"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने
भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत
या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग.
भंगार भरणे: पहा आकृती १ व २
आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते. खालील चित्रात भंगार ग्रॅब बकेटमधून भंगारबादलीत पडत आहे.
आकृती २: भंगाराच्या गोदामातून ते भंगाररथावर ठेवलेल्या भंगाराच्या बादलीत (Scrap bucket) भरले जाते व ते भरतांना वेगवेगळ्या जातीचे भंगार योग्य प्रमाणात मिसळले जाते. त्यासाठी भंगाररथावर load cells द्वारा वजन करण्याची सोय असते. (पहा आकृती-३)
आकृती ३: वरच्या चित्रात लोड सेल असे लिहिलेले आहे ते वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.
भरलेली भंगारबादली यारीच्या सहाय्याने उचलून भट्टीवर धरली जाते. या यारीला दोन हूक असतात. आमच्या यारीचा मोठा हूक ६५ टन तर छोटा हूक ३० टन वजन उचलू शकतो. मोठ्या हूकने उचललेल्या भंगारबादलीचा खालचा भाग दोन फाळक्यांचा असतो व छोट्या हूकच्या सहाय्याने ते फाळके फाकून त्यातून भंगार भट्टीत पडते. (पहा आकृती-४)
आकृती-४ (वर)
भट्टीत भंगार घालताना खूप ज्वाला बाहेर पडतात. कधी-कधी छोटासा स्फोटही होतो. त्यामुळे भट्टीत भंगार घालताना कुणालाही बाहेर उभे रहाण्याची अनुमती नसते.
८० टन पोलाद बनविण्यासाठी साधारणपणे ८७ टन भंगार लागते व ते ३ किंवा ४ बादल्यांत भरले जाते.
मग विजेच्या आर्कच्या सहाय्याने सर्व भंगार वितळविले जाते. त्याचवेळी पाईपच्या सहाय्याने प्राणवायू (Oxygen) ही फुंकला जातो (inject) व कार्बनची पावडरही फुंकली जाते (inject). या दोन्ही एकाच वेळी केलेल्या प्रक्रियांमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी होतो. हल्ली आम्ही सुपरसोनिक वेगाच्या oxygen co-jet चे बर्नर्स लावले आहेत त्यामुळे विजेचा खप खूप कमी झाला आहे. (पहा आकृती-५)
आकृती ५: भट्टी चालू असताना. भंगार पूर्णपणे वितळून १६०० डिग्री सेल्सियसचे तपमान व साधारणपणे सोयीचे रासायनिक पृथक्करण मिळाल्यावर भट्टीतून पोलाद डाबूत ओतले जाते. (पहा आकृती-६)
आकृती ६: टॅपिंग ८० टन पोलाद ३ मिनिटात "इकडून तिकडे"! अग्निरथावर आरुढ डाबू मग लेडल फर्नेसखाली नेला जातो.
तिथेही विजेच्या आर्कच्या सहाय्याने पोलाद पुन्हा एकदा गरम केले जाते, त्याचे रासायनिक पृथक्करण करून "तिखट-मीठ" घातले जाते. (त्यांना Ferro-Alloys म्हणतात)
मॅंगनीज, सिलिकन, कार्बन त्यात योग्य प्रमाणात मिसळून, पोलादातील गंधक काढून व त्याचे तपमान साधारणपणे १६०० डिग्री सेल्सियसपर्यंत आणले जाते.
त्यानंतर डाबू टरेटवर (Turret) नेला जातो. (पहा आकृती-७)
डाबू टरेटवर ठेवून एका intermediate vessel वर (त्याला टंडिश म्हणतात) आणला जातो. या भांड्यात पोलादाची एक धार पाच धारात विभागली जाते व त्या पाच धारा पाच मोल्डसमध्ये ओतल्या जातात. (पहा आकृती-८)
मोल्डमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी वापरले जाते. प्रत्येक मोल्डला दर ताशी ७० टन पाणी लागते, पण ते पुन्हा वापरले जाते (recycle).
