Skip to main content

स्त्रीच असते बलात्कारी पुरूषाची आई...

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे (संदर्भ: खैरलांजी बलात्कार, दिल्ली बलात्कार, मुंबई बलात्कार, कोपर्डी बलात्कार, दिल्ली-बँगलोर विनयभंग, जगात रोज होणारे हजारो विनयभंग आणि बलात्कार...) एका स्त्री पासून होतो प्रत्येक पुरूषाचा जन्म एक स्त्री असते प्रत्येक पुरूषाची आई एक स्त्रीच असते कोणत्याही लिंगपिसाट बलात्कारी पुरूषाची आई सुध्दा म्हणून आईने सांगायला हवं आपल्या लाडल्याला सुचकतेने घरात: :बाळा, जशी मी आई आहे तुझी जशी तुझी बहिण राहते तुझ्यासोबत घरात तशाच तुला बाहेर भेटतात त्या स्त्रियाही आमच्यासारख्याच आहेत मनाने- भावनेने- शरीराने तुला काही आवडतील आकर्षणही वाटेल काहींचे आणि तसं आकर्षण वाटणं स्वाभाविक - नैसर्गिक आहे, गैर नाही... तू मैत्री करशील काहीं स्त्रियांशी तुझी पत्नी होईल पुढे कुठली तरी स्त्री... स्त्रियांशी मैत्री जरूर कर.. चर्चा कर वाद घाल.. लैंगिकतेवर सुध्दा बोल पण तिच्यावर लादू नकोस तुझे विचार बळजबरी करू नकोस कोणत्याही स्त्रीवर (‘बलात्कार’ शब्द टाळावा त्याला कळेल तुम्हाला काय म्हणायचं ते.) नकारही देईल एखादी स्त्री तुझ्या मैत्रीला तरी अपमानाच्या बदल्यात सूडाची भावना ठेऊ नकोस कितीही निकोप असला तुझा दृष्टीकोन तरी तिच्या मनातलं वादळ असू शकतं निराळं खात्री आहे मला की तू असं धाडस कधी करणार नाहीस सावध कर तुझ्या इतर मित्रांनाही अशा धाडसांपासून वास आलाच असा तर तू मदतीला धाऊन जा धोक्यात मदत मागत असेल रस्त्यावर कोणी असहाय्य स्त्री वा पोचवायचं असेल इस्पितळात एखाद्या अपघातग्रस्ताला तर मदत कर हातातलं काम सोडून... - असं किती महिलांनी सांगितलं मुलांना विश्वासात घेऊन? नसेल तर आता सुरूवात करायला हवी.. अर्थात पुरूषांनीही... हा ही आहे एक वैश्वीक संस्कार, तो करूया. (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
पाटीलभाऊ

खात्री आहे मला की तू असं धाडस कधी करणार नाहीस सावध कर तुझ्या इतर मित्रांनाही अशा धाडसांपासून
बलात्कार कारण हे धाडस आहे ??????? शब्द जपून वापरा डॉ.
16/01/2017 - 17:58 Permalink