Skip to main content

विडंबन

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 09/05/2024 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.

कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं...

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/04/2024 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
जंग जंग पछाडले शब्द नाही फुटला सरकारी यंत्रणांना दरदरून घाम सुटला मीच करणार राज मीच रहाणार चिफ माझाच पट, माझीच चीत मज द्या न द्या रिलीफ मला नाही माहीत नाही मला आठवत सरकारी यंत्रणांना हे का नाही कळत मी नाही काही केलं ज्यांनी केलं त्यांना बोला सरकारी यंत्रणेला आम आदमीचा टोला बघू आता पुढं काय होतय कोण दळण दळतयं आणी कोण पिठ खातयं

बेतुक्याचे चर्हाट.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 22/03/2024 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्षापुर्वी वळलेले चर्हाट...... https://misalpav.com/node/51141 आता पुढे. K-जरी चंचल,चपळ मासोळी लावली जाळी, तरी न लागे गळी खेळतसे जळी, धीवरा संगे खेळतसे रडीचा डाव धीवरा न देतसे भाव आता करू काय उपाव धिवर म्हणे.... धीवरे घातले साकडे वाचून आकडे, प्रार्थना केली मिटला संदेह,सुटला आदेश वाढले बळ, हलले दळ सत्वर पातले धीवर यमुना जळी खेळ रंगला यमुनातीरी "रापण", करण्या फेकली जाळी ओढला किनारी K-जरी,लीलया शक्ती अपरंपार, धीवरा माजी न लागे पार जैसा ठाव जळापरी बेतुक्या म्हणे, -बेतुक्या राॅक्स.
काव्यरस

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 07/03/2024 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या कप्पाळीचे बिंब भासे मध्यान्हीचा भानू लल्लाटीच्या लाटा बघुनी 'उन्हाळी', लागते गं जानू नाही गंधार कोमलं, करपले मन नुस्ताच विषाद नाच नाचता नाचता आता धपापतो ऊर जुनेरले नाते आपुले आता कुठवरं पाळू वयमान पाऊणशे अवघे, आता तरी नको छळू प्रारब्धाचा खेळं विळ्या भोपळ्याचे नाते दिनरात अशी साथ कधी सरेल जन्मठेपेचा काळं?

डासबोध

लेखक रम्या यांनी मंगळवार, 27/02/2024 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
गालावरी हसू, मुखावरी दाढी । राजकारणे गुढी, बांधू पाहे ।। दाढीचे वजन, दाढीचेच भजन । करू आम्ही नमन, दाढीचेच ।। दाढीचाच फोटो, दाढीचीच मूर्ती । सांगावी अपकीर्ती, नेहरूंची ।। पाजू आमुचे रक्त, आम्ही अंधभक्त । करू मशागत, दाढीचीच ।। कपिला गाय, करोनिया माय । गळ्यातच पाय, आमच्याच ।। ईडीचाच टेकू, घेऊनिया फेकू । विरोधकांचे दमन, करू पाहे ।। जे का ईडीसी घाबरले, त्यांसी म्हणे जो आपुले । समीप येता म्हणावे, शुद्ध जाहले ।। चोरावे धनुष्य, लांबवावे घड्याळ । हाती द्यावे टाळ, जनतेच्या ।। प्राणप्रतिष्ठेचा कावा, विरोधकांचा चावा । दाढीतल्या उवा, ठेचू पाहे ।। मस्तवाल खोंड, पाळोनिया गुंड । निर्भयांचे तोंड, फोडू

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

लेखक निओ यांनी शनिवार, 09/12/2023 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

(कावळ्यांची फिर्याद-३)

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 08/10/2023 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२ मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते उडत,काही,पडत काही,तर काही, "नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळा

दोन लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 27/08/2023 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे.

मी पाऊस आणि कविता

लेखक मित्रहो यांनी रविवार, 20/08/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.