Skip to main content

[शतशब्द्कथा स्पर्धा] क्रांती

लेखक जीएस यांनी बुधवार, 05/08/2015 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
फुटेस्तोवर सुजलेली लोकल मंदावली तसा तो हातापयाच्या जेमतेम दोनतीन बोटांची पकड घट्ट करून जिवाच्या आकांताने लोंबकळू लागला. दारादारातून शिट्ट्या वाजल्या. रुळाकडेला बसलेली ती शरमेने अर्धमेली झाली. आतला बाहेरचा प्रत्येक जण असाच आपापल्या नरकात तुंबलेला. 'अरे हे काय जिणं आहे का?' त्याला लोकल गदागदा हलवून आत चिणलेल्या प्रत्येक मुडद्याला खडसावून जागे करावेसे वाटले. तिला संडास नसलेली ती वस्तीच शेकडो डोळ्यांनी डसणार्‍या लोकलसकट पेटवून द्यावीशी वाटली. 'वाटतं, साध्या जगण्यासाठी मरेस्तोवर् पिळणारी ही व्यवस्था उध्वस्त करावी.' तो ठामपणे म्हणाला. 'वाटतं, अब्रूने जगू न देणारा समाज फोडून सरळ करावा.' ती निर्धाराने. 'बास, ठरलं ! हे सगळच बदलावं' त्याच्या तिच्यासह अनेक आवाज निश्चयाने गर्जले, 'कोणीतरी...'

वाचने 6280
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

+१ आवडली.

+१

+१

+१

+1

+1

+१

+१

+१

+१

+१

..

+१

मस्त +१

+१

+१

+१

खुप छान आहे कथा.. बेस्ट.. +१११

शेवटातील 'कोणीतरी' या एकाच शब्दाने बाकी ९९ शब्दांना तोलुन धरले आहे!

In reply to by gogglya

+१

In reply to by gogglya

+१

+१

+१

+१

+१ वा!

+१

अप्रतिम!

+१

+१

+१

+१

+१

सर्व प्रतिसाददाते, मतदाते आणि वाचक यांचे आभार. एवढा प्रचंड प्रतिसाद मिळवणारी ही अभिनव स्पर्धा सुरू केल्याबद्दल संपादक आणि संयोजक यांचेही आभार.

+१

+१

+१

चाबुक...