Skip to main content

रानडे काका...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
रानडे काका... बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे. दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

जमेल तितकं सांग...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितकं सांग... बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग किती अक्षरं आली, आणि पुसली, कधी हसली अन कधी रुसली कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय कधी आई बाबांचा, कधी आजी आजोबांचा, कधी मित्रमैत्रणींचा, काही मोठे काही छोटे... आठवणींचे कधी... कधी स्वप्नांचे थवे सोडतोय. आत्ताचा क्षण सरपण सेकंदा पूर्वीचा...
काव्यरस

हुश्शार छोकरी

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 14/11/2015 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्शार छोकरी [म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.] आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’ राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले, ‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’ ‘होय, महाराज! आहेच ती!’ राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने.

उद्दाम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 14/11/2015 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
ना गावही तो राहिला ठाम पहिल्यासारखा ना काळही भासे अता उद्दाम पहिल्यासारखा त्या वादळाला सांग ना थांबायला आता जरा प्रगतीस नाही वेग तो बेफाम पहिल्यासारखा आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्या नाही जमाना राहिला बदनाम पहिल्यासारखा झालो अता बघ मोकळा वागायला मजसारखा ना राहिलो माझ्यात मी सुतराम पहिल्यासारखा जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा विशाल
काव्यरस

ICU- २

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 13/11/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
वि. सू. :- ICU-१ कुठे आहे विचारू नये. "पेशंट हळूहळू माणसात येतोय, डॉक्टर क्षीरसागर! सुधारणा आहे, डॉक्टर!" " माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड करत असतो सतत येडझवा आहे!!" (आज सारखे सारखे आपलेच शब्द मागे घ्यावे लागताहेत राव. ) "सॉरी.... नो सुधारणा !
काव्यरस

डोकं दुखून भणभण पायो

लेखक सागरकदम यांनी शुक्रवार, 13/11/2015 15:48 या दिवशी प्रकाशित केले.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 13/11/2015 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. पहिलं अर्धशतक सायकल! एक साधी वस्तु. २००३ मध्ये आयुष्यातून सायकल निघून गेली. कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस सायकलीचा वापर केला. पण मोठ्या शहरामधील गर्दीमध्ये सायकल चालवू शकलो नाही आणि २००३ मध्ये सायकल सुटली. पण त्याच आयुष्याने परत एकदा सायकलीला समोर आणलं- २०१३ मध्ये!

कै च्या कै कविता ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/11/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता... कधी मुक्यानेच बोलणारी कविता, तर कधी बिअरसवे डोलणारी.. येता जाता माफी मागणारी कविता....! झुरळावर स्वार होवून जोमाने ढेकणावर चढाई करणारी कविता.. आरसे फोडत, वादळात सापडत.. सिगरेटी फुकायला लावणारी कविता...! अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन् गोमुत्राची चव शिकवणारी कविता.. आमच्यासारखे समिक्षक असताना.. सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..! गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! डोळ्यासमोरून अलगद फिरताना.. डोक्यावरून जाणारी कविता.. आमच्या मंद डोक्यात मंदपणे.. कै च्या

कट्यार - खरोखर काळजात घुसली

लेखक श्रीरंग यांनी गुरुवार, 12/11/2015 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल. ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान.