सामना (२)
( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.)
स्वागत समारंभ असो,निरोप समारंभ असो वा बाररुम मधला कार्यक्रम,कुमठेकरांनी बोलण्याची ठराविक पध्दत विकसित केली होती.न्यायाधीश,त्यांचे समाजातील स्थान,त्यांचे न्यायालयातील आणि न्यायालयाबाहेरील वर्तन कसे असावे यावर श्रोत्यांचे किमान पाच मिनिटे प्रबोधन केल्याशिवाय मुळ विषयाकडे त्यांची गाडी वळत नसे.तो प्रबोधनाचा भाग,त्यातील उदाहरणांसह,बहुतेकांना पाठ होता.
त्यामुळे तो संपेपर्यंत बहुतेक सर्वजण आपण फार लक्षपूर्वक ऐकतो आहोत असे भासवत,आपापल्यातच मग्न ह