(कावळ्यांची फिर्याद-३)
लेखनविषय:
काव्यरस
https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद
https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२
मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू
वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू
त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते
पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते
उडत,काही,पडत काही,तर काही,
"नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते
तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे
अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे
नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळाची खीरं
आम्हांला पण मन आहे,आम्हींतरी कुठवरं धरावा धीर
तीच ती रव्याची पोळी,आताशा,पितरं सुद्धा त्रास देतात,
पनीर टिक्का,देसी चायनीज,असे काहीतरी
आणा म्हणतात
सत्य गेले,त्रेता,द्वापार गेले, माणूसही कलियुगी बदलला
बदलली सृष्टी,बदला आम्हांसही, साकडे परमेश्वरी घाला, .....
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा.....
वाचने
5415
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
झणझणीत. काव काव.
कवी तपस्वींची पुन्हा एकदा
मस्त एकदम.
खरचं....
In reply to खरचं.... by कर्नलतपस्वी
देख तेरे संसार की हालत क्या
ओकांरेश्वर घाटावर
पुण्यात माझ्या घराकडे बरेच
In reply to पुण्यात माझ्या घराकडे बरेच by अमरेंद्र बाहुबली
चांगली कल्पना आहे
In reply to चांगली कल्पना आहे by राजेंद्र मेहेंदळे
खीक्क. त्यासाठी
In reply to चांगली कल्पना आहे by राजेंद्र मेहेंदळे
पोपट
In reply to पोपट by राजेंद्र मेहेंदळे
व्वा. छानच की.
:=)