मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती. ती आता यूट्यूब वरती आहे. या डॉक्युमेंटरी मधे शुक्ल यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे झाडांशी असलेले खास नातं आलं आहे. एके ठिकाणी तशा सुंदर फ्रेम्स आहेत. झाडांच्या. शेवटी शुक्ल झाडांच्या पार्श्वभूमीवर देखील बसलेले असतात गच्चीवर. अगदी एकमेकांपासून अलग करता येणार नाही इतके त्यांचे त्यांच्या परिसराशी आणि झाडांशी घट्ट नातं आहे असं जाणवत राहतं. खूप मोठं बोलून जातात शुक्ल आणि त्यांचा मुलगा देखील. शुक्ल यांच्या स्टाईल मधे एक कविता सुचली. - - - मी झाडाला पाहत आहे, झाड मला पाहत आहे, मी कॅमेऱ्यातून झाडाला पाहत आहे, झाड आम्हा दोघांनाही पाहत आहे. मी झाडाकडे पाहताना मला पाहतो आहे, मी मला पाहताना पुन्हा झाडाकडे पाहत आहे. मी फांद्यांच्या नक्षीतून झिरपणारे उन्ह पाहत आहे, उन्ह झाडांना, झाडांच्या आडून मला पाहत आहे. मी माझ्या कॅमेऱ्याला हृदयाशी धरले आहे, मी झाडाला देखील माझ्या हृदयाशी धरले आहे. झाडाने मला, कॅमेऱ्याला, या अगणित पशुपक्ष्यांना केव्हाचे हृदयाशी धरले आहे. आणि उन्हाने या झाडांना केव्हाचे हृदयाशी धरले आहे. हेच उन्ह माझ्या हृदयातून देखील प्रकाशते आहे.

वाचन 473 प्रतिक्रिया 0