिकेत आतापर्यंत १-१ बरोबरी झाली होती. नाटकाचा तिसरा अंक रंगणार होता तो अ‍ॅडलेडच्या मैदानात! मेलबर्न टेस्टमधील विजयामुळे बॉडीलाईन बॉलिंग सुरवातीला वाटली तितकी धोकादायक नाही असा ऑस्ट्रेलियन प्रेक्षक, पत्रकार आणि क्रीडासमीक्षकांचा ग्रह झाला होता. त्यातच दुसर्‍या इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने शतक झळकावल्यामुळे तर त्याला बॉडीलाईनवर उपाय सापडला आहे अशी सर्वांची पक्की खात्रीच पटली होती.

फक्त बडवे रोखण्याला

लेखक सटक यांनी मंगळवार, 07/07/2015 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !! राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !! तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !! नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !! लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!
काव्यरस

शरदातला स्वित्झर्लंड : ०४ : क्लायनं शायडेक् ते युंगफ्राऊयोख

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/07/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

मिसळपाववर आता मराठीत लिहण्यासाठी अधिक पर्याय

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 06/07/2015 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! सदस्यांकडून आलेल्या अभिप्रायांनुसार सध्याची गमभन प्रणाली काही जणांना गैरसोयीची वाटते. विशेषतः गूगल क्रोम आणि गूगल Input Method वापरणार्‍या आणि विशेषतः मोबाईलवरून लॉग इन करणार्‍या मंडळींना गमभनशी जुळवून घेणे जरा त्रासाचे वाटते. याव्यतिरिक्त गूगल क्रोम वापरताना अक्षरे सरमिसळ होणे अशाही काही अडचणी अनेकांना येतात. काही जणांना inscript कीबोर्ड वापरणे सोयीचे वाटते. अशा सर्व लोकांच्या सोयीसाठी आम्ही आता आपल्याला या तीनही लिहिण्याच्या पद्धतीतून आपल्याला सोयीस्कर वाटेल ती पद्धत निवडण्याची सोय आता देत आहोत. ही Input Method कशा प्रकारे निवडता येईल? अगदी सोपे आहे.

वाट...(शतशब्दकथा)

लेखक योगी९०० यांनी सोमवार, 06/07/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
काहीही झाले तरी मी आज तिच्याकडे जाणार होतो. बराच काळ वाट पाहिली होती... लहानपणापासून तिच्या वाड्यावरून जाताना खिडकीत बसलेली दिसायची. पाहून हसायची, रुसायची, नजरेनेच बोलवायची, पण कोणीच मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. दोन-चार वेळा चोरून तिच्या वाड्यात शिरलो होतो. रखवालदाराने हाकलले,मारले पण ती मात्र कधीच मदतीला आली नाही. मध्यंतरी बराच काळ गेला पण ती मात्र तशीच खिडकीत कायम बसलेली दिसायची. धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो... ती माझीच वाट पहात होती...मला हसून म्हणाली "तुच मरायची वाट पहात होते.

मेंदू

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/07/2015 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू बंद कर पारायणे गीताकुराणाची देवधर्माने अता भंजाळतो मेंदू दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू तू जरा आता नवी होऊन ये दुनिये त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू जीवघेणे तू असे हासू नये राणी तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

कृष्णबन- ४

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 06/07/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी:- कृष्णबन- १ कृष्णबन- २ कृष्णबन- ३ . हजारी घड्याळांच्या घरासमोरुन एक फुलराणीवजा गाडी जाताना दिसली. चौकशी केल्यावर समजले की ती ट्रिबेर्गदर्शनाची गाडी आहे. लगेचच तिच्या थांब्यावर पुढची फेरी कधी आहे ते पाहिले. दहाच मिनिटात पुढची गाडी असल्याचे वेळापत्रक दाखवत होते.

लेह लडाख श्रीनगर ला जातोय--माहिती हवी आहे

लेखक सतिश पाटील यांनी सोमवार, 06/07/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो मिसळपाव वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न करतोय, त्यामुळे काही चुका झाल्यास पोटात घालाव्या, मित्रांसोबत adventure टूर म्हणून बाइक घेऊन लेह लडाख ला जातोय.