Skip to main content

माझी ज्यूरी ड्युटी - ९

लेखक शेंडेनक्षत्र यांनी मंगळवार, 24/05/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ शेवटी दोन्ही वकिलांनी आपापल्या बाजू पुन्हा एकदा मांडल्या. सरकारी वकिलाने असे सांगितले की ह्या महिलेला मारहाण झालेली आहे, जीव घेण्याची धमकी दिली गेली आहे. तिच्यावरील जीवघेण्या आपत्तीमुळे तिच्या जबाबात त्रुटी होत्या पण मानवी मन हे अशा भयंकर घटना विसरायचा प्रयत्न करत असते त्यामुळे तसे घडले. विविध छायाचित्रे आणि डॉक्टरांच्या जबानीवरून हे दिसते आहे ह्या महिलेवर अत्याचार झालेले आहेत. तिला न्याय मिळायलाच हवा. तुम्ही तिला न्याय द्या. आरोपीच्या वकिलाने असे म्हणणे मांडले की आरोपीला विनाकारण गोवले आहे.

एक ओपन व्यथा ३

लेखक वटवट यांनी मंगळवार, 24/05/2016 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 ---------------------------- "चहा… "……. " "ओ साहेब…" "………" "साहेब चहाSSSS…" जोरात चहाचा कप वाजवत कांबळे थोडेस्से ओरडलेच. "हंह…. हं……." पाटलांनी दचकुन वर पाहिले. तर कांबळे चहा घेऊन उभे. "अहो काय साहेब… कित्ती वेळ?? पिंट्या येउन कधीचा गेला… चहाचं पार गोमुत्र झालंय बगा… कसल्या तंद्रीत होता?" "अरे हां रे… ते हे….

ऊपनिषदे-३

लेखक शरद यांनी मंगळवार, 24/05/2016 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

शृँगार १४

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 24/05/2016 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत .

अनिला

लेखक abhajoshi14 यांनी मंगळवार, 24/05/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज जेल मध्ये पोचल्या पोचल्या एक वेगळीच केस हाताळावी लागली. एक चाळीशी उलटून गेलेला माणूस समोर अपराधी म्हणून बसला होता. त्याचा अपराध म्हणजे चोरी आणि लबाडी. एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये तो शेफ म्हणून नोकरीला होता. महिन्याला तीस हजार पगार होता. पण हाव फार वाईट गोष्ट असते. मालकाचा विश्वास संपादन करून एक दिवस त्याने हॉटेल मधला माल लंपास करायला सुरुवात केली. त्या मालाला विकून त्यातून मिळालेल्या पैश्याने स्वताची व्यसनावर झालेली उधारी मिटवली. त्याचे नावे अनिल परचुरे. हॉटेल व्ययसाय मधील पदवी घेतलेला आणि बरीच वर्ष परदेश मध्ये नोकरी करून परत आलेला.

साकेगांवचे साकेश्वर मंदिर, चिखली जवळ, जिल्हा बुलढाणा

लेखक Parag Purandare यांनी मंगळवार, 24/05/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपासून अंदाजे १०/१२ कि.मी अंतरावर सातगांव आणि साकेगांव ही दोन अप्रतिम प्राचीन मंदिरे असलेली गावे आहेत. आज आपण त्यातल्या साकेगांवचे साकेश्वर मंदिर बघु.   साकेगांवाच्या पश्चिमेला गावाबाहेर एका टेकडीच्या पायथ्याजवळ हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या आजुबाजुला स्थानिक शेतक-यांची शेते आहेत. मंदिर शंकराचे असुन एका मोठ्या प्रांगणात आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराचा मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा प्लॅन आहे.

जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे) - विडंबन

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 24/05/2016 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा' काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना... डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना... नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना... (इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.

नस्त्या उचापती- 2

लेखक अन्नू यांनी मंगळवार, 24/05/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारचा दिवस. संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.

आम्ही मुळ्ळी रागावत नाही!

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 24/05/2016 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. ) काय सांगू तुम्हाला! अशी एकेक विचित्र माणसं असतात ना. परवाचीच गोष्ट. आमच्या ह्यांच्या एका स्नेह्यांकडं गेलो होतो, आमच्या बंटीला घेऊन. बंटी? अहो आमचा सुपुत्र! वय वर्षे साडेतीन. पण इतका हुश्शार म्हणून सांगू, भाssरी चौकस! हं, तर त्यांच्या शोकेसमध्ये इतक्या वस्तू होत्या ना! स्वित्झर्लंडची घंटा, हॉलंडची पवनचक्की, युरोपातल्या काचेचा पेला, काय अन काय! आता लहान मूल म्हटल्यावर जिज्ञासा की काय म्हणतात ते असणारच नाही का?