कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ
प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन
काल आम्हीही पाठवला
मुद्दाम तयार केलेला एक मेघ
प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता.
काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर?
आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच!
व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ.
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल.
त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे,
बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे.
तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा,
तो तुला काय कामाचा?
आम्ही तो घेऊन दुषीत करा
मेंदूचे संशोधक असे सांगतात की, मानवाच्या मेंदूचे जे प्रमुख भाग असतात, (लोब) त्यात पुढील मेंदू (फ़्रंटल लोब) व मागील मेंदू (टेंपरल लोब) ह्यांचे कार्य फार महत्वाचे असते. गोरीला, जावा मानव, व आधुनिक मानव ह्यांच्या मेंदूचे आडवे छेद घेऊन अभ्यासल्यास असे दिसते की, त्यांच्या टेंपरल लोबमधे फारसा फरक नाही; पण पुढील मेंदू जावा मानवात गोरीला पेक्षा मोठा आहे. परंतू आधुनिक मानवाच्या पुढील मेंदूचा आकार जावा मानवाच्या पुढील मेंदूपेक्षा दखल घ्यावी इतका मोठा आहे.
इस्रोचे अभिनंदन
काल ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविलल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) अभिनंदन.
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण झाले. ओशनसॅट-२ उपग्रहाबरोबरच जर्मनीचे चार छोटे उपग्रह, तुर्कीचा एक व स्वित्र्झलडचा एक असे एकूण सहा उपग्रह अवकाशात एकाचवेळी सोडले गेले. एप्रिल २००८ मध्ये इस्रोने एकाचवेळी दहा उपग्रह एकाचवेळी सोडून एक जागतिक विक्रम केलेला आहे.
इस्रोचे पुन्हा एकादा अभिनंदन!
(सतत निगेटिव्ह बातम्या वाचाव्या ऐकाव्या लागतांना असल्या बातम्या म्हणजे एक 'सिल्व्हर लायनिंगच' आहे. )
आंतरिक शक्तीचा शोध
७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या?
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४
मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट
मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती
२६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती.
भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत
या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग.
भंगार भरणे: पहा आकृती १ व २
आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते.
स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.
पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.
'क्रोम'
गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :)
गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्या वैयक्तिक संगणकांसाठी आहे.