Skip to main content

हवा हवाई फलाफल

लेखक लीना कनाटा यांनी शनिवार, 14/01/2017 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
उपकरण : एअर फ्रायर कृती : फलाफलचे रेडीमिक्स विकत आणावे. वेष्टणावर दिलेल्या प्रमाणात रेडीमिक्स मध्ये पाणी घालून मळावे. त्याचे छोटे गोळे करून टिक्की सारखा आकार द्यावा. खरंतर फलाफल साधारणतः गोल छोट्या चेंडू सारखे असतात परंतु एअर फ्रायरच्या सोइ साठी टिक्कीचा आकार दिला. फलाफल तेलात न तळता हवेवर तळावेत ( कि हवावेत? ). या फलाफल टिक्क्या एअर फ्रायर मध्ये ठेवून ऑलिव्ह ऑइलचा ईस्प्रे मारावा आणि २० मिनिटे एका बाजूने तर १५ ते १८ मिनिटे दुसऱ्या बाजूने तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत टाळावेत. फलाफलला तळायला ( कि हवायला ? ) जास्त वेळ लागतो असा अणभव आहे. फलाफल आतून सॉफ्ट परंतु बाहेरून अतिशय क्रिस्पी होतात. या बरोबर त्झाटझीकी, त्झातझिकी, त्झाट्झकी, झाझीकी, सासिकी, छाचिकी, चाचीक्की - enough of it - Tzatziki सॉस असेल तर उत्तमच (आम्ही याला "झकाझकी" सॉस म्हणतो). झकाझकी सॉस नसेल तर हमूस, हामूस, हुम्मुस, हमस, हमास, हंमास, हम्मस, हंम्मस, who-moss, hum-moose, hum-oose, homos, hamas, hoommos, hummoos, home'-os , hum-mos - enough of it again - Hummus डीप देखील चालेल (याला डीप म्हणावे, सॉस म्हणावे कि सरळ चटणी म्हणावे ??) . मोबल्याने एक, दोन फटू खेचावेत आणि फलाफल टिक्क्यांचा गिल्ट फ्री फन्ना उडवावा. यथावकाश फटू येथे शेअर करावेत. हवा हवाई फलाफल

वाचने 9256
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्तय पाककृती.. पण या सोबत ते पिटा/पीटा का पिता (वडील नव्हे)/पीता आसेच त्या ब्रेडचे नाव आहे तो ब्रेड नाही का? त्या ब्रेडमधे घालून खातात न फलाफल?.... मी तर आसेच ऐकले आहे ब्वा...

In reply to by फेदरवेट साहेब

वरच्या डिकरा सारखेच शेम टु शेम बोलतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey

In reply to by फेदरवेट साहेब

ओपी डीक्रा, आजकाल इन्स्टंट चा जमाना हाय नी, पोरे लोकांस्नी समदे इन्स्टंट लागतें. आन तसं बी आपुन न्यू हाय ना मिपा मंदी. शिशु शाळंचा धागा वाचला कि नाय? शिक्शान चालू हाय नि मिपा शाळं मंदी, तवा धीरे धीरे समझलच ट्रिक्स ऑफ द मिपा ट्रेड. बाकी पिंक टाकला ह्ये ब्येस क्येला, मिष्टेक तर ध्याना मंदी आली नी. आन ते दुजा बे डिक्राने तमे मंजुरी दि ना के, ते लोकांस्नी बी धन्स. बोल्लेतो, निंदकाचे ट्रोल असावे धाग्याला ह्ये ब्येस हाय.

In reply to by लीना कनाटा

हे बरंय. मी नवी मी नवी करत दुसऱ्याला ट्रोल म्हणणे. शिशुशाळा काय आहे ते काही मी वाचलेले नाही अन तुमचे एकंदरीत ऍटीट्युड पाहून वाचायची इच्छा ही उरलेली नाही. तुमचा इन्स्टंटचा सोस तुम्हाला(च) लखलाभ.

200 ग्राम कबुली चणे रात्री भिजत घालावेत, सकाळी निथळून पाणी न घालता वाटावेत वाटताना त्यात 1 मोठा कांदा, 6 7 लसूण पाकळ्या, घालावे नंतर त्यात मीठ, थोडे तिखट, हवी असल्यास कोथिंबीर चिरून घालावी बायण्डिंग साठी थोडे बेसन (गरज असेल तर)घालावे आणि एअर फ्रायर मध्ये टिक्क्या करून तळाव्यात झाझिकी : 1 काकडी किसून, त्यात 3 4 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालाव्यात आणि घट्ट दही आणि मीठ घालून मिक्स करावे

In reply to by फ्रेनी

हो! सामान्य वाचक यांनी दिलेली रेसिपी छानच आहे. करण्यासारखं काहीतरी आहे त्यामुळे नक्कीच करुन बघणेत येईल.