Skip to main content

वाट...(शतशब्दकथा)

लेखक योगी९०० यांनी सोमवार, 06/07/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
काहीही झाले तरी मी आज तिच्याकडे जाणार होतो. बराच काळ वाट पाहिली होती... लहानपणापासून तिच्या वाड्यावरून जाताना खिडकीत बसलेली दिसायची. पाहून हसायची, रुसायची, नजरेनेच बोलवायची, पण कोणीच मला तिच्याकडे जाऊ दिले नाही. दोन-चार वेळा चोरून तिच्या वाड्यात शिरलो होतो. रखवालदाराने हाकलले,मारले पण ती मात्र कधीच मदतीला आली नाही. मध्यंतरी बराच काळ गेला पण ती मात्र तशीच खिडकीत कायम बसलेली दिसायची. धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो... ती माझीच वाट पहात होती...मला हसून म्हणाली "तुच मरायची वाट पहात होते. गेली पाचशे वर्ष माझी जागा कोण घेणार ह्याच्याच शोधात होते मी. आज मुक्त झाले मी....."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5755
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

:/ -दिलीप बिरुटे

खासंच!!

मस्तं !!

भन्नाट आणि अचाटही.

आता बसा अजून पाचशे वर्ष वाट पहात, दुसर्‍या गिर्‍हाईकाची, पैजारबुवा,

''लेकिन'' चित्रपट आठवला - त्यातलं गाणं : '' मैं एक सदी से बैठी हुं '' आठवलं . एक शंका : पाचशे वर्षांत एकही लायक व्यक्ती त्या पदावर मिळू नये?

In reply to by खेडूत

पाचशे वर्षांत एकही लायक व्यक्ती त्या पदावर मिळू नये? दुसर्‍या कोणाला ती दिसली नाही हो...मलाच दिसली फक्त...!! बाकी वाट बघतो आहे तुमची वाड्यावर... एखादी बाई दिसली की म्हणतो "बाईSSSS!! वाड्यावर या". पण कोणालाच ऐकू जात नाही माझी हाक..!!

In reply to by योगी९००

एखादी बाई दिसली की म्हणतो "बाईSSSS!! वाड्यावर या".
एकदम निळू फुलेच आठवले. असले ड्वायलाक त्यांनीच म्हणू जाणे!

धावतच तिच्या वाड्यावर गेलो. कोणीच अडवू शकणार नव्हते मला... झरकन तिच्या खोलीत शिरलो...
धावतच या शब्दाच्या अगोदर आज मात्र असे शब्द पाहिजे होते, असे मला वाटते. म्हणजे कथेचा प्रवाहीपणा कायम राहिला असता.

In reply to by जडभरत

तुमचे बरोबर आहे..आज मात्र मुळे अजून चांगला प्रवाहीपणा आला असता पण दोन शब्द दुसरीकडून काढावे लागले असते...