सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा.
आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल.