Skip to main content

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 22/11/2015 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
जिलब्या इथे कुणाला का आवडू नये? वादात या कुणीही सहसा पडू नये लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला... हातात आज धोंडा या सापडू नये... गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू आधीच सांगतो मी, कोणी नडू नये राजाच मी मनाचा, हासू नका कुणी खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये.., तूही जरा चरावे, मीही चरेन ना, बेकार भांडणांनी दोघे सडू नये नाहीस तू तरीही आहे निवांत मी, माझ्याविना तुझेही काही अडू नये, वागा हवे तसे रे, जखमा नका करू वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...  नव-हझलकार इरसाल म्हमईकर
काव्यरस

मुंबई-पुणे-मुंबई 2

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 22/11/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे-मुंबई=2 मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला. "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले मराठी चित्रपट असले तर आजच्याहि जमान्यात मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात.

सबनीस जिंकले, रसिक हरले!!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 22/11/2015 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये. तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती.

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 22/11/2015 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

धडा

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 22/11/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट . आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं.अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळविची तयारी सुरु झाली.

योजना

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 22/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्रांची मानसिकता खरी असली तरी दुर्दैवाने योजना काल्पनिक आहे) मंत्रीन् बाईंनी फर्मान काढलं तशी कागदं वरुण खाली अन खालुन वरती फिरली. योजनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. खेड़ोपाड़ी शिक्षण सेविका पदर खोचुन उभा ठाकल्या. पाट्या, पुस्तकं पोहचली. भत्ते सुरु झाले. शाळात लाइटं लागली. दिवसभर राणात् राबनारी हातं रातच्याला लेखान्या धरु लागली. वर्गा वर्गातून बांगड्याची सळसळ वाढू लागली. पण जेव्हा गणना झाली, टक्केवारी हाती आली तेव्हा बाई हदरल्याच. पाण्यासारखा पैसा ओतून, मोठी फौज उभारुण फ़क्त दहा टक्केच बाया शाळात येतात, हे ऐकून बाईंच्या डोक्यात आग आग झाली.

एक कविता मनाची.......

लेखक मयुरMK यांनी रविवार, 22/11/2015 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक कविता मनाची एक कविता जनाची मना वाटते, राजा मी व्हावे जन म्हणती, तू रंकचि रहावे- एक कविता स्वप्नाची एक कविता सत्याची स्वप्न म्हणे, गगनात विहरावे सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे - एक कविता नात्याची एक कविता जातीची नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय जात म्हणे, कोण हां परकीय- एक कविता प्रश्नाची एक कविता क्षणाची प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही- ही कविता जीवनाची ही कविता मरणाची जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -
काव्यरस

गॅलरी .....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/11/2015 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

ख्वाडा.....रामराम देवा!! ताणुन मारीन..!!

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/11/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
गावोगावच्या डोंगरदऱ्या, माळरानावर मेंढरं चरत राहतात. पाठीमागं घोडं, बैलगाडीवर संसाराच गाठोडं घेऊन 'धनगरडे' चालत असतात. संध्याकाळी एखाद्या पाण्याच्या रानात मुक्काम ठोकतात. वाऱ्या-कावदानात चुल पेटवली जाते. धगधगता निखारा पेटलेल्या भुकेल्या विझवत राहतो. चांदण्या राती थकलेले जीव गारगार झोपतात. मग पुन्हा सकाळी चारणीला मेंढरं घेऊन पाडा पुढच्या गावाला चालत राहतो. मेंढपाळांचं हे रोजचं आयुष्य. पिढी दरपिढी चारणीचा रुळलेला रस्ता. याच रस्त्यावर कित्येक खाचखळगे, काटेकुटे, दगडधोंडे लागतात.

कवितांजली

लेखक मयुरMK यांनी शनिवार, 21/11/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी न कवी, न लिहणे माझा पेशा जीवनी कधी रमता, कधी उदास होता छंद म्हणोनी खेळतो खेळ हा शब्दांचा छंदातुनी जन्म या कवितांजलीचा .