मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी ·
लेखनप्रकार
२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.

व्हेनेझुएला

खटपट्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला. मी - काय रे इतक्या सकाळी ? बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना ! बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो. मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ? बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ? मी - नाही ! बंडू - देश आहे एक.

शहाणपण शोधतो मी...

बाजीगर ·
लेखनविषय:
Intelligence is abundant in the world, I'm searching wiseness...  जगात, बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी | मोठेपणा खूप झालाय,  लहानपण शोधतो मी | तर्क कुठे उगाळावा,  सहाण पण शोधतो मी | माणुसकी ची पाणपोई, तहान पण शोधतो मी | प्रत्येक उत्तर chat gpt ला, विचारणाऱ्या पिढीच्या, छद्मी AI पासून दूर नेणारे, वाहन पण शोधतो मी | शुष्क तार्किक संवादात, मायेचा ओलावा कळेना, जुन्या अडाणी प्रेमाचा, जहाँ पण शोधतो मी | बुद्धिमत्ता खूप झालीय,  शहाणपण शोधतो मी |

सहज सुचले ते...

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहजच जसे सुचले तसे... सुकतातची जगिया.. मृत्यू आणि जीवन यावर आजवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. काही जण मृत्यूला काडीचीही किंमत देत नाहीत त्यामुळे त्यांच्या मते जन्मालाही फारसे महत्त्व उरत नाही. उदा. काफ्का काय म्हणतो ते पहा -"ते कधितरी थांबते" एवढाच आयुष्याचा अर्थ आहे... काफ्का मृत्यूबद्दल फारच अलिप्तपणे विचार करतो आहे असे दिसते. काफ्काच्या सगळ्या कथांमधून आणि कादंबऱ्यांमधून आपल्याला हाच दृष्टीकोन पाहण्यास मिळतो.