Skip to main content

विंगेत गलबला - पुष्कर श्रोत्री आले बरं का !!

लेखक ढ.अदिती यांनी सोमवार, 16/01/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
*/

पुष्कर श्रोत्री हे नाव मराठी प्रेक्षकाला नवं नाही. महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून सुरुवात करून इथवर पोहोचलेला एक गुणी कलाकार. हजारो - लाखो प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करणार्‍या एका नामवंत टीव्ही-सिने-कलाकाराला आमच्या ३०००० लोकांसाठी "मुलाखत द्याल का हो?" असं विचारल्यावर एकदम "अरे देऊ की! का नाही?

दक्षिण घळ भाग 7 (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/01/2017 00:53 या दिवशी प्रकाशित केले.

दक्षिण घळ भाग 6

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 15/01/2017 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण घळ भाग 1 दक्षिण घळ भाग 2 दक्षिण घळ भाग 3 दक्षिण घळ भाग 4 दक्षिण घळ भाग 5 दक्षिण घळ भाग ६ "अहो... मी इथे अडकून पडले आहे. कोणी मदतीला नाही आहे. मला इथून बाहेर पडायचे आहे पण रस्ताच माहित नाही.

गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 14/01/2017 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायणमामा ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला आहे.

हवा हवाई फलाफल

लेखक लीना कनाटा यांनी शनिवार, 14/01/2017 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
उपकरण : एअर फ्रायर कृती : फलाफलचे रेडीमिक्स विकत आणावे. वेष्टणावर दिलेल्या प्रमाणात रेडीमिक्स मध्ये पाणी घालून मळावे. त्याचे छोटे गोळे करून टिक्की सारखा आकार द्यावा. खरंतर फलाफल साधारणतः गोल छोट्या चेंडू सारखे असतात परंतु एअर फ्रायरच्या सोइ साठी टिक्कीचा आकार दिला. फलाफल तेलात न तळता हवेवर तळावेत ( कि हवावेत? ). या फलाफल टिक्क्या एअर फ्रायर मध्ये ठेवून ऑलिव्ह ऑइलचा ईस्प्रे मारावा आणि २० मिनिटे एका बाजूने तर १५ ते १८ मिनिटे दुसऱ्या बाजूने तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत टाळावेत. फलाफलला तळायला ( कि हवायला ? ) जास्त वेळ लागतो असा अणभव आहे.

शेजाऱ्याचा डामाडुमा -एक होते हिंदू राष्ट्र- एकीकृत नेपाळची जडणघडण आणि शाह राजवट - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी शनिवार, 14/01/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

आईचा तिळगूळ

लेखक नूतन यांनी शनिवार, 14/01/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची कामं आटोपून, मस्त आल्याच्या चहाचे घोट घेत, वर्तमानपत्र हातात घेतलं. आजचच आहे ना बघण्यासाठी तारीख बघितली, १३ जानेवारी २०१७ (आम्ही इतके शिस्तीचे नाही बरं, कुठल्याही तारखेचं वर्तमानपत्र हाती येऊ शकतं) अरे बापरे! म्हणजे उद्या १४ जानेवारी, मकर संक्रांत! तिळगुळ करायचा राहुनच गेलाय अजून. आळस झटकून मी उठले. तिळगुळाचं साहित्य साटपपणे कध्धीच आणुन ठेवलं होतं पण परिक्षेचा अभ्यास कसा आदल्या दिवशी, ताजा ताजा करायचा असतो, मी तिळगुळही तसाच करते, अगदी ताजा ताजा. तर मग मी तयारी सुरू केली. साहित्याची मांडामांड केली. एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवली, उलथणं काढुन ठेवलं, पाव किलो पॉलिश तीळ एका भांड्यात ओतले.