मोल्डखाली स्प्रे असतात. त्यामुळे मशीनमधून बिलेट (कांब) बाहेर येते ती पूर्णपणे घनस्वरूपात (solid) होऊनच. (पहा आकृती-९).
कांबी पाची स्ट्रॅंडमधून येताना दिसत आहेत)
या कांबी गरमागरम अवस्थेत बाहेर येतात व त्या हव्या त्या लांबीच्या ऑक्सी-बर्शेन टॉर्चेसच्या मदतीने कापल्या जातात.
कटिंग टॉर्चेसने कापणे नीट दिसणे शक्य नाही. नुसता प्रचंड उजेड दिसतो. खाली पहा
बाहेर आलेल्या कांबी नंतर cooling bed वर जातात
आणखी एक दृश्यः
आणखी एक दृश्यः
आणखी एक दृश्यः
व तिथून त्या रोलिंग मिलमध्ये जातात.
चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेतली आहे, तरी पण लिहिता-लिहिता झालेल्या चुका लक्षात आल्यावर दुरुस्त केल्या जातील. तरी क्षमस्व.
रोलिंग मिलबद्दल माहिती एक-दोन दिवसात!
तिथे या कांबी १५ ते १७ वेळा हळूहळू छोट्या केल्या जातात व सळ्या Cooling bed वर नेल्या जातात व तेथे त्या हव्या त्या लांबीत कापल्या जाऊन त्यांची बंडले बनविली जातात. (पहा आकृत्या-१०-१५)
आकृती २: भंगाराच्या गोदामातून ते भंगाररथावर ठेवलेल्या भंगाराच्या बादलीत (Scrap bucket) भरले जाते व ते भरतांना वेगवेगळ्या जातीचे भंगार योग्य प्रमाणात मिसळले जाते. त्यासाठी भंगाररथावर load cells द्वारा वजन करण्याची सोय असते. (पहा आकृती-३)
आकृती ३: वरच्या चित्रात लोड सेल असे लिहिलेले आहे ते वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.
भरलेली भंगारबादली यारीच्या सहाय्याने उचलून भट्टीवर धरली जाते. या यारीला दोन हूक असतात. आमच्या यारीचा मोठा हूक ६५ टन तर छोटा हूक ३० टन वजन उचलू शकतो. मोठ्या हूकने उचललेल्या भंगारबादलीचा खालचा भाग दोन फाळक्यांचा असतो व छोट्या हूकच्या सहाय्याने ते फाळके फाकून त्यातून भंगार भट्टीत पडते. (पहा आकृती-४)
आकृती-४ (वर)
भट्टीत भंगार घालताना खूप ज्वाला बाहेर पडतात. कधी-कधी छोटासा स्फोटही होतो. त्यामुळे भट्टीत भंगार घालताना कुणालाही बाहेर उभे रहाण्याची अनुमती नसते.
८० टन पोलाद बनविण्यासाठी साधारणपणे ८७ टन भंगार लागते व ते ३ किंवा ४ बादल्यांत भरले जाते.
मग विजेच्या आर्कच्या सहाय्याने सर्व भंगार वितळविले जाते. त्याचवेळी पाईपच्या सहाय्याने प्राणवायू (Oxygen) ही फुंकला जातो (inject) व कार्बनची पावडरही फुंकली जाते (inject). या दोन्ही एकाच वेळी केलेल्या प्रक्रियांमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी होतो. हल्ली आम्ही सुपरसोनिक वेगाच्या oxygen co-jet चे बर्नर्स लावले आहेत त्यामुळे विजेचा खप खूप कमी झाला आहे. (पहा आकृती-५)
आकृती ५: भट्टी चालू असताना. भंगार पूर्णपणे वितळून १६०० डिग्री सेल्सियसचे तपमान व साधारणपणे सोयीचे रासायनिक पृथक्करण मिळाल्यावर भट्टीतून पोलाद डाबूत ओतले जाते. (पहा आकृती-६)
तिथेही विजेच्या आर्कच्या सहाय्याने पोलाद पुन्हा एकदा गरम केले जाते, त्याचे रासायनिक पृथक्करण करून "तिखट-मीठ" घातले जाते. (त्यांना Ferro-Alloys म्हणतात)
वर्गीकरण
मी कांहीं व्हीडियो चित्रणही केले आहे
In reply to मी कांहीं व्हीडियो चित्रणही केले आहे by सुधीर काळे
तुम्ही यु
फार
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
थर्मल
"कार्टून" पाहिल्यासारखीच ही "चित्तरकथा" (वाचण्याऐवजी) पहावी
छान सहल घडली
In reply to छान सहल घडली by धनंजय
असेच म्हणतो
छान सहल !!!
In reply to छान सहल !!! by sujay
+१
माहीतीबद्
In reply to माहीतीबद् by रेवती
सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयोजन आहे
छानच माहिती आहे!
In reply to छानच माहिती आहे! by चतुरंग
काळेसाहेब
In reply to काळेसाहेब by नितिन थत्ते
थत्तेसाहेब, एकदम बरोबर!
सही फोटो
In reply to सही फोटो by पाषाणभेद
दूरून साजरे का?
छान
सुरेख
In reply to सुरेख by एकलव्य
इमारती बांधण्याच्या उद्योगाच्या मागणीवर अवलंबून
In reply to इमारती बांधण्याच्या उद्योगाच्या मागणीवर अवलंबून by सुधीर काळे
धन्यवाद!
चांगली माहिती
अभिनंदन
छान सफर
In reply to छान सफर by ऋषिकेश
अवांतर
In reply to छान सफर by ऋषिकेश
चित्रसफर
पोलादी वर्णन...
काळे
In reply to काळे by अमोल केळकर
री-बार
साक्षात
सुधीरदादा म्हटलं तर चालेल का?
In reply to सुधीरदादा म्हटलं तर चालेल का? by पारंबीचा भापू
अजुन एक
In reply to अजुन एक by सहज
:)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to :) by नंदन
नवा सिद्धांत
In reply to अजुन एक by सहज
छा ! काही
In reply to अजुन एक by सहज
दुर्दैवाने हे खरे नाही
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
अपलोड करायला टाकलेत सकाळधरनं.....!
In reply to अपलोड करायला टाकलेत सकाळधरनं.....! by सुधीर काळे
जरुर. लेख
लेख आवडला
In reply to लेख आवडला by अर्चिस
आधी रोलिंगचा "धडा" लिहून काढतो
वा, सुधीरभाऊ
एक गोष्ट कुणाच्या लक्षात आली का?
एकंदर आमच्या आवाक्याबाहेरचं प्रकरण
दुरून
In reply to दुरून by नितिन थत्ते
अगदी लहन १० टनी भट्टीला नसेल.....
फोटो आणि
In reply to फोटो आणि by स्वाती२
धन्यवाद
छान लेख
In reply to छान लेख by आनंद घारे
धन्यवाद
अभिनंदन!!
In reply to अभिनंदन!! by डॉ.प्रसाद दाढे
मी मालक नाही!
In reply to मी मालक नाही! by सुधीर काळे
मी सध्या
In reply to मी मालक नाही! by सुधीर काळे
मी सध्या
In reply to मी सध्या by अमोल केळकर
अमोल!
In reply to मी सध्या by अमोल केळकर
अमोल!
In reply to अमोल! by सुधीर काळे
व्य. नी.
स्टिल क्षेत्राबद्द्ल आणखिन वाचायला आवडेल
कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे!
In reply to कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे! by नरेंद्र गोळे
असा मनसुबा नव्हता
In reply to कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची पद्धत अभिनव आणि स्तुत्य आहे! by नरेंद्र गोळे
कारकीर्द "दैदिप्यमान" वगैरे काही नाही, ४५ वर्षे पाट्या टाकल्या!