Skip to main content

विज्ञान

उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 20/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आपण सगळेच आकाशातली एक 'स्पेशल' गोष्ट पाहून खूप खूष व्हायचो आणि लगेच डोळे बंद करून काहीतरी 'स्पेशल' मागायचो! आठवतंय का काय होती ती स्पेशल घटना? करेक्ट! आपण त्याला म्हणायचो 'तारा तुटला'. तुटणारा तारा ही इतकी विशेष घटना असायची की ते पाहिल्यावर काहीतरी बाप्पाकडे 'विशेष' मागायचं, आणि ते कधी खरं होईल याची वाट पाहत बसायचं. अर्थात असं काही व्हायच्या आधीच अजून एखादा तुटणारा तारा दिसायचा आणि अजून काहीतरी मागणं व्हायचं. असंच नाचत बागडत मोठे झालो, जरा थोडीफार अक्कल आली आणि यातला मजेचा भाग मागे पडून काही मस्त गोष्टी समजल्या. त्यातली पहिली भ्रमनिरास करणारी गोष्ट म्हणजे तारा कधीही तुटत नाही.

बिच्चूची गोष्ट

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 18/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(मनोगतावर पुर्वी प्रकाशित झालेली माझी ही कथा इथे पुनर्प्रकाशित करीत आहे.) बिच्चू सकाळी ठरलेल्या वेळी जागा झाला तेव्हा नेहमीप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला आई बाबा नव्हते. त्याना नेहमीच मालक-मालकीणबाईंच्या आधी उठावं लागे. जाग आल्याबरोबर बिच्चू छोट्या मालकीणबाईंच्या खोली कडे चालू लागला. किचनमधून जाताना त्याने आईकडे पाहिले तेव्हा ती ब्रेकफास्टची तयारी करत होती. तिने एकदा बिच्चूकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात गढून गेली. छोटासा बिच्चू तुरुतुरू चालत छोट्या मालकीणबाईंच्या खोलीच्या दाराशी पोचला. त्यांना उठवायची वेळ जवळजवळ झालीच होती.

अथ धूमकेतुपुराणं!

लेखक असुर यांनी शुक्रवार, 06/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
धूमकेतू हे नाव ऐकल्यावरच कसलं 'लै भ्भारी' वाटतं ना. धूमकेतू ही चीज आहेच मुळी त्याच्या नावाप्रमाणेच! भन्नाट वेग, आसमानात उधळलेल्या खोंडाप्रमाणे बेगुमान फिरायची हिम्मत आणि समोर येईल त्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य! मग भले समोर येणारे गृहस्थ हे 'गुरु' सारखे दिग्गज ग्रह असोत, किंवा स्वत: सूर्यनारायण असोत, 'आम्हा काय त्याचे' असं गात हा धूमकेतू आसमंतात भटकत असतो. धूमकेतू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर 'हॅले'चा धूमकेतू येतो.