आला आला जिलबीवाला

Primary tabs

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
23 Nov 2015 - 11:39 am

आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला

साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला

चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला

आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला

जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला

- स्वामी संकेतानंद जलेबीवाले

हझलधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयव्याकरणव्युत्पत्तीशुद्धलेखनसुभाषितेसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासराहती जागानोकरीविज्ञानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षण

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 11:51 am | पगला गजोधर

वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या,
तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले,
रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें,
श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं,
आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 12:14 pm | नीलमोहर

किती दिवसांनी ऐकलं हे गाणं..
भोंडल्यातील आवडत्या गाण्यांपैकी आहे हे,
पण ते श्री कांता, कमल कांता असंय ना ?

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 12:16 pm | पगला गजोधर

श्री कांता, कमल कांता असंय

टायपो..

स्वामी संकेतानंद's picture

23 Nov 2015 - 3:14 pm | स्वामी संकेतानंद

हे माहीत नव्हते.
भन्नाट आहे!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2015 - 8:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्वामीजी भुलाबाई चे गाणे म्हणतेत न बे आपल्याइकळे!

मठ्ठ्याशिवाय जिलेबी विकत नाही आपण. मान्य असेल तर २ किलो घ्या.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2015 - 11:58 am | अत्रुप्त आत्मा

हही हही हही !
स्वामिज्जि की महान रचनाएँ

विशाल कुलकर्णी's picture

23 Nov 2015 - 12:34 pm | विशाल कुलकर्णी

आलास का तू पण ...

स्वामी संकेतानंद's picture

23 Nov 2015 - 1:52 pm | स्वामी संकेतानंद

अर्रर्र
आमची प्रेरणा 'विकु मांत्रिक' हे लिहायचे विसरलोच बघ!

मांत्रिक's picture

23 Nov 2015 - 2:04 pm | मांत्रिक

विकु मांत्रिक म्हणजे काय भौ!

स्वामी संकेतानंद's picture

23 Nov 2015 - 2:13 pm | स्वामी संकेतानंद

ते वरिजनल मांत्रिक हायति

विशाल कुलकर्णी's picture

23 Nov 2015 - 2:52 pm | विशाल कुलकर्णी

जानादेव स्वामीजी, नया (मांत्रिक) है वह...

(मांत्रिकभौ, हलके घ्या हो )

पैसा's picture

23 Nov 2015 - 12:36 pm | पैसा

झिंगालाला हु =))

गेला गेला जिल्बिवाला ऐसा बदल करावा ऎसे सूचवते ;)

बाबा योगिराज's picture

23 Nov 2015 - 7:57 pm | बाबा योगिराज

मले मावा वाली जिबली....

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Nov 2015 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

तू बी आला का भुसनळ्या स्वाम्या !

*डोळे झाकलेले माकड़ स्माइली*