मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

चौक न्हाण

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेळ पहाटे साडे चार वाजता.. स्थळ : महाराष्ट्रातील / विदर्भातील/ मराठवाड्यातील कुठलेही एक घर पण या घराचं वैशिष्ठ्य असं की या घरातल्या सु(?)पुत्राचं लग्न ठरलेलं आहे. आज सकाळी त्याचा चौक न्हाणाचा कार्यक्रम आहे. चौक न्हाण म्हणजे काय ते मला वाटतं स्पष्ट करण्याची गरज नाहीये. बहुतेक मराठी माणसाला (विशेषत: विवाहित व्यक्तीला चौक न्हाण हा शब्द चांगलाच माहीत असतो.) तरीही काही अज्ञानी पुरुषांसाठी म्हणुन सांगतो. आयुष्यभर येता जाता मोठ्या भावाच्या टपल्या, बोलणी , मार, शिव्या वगैरे वगैरे खाल्लेल्या लहान बहिणींसाठी या सगळ्यांचा वचपा काढायची सुवर्णसंधी म्हणजे चौक न्हाण.

आमने सामने

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सदर लेख हा फक्त मौजमजा आणी मिपाकरांना थोडेसे हास्य क्षण द्यावेत म्हणुन लिहिला आहे. लेखात ज्या ज्या मिपाकरांची नावे आली आहेत त्या पैकी एकाचीही मी ह्या साठी परवानगी घेतलेली नाही. ह्या लेखा मागच्या भावना समजावुन घेउन तुम्ही मला माफ कराल असा मनात विश्वास (म्हणजे आपले पानिपत होणार नाही) आहे. ह्या लेखात झालेल्या उल्लेखानी कोणी दुखावले गेल्यास मी त्याची आधीच जाहिर माफी मागत आहे.

नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या एका नविन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा.मिपावर गेल्या वर्षभरात बरेच नविन प्रयोग वाचायला -बघायला मिळाले.एक कमतरता कायम वाटत होती ती म्हणजे व्यंगचित्रांची.चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत असे वाटत होते.आजचा प्रयोग आहे तो ही पोकळी भरून काढण्यासाठी.मला आवडलेली बरीचशी व्यंगचित्रे मी संग्रहात ठेवली आहेत. यापैकी काही व्यंगचित्रे आपल्यापुढे ठेवतो आहे.या कलाकृती माझ्या नाहीत.बर्‍याचशा इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.मला अपेक्षीत आहे तो प्रयोग असा. जुने व्यंगचित्र नविन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे नविन आवाजात रेकॉर्ड करतात तसेच.

होळी विशेष वृत्तांत ..

बामनाचं पोर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
होळीच्या निमित्ताने आमचा विशेष वृत्तांत... सर्व वाचकांना होळीच्या मनापासुन शुभेच्छा !! १) चांद्रयानला अभुतपुर्व प्रतिसादामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशापूढील सर्व प्रमुख प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा आहेत. चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाहुन कृतकृत्य झालेल्या काही बांधकाम व्यवसायीकांनी स्वता:हुन मुंबईतल्या सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. चांद्रयानने पाठवलेल्या चित्रफीत भारतात खेड्या-पाड्यात सामुदायीकपणे दाखवल्या गेल्या. यावेळी गावकरयांनी अभुतपुर्व एकी दाखवुन आपसातले सर्व तंटे मिटवले ( चंद्राच्या साक्षिने) . " तंटमुक्त गाव" योजना एका रात्रीत पुर्णत्वास गेली आहे.

मनाच्या कुपितले-जर्नल

विनायक पाचलग ·
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख. हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.

एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)

भडकमकर मास्तर ·
लेखनप्रकार
एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्‍या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद.... _____________ मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्‍या आहेत.. म्हणजे? भोचक प्रश्न कमी विचारतात.. असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची... जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात... ओके.. तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही... असू दे.. मला सवय आहे.. हे बघ, ती जी दिसतेय ती ... कोण? अगं, ती काय...पैठणी घातलेली... हॅ..ती काय पैठणी आहे होय? नसेल मग..