[शतशब्दकथा स्पर्धा] चांगले दिवस..!!
सरकारने काळा पैसा भारतात आणल्याने मला जवळजवळ १५ लाख रू. मिळाले होते..!!
आज माज करूया म्हणून मी सकाळी उशीरा उठलो. नेहमीप्रमाणे मजूरीला न जाता आंघोळ करून ५ स्टार हॉटेलच्या दिशेने गेलो. जाताना नेहमीच्या टपरीवरील मग्रुर मालकाला डिवचण्यासाठी मुद्दाम थांबलो. चहा प्यायला एक चिटपाखरूपण नव्हते. सगळ्यांकडेच पैसा आल्याने कोणीच या फडतुस टपरीवर थांबणार नव्हते.
"मालक एक स्पेशल द्या!!".
"स्पेशल??", टपरीवाल्याने नम्रपणे विचारले,"साहेब कालपासून दूध परवडत नाही हो, आज प्लिज साधा चहा घ्या".
"आण मग..!! कटिंग नको फुल्ल आण!!", माज मला चढतच होता.
मिसळपाव