मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

काव्यप्रसववेदना

आपला अभिजित ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सूचना ः या कवितेतील (अस्मादिक सोडून) सर्व पात्रे, कल्पना, घटना, प्रसंग काल्पनिक असून, त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही.

"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!

छोटा डॉन ·
नमस्कार मंडळी, नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ? अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...! असो. आपला आज "तो विषय" नाही ... सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत.

(चिकट सकाळ)

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनविषय:
खरं तर मी कधीच चहा पीत नाही, बनवत तर त्याहून नाही. पण एकदा चुकून पहाटे उठलो. मस्त थंडी होती. गरम चहाचा मूड आला. अर्धवट झोपेत एक कप चहात ४-५ चमचे साखर पडली. पहिल्या घोटातच झोप उतरली. मग बराच वेळ तो कप तसाच ठेवला होता. पुढचा घोट घ्यायची हिंमत होत नव्हती . तेवढ्यात चहासाखरेचे डबे वर कपाटात ठेवताना कपाला धक्का लागून तो कलंडला, तो चिकट चहा ओट्यावरून ओघळला आणि मी संकटातून वाचलो.

शिंडीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ईथे द्या

शंकरराव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप... शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ... ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-) (अधिक भेटवस्तू सुचवाव्या) शिंडीबाई कोण ? ? ईथे बघा http://www.misalpav.com/node/265

फुस्स् ऽऽऽ

शक्तिमान ·
लेखनविषय:
        फुस्स् ऽऽऽ     अखेर माझ्या सायकलच्या जीर्ण टायरने पुण्यातील रस्त्यांसमोर शरणागती पत्करली (यात नवीन काहीच नव्हते). परंतु या शरणागतीमुळे एक गोष्ट माझ्या पथ्यावरच पडली... कधी नव्हे ते क्लास बुडवायची नामी संधी चालून आली होती. आणि "opportunity knocks the door once" या सुप्रसिद्ध वचनाला अनुसरून मी ती संधी गमवायचा मूर्खपणा अजिबात केला नाही.     मी माझी सायकल घेऊन आपल्या नेहमीच्याच सायकल मार्ट मध्ये गेलो. मी घडलेला सगळा प्रसंग तेथील माणसाला सांगितला.

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

आनंद घारे ·
लेखनप्रकार
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.

विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे. पान क्र. १. आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो.

स्पेशल इफेक्ट!

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
टीप : या कलाक्रुतीतील (डोंबल!) सर्व घटना आणि पात्रे वास्तव असली, तरी मिपाच्या कोणत्याही सभासदांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसण्याची दाट शक्यता आहे. या लेखनाच्या वाचनानंतर कोणतीही जिवंत व्यक्ती म्रुत झाल्यास, तो निव्वळ योगायोग (किंवा त्याचा भोग!) समजावा. -------- डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, इत्यादी इत्यादी वाहिन्यांवरून अनेकविध माहितीपर कार्यक्रम, उपक्रम चालू असतात म्हणे दिवसरात्र. मी कधी फिरकलो नाही तिकडे. परवा सहज सकाळी टीव्ही लावला आणि जो चॅनेल लागला होता, तो पाहून एकदम सर्दच झालो.

उभ्या उभ्या विनोद (अर्थात स्टँड अप कॉमेडी)

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
मिपाकर मित्र/मैत्रिणींनो.... न्यू जर्सीतील आम्हा काही जणांचा एक उभ्या उभ्या विनोद करणारा संघ आहे :) मध्यंतरी आम्ही महाराष्ट्र फाऊंडेशनच्या निधी उभारणी साठी साधारण सव्वा तासाचा एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाची क्षणचित्रे 'तू नळी'वर उपलब्ध आहेत. ह्या ध्वनि-चित्रफितीमधे चुकून माझे नाव 'सुरेश' असे दिसते पण नवीन चित्रफीत मिळाली की हा दुवा बदलीन. सादरकर्ते -- अनुक्रमे --
  • शुभदा कामेरकर
  • प्रशांत गिजरे
  • सुरेश जोशी
  • वैशाली फणसे
  • विनय देसाई
  • अस्मादिक !!!
तर

विनोद - देव आजारी आहे(देवाची तब्येत ठीक नाही.)

विनोद कोकने ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विनोदः-आज्जी आज देव पुजेची घन्टी हळुहळु वाजव. आज्जी: का रे विनु? विनोदः-देवाची तब्येत ठीक नाही वाट्त. आज्जी: चुप काहीतरी बड्बडु नको. विनोदः-काहीतरी नाही , खरच सा॑गतो.अग शेजारचे Doctor म्हणे देवाघरी गेले.