काही प्रसंग.
वेळ: तुमच्या मनात येईल ती …
स्थळ: तुम्हाला वाटते तेच.
प्रसंग पहिला
सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात.
एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं
दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं. पण मला तर बाई आगदी सुरवातीला त्यांनी गाइलेला बिहाग प्रचंड आवडला पण मनाला भिडला अगदी
तिथेच दोन रांगा पुढे काही साधारण नुकत्याच इंजिनियर होऊ घातलेल्या चार दोन तरुणी आणि त्यांच्या पुढे पाठीमागे घोळणारे तरुण . त्यातील एक अमुक पंडितजींच्या तमुक शिष्याकडे तबला शिकतो त्यामुळे त्याला काही जास्त कळतं असा सर्वांचा समज आहे. तो तरुण मधूनच मांडीवर तबला वजवतो.
तरुण: बोहोत खