Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] Appraisal

लेखक ब़जरबट्टू यांनी बुधवार, 05/08/2015 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
भडकलाच तो, एव्हढी वर्षे इंतजार केल्यावरही म्यनेजमेंट ने त्याला फक्त "Satisfactory" ग्रेड दिला होता, आणि तो जवान पोट्टा, "Extraordinary" घेऊन त्याचा बॉस बनला होता. त्याने केलेली कामे मोठी होती, आजकालच्या या जवान पोरांसारखा भड़क डोक्याचा नव्हता तो, प्रत्येक कामात प्लानिंग असायचे त्याच्या, त्याला आठवला प्रोजेक्ट पूर्ण केल्यावर भेटलेला शाही Send-off . HRला गाठला त्याने, तोही साला जवानच, तसेही हमउम्र साथीदार फारच कमी होते, अनुभवाची कदरच नव्हती जणू, विशी-तिशीतील पोरांचा भरणा होता फक्त.

[शतशब्दकथा स्पर्धा] वेग

लेखक कहर यांनी बुधवार, 05/08/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
"किती हळू चालवतोस रे. मागचे सगळे गेले पुढे" "जाऊ दे गं. एकतर पावसामुळे रस्ता निसरडा झालाय" "किती घाबरतोस रे जीवाला. लग्नाआधी किती बिनधास्त होतास" "ती गोष्ट वेगळी होती. जबाबदारी नव्हती. आता तू आहेस. पिलू आहे. तुला सांगतो पिलू झाल्यापासून गाडी कधी ४०-५०च्या पुढे न्यावीशी वाटतच नाही. जरा वेग वाढला की ती येते डोळ्यासमोर आणि आपोआप ब्रेकवर पाय जातो" "किती जपतो जीवाला. पण अंधार पडायच्या आत पोचायचे ना. पिलू वाट पहातीये. आता तर पाउस पण वाढायलाय. केवढा आवाज येतोय" "हं.. पण हा पाउस नाही. कसलेतरी बारीक दगड आणि माती पडतीये काचेवर" "गाडी थांबवून बघ जरा" . . . ** काल घाटात चारचाकीवर दरड कोसळून दोनजण ठार**

[शतशब्दकथा स्पर्धा] चांगले दिवस..!!

लेखक योगी९०० यांनी बुधवार, 05/08/2015 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने काळा पैसा भारतात आणल्याने मला जवळजवळ १५ लाख रू. मिळाले होते..!! आज माज करूया म्हणून मी सकाळी उशीरा उठलो. नेहमीप्रमाणे मजूरीला न जाता आंघोळ करून ५ स्टार हॉटेलच्या दिशेने गेलो. जाताना नेहमीच्या टपरीवरील मग्रुर मालकाला डिवचण्यासाठी मुद्दाम थांबलो. चहा प्यायला एक चिटपाखरूपण नव्हते. सगळ्यांकडेच पैसा आल्याने कोणीच या फडतुस टपरीवर थांबणार नव्हते. "मालक एक स्पेशल द्या!!". "स्पेशल??", टपरीवाल्याने नम्रपणे विचारले,"साहेब कालपासून दूध परवडत नाही हो, आज प्लिज साधा चहा घ्या". "आण मग..!! कटिंग नको फुल्ल आण!!", माज मला चढतच होता.

[शतशब्द्कथा स्पर्धा] क्रांती

लेखक जीएस यांनी बुधवार, 05/08/2015 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
फुटेस्तोवर सुजलेली लोकल मंदावली तसा तो हातापयाच्या जेमतेम दोनतीन बोटांची पकड घट्ट करून जिवाच्या आकांताने लोंबकळू लागला. दारादारातून शिट्ट्या वाजल्या. रुळाकडेला बसलेली ती शरमेने अर्धमेली झाली. आतला बाहेरचा प्रत्येक जण असाच आपापल्या नरकात तुंबलेला. 'अरे हे काय जिणं आहे का?' त्याला लोकल गदागदा हलवून आत चिणलेल्या प्रत्येक मुडद्याला खडसावून जागे करावेसे वाटले.

मैत्र झुलवून बघ

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 05/08/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती

अगदी खर्री लोकशाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 05/08/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
“लोकशाही म्हणजे रे काय, भाऊ?” “अरे, लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, अनेक छोटी मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक चर्चा-वाद झाले आहेत. त्यातून काही माहिती मिळेल ती मिळेल. पण तुला थोडक्यात सांगतो. लोकांनी केलेलं, लोकांसाठी केलेलं, लोकांचं राज्य ती लोकशाही. ती आपल्या भारत देशात आहे, ती अमेरिकेत आहे, ती युरोपात आहे, ती अनेक पश्चिमी देशात आहे. तिलाच लोकशाही म्हणतात!” “मग ही लोकशाही निरनिराळ्या प्रकारची असते का रे भाऊ?” “हो, अगदी बरोबर.

[शतशब्दकथा स्पर्धा] नवनिर्माण

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 04/08/2015 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
भर पावसात चहूबाजूच्या सह्यकड्यांतील गहन शांततेला तीक्ष्ण बोचकारे काढत मशीनचा अजस्र हात आडवातिडवा फिरत होता. झाडं फाटून, उन्मळून पडत होती. डोंगराची ओली माती चामडी सोलावी तशी विदीर्ण होत उपसून निघत होती. खळाळणारे पाणी नव्या खड्ड्यात बिचकून थांबत रस्ता शोधत होते. ताठ-कॉलर-शुभ्र-लुंगीवाला हाताची घडी घालून ते एकटक पहात होता. बाजूचा मळकट-लेंगेवाला दाढीचे खुंट खाजवत चुळबुळत होता. हिरव्यागर्द झाडोर्‍याची खांडोळी करत मशीन डोंगराआड गेले. त्याचा दबलेला आवाज जणू दूरच्या समुद्रगाजेसारखा गूढ झाला. लुंगीवाला वळून म्हणाला, "तुम मराठी लोग बहूत लेझी...!

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

[शतशब्दकथा स्पर्धा] शाप

लेखक माझिया मना यांनी मंगळवार, 04/08/2015 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मोहिनी देवी सुन्न होऊन बसल्या होत्या. भविष्यातील भयंकर घटनांच्या चाहुलीने थरकाप झाला होता त्यांचा. ही जहागीर अजून किती बळी घेणार कळत नव्हते. सरकारांना परोपरीने सांगूनही जहागिरीचा मोह सुटत नाहीये.. का ही जहागीरच त्यांना सोडत नाहीये ? त्यांना आठवला तो सावत्र सासू राजलक्ष्मी देवींचा शाप.. आज खरं तर आनंदाचा दिवस..त्यांचा मुलगा अजिंक्यराजे ज्याला शिकायला दूर ठेवले होते तो त्याच्या पसंतीच्या मुलीला दाखवायला घेऊन आलाय.. राजश्री..मुलगी साध्या घरची पण स्वरूप सुंदर.. आपल्या घराण्यात शोभून जाईल..पण त्या पुन्हा नखशिखान्त थरकापल्या..

[शतशब्दकथा स्पर्धा] काळजाचा ठोका

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 04/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"झालं सगळं! आपल्या हक्काच्या घरात रहायला येणार आता आपण." संकेत आनंदी होता. "हो ना, पण कर्ज खूप मोठं आहे रे. आपल्याला झेपेल ना हे?" सानिकाच्या स्वरात काळजी डोकावत होती. "काळजी नको करूस. सॉरी, तुझ्या आवडत्या बांगड्या मात्र विकाव्या लागल्या..." "नो प्रॉब्लेम! बांगड्या पुन्हा करता येतील.” "हम्म…कर्जाचा ईएमआय थोडा कठीण जाईल. बघू, महिन्याभरात माझं प्रमोशनही होईल बहुतेक..." दुसऱ्या दिवशी सकाळी संकेतच्या मोबाईलवर कंपनीच्या एमडीचा फोन आला. संकेतला ताबडतोब भेटायला बोलावलं होतं.