टीप : या कलाक्रुतीतील (डोंबल!) सर्व घटना आणि पात्रे वास्तव असली, तरी मिपाच्या कोणत्याही सभासदांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसण्याची दाट शक्यता आहे. या लेखनाच्या वाचनानंतर कोणतीही जिवंत व्यक्ती म्रुत झाल्यास, तो निव्वळ योगायोग (किंवा त्याचा भोग!) समजावा.
--------
डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, इत्यादी इत्यादी वाहिन्यांवरून अनेकविध माहितीपर कार्यक्रम, उपक्रम चालू असतात म्हणे दिवसरात्र. मी कधी फिरकलो नाही तिकडे. परवा सहज सकाळी टीव्ही लावला आणि जो चॅनेल लागला होता, तो पाहून एकदम सर्दच झालो.