Skip to main content

जमेल तितकं सांग...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितकं सांग... बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग किती अक्षरं आली, आणि पुसली, कधी हसली अन कधी रुसली कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय कधी आई बाबांचा, कधी आजी आजोबांचा, कधी मित्रमैत्रणींचा, काही मोठे काही छोटे... आठवणींचे कधी... कधी स्वप्नांचे थवे सोडतोय. आत्ताचा क्षण सरपण सेकंदा पूर्वीचा... ती आठवण आठव अजुन आठव... पानांत अजुन साठव बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग जमेल तितकं सांग ‪#‎सशुश्रीके‬ www.sashushreeke.blogspot.ae/2015/11/blog-post_13.html
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 732
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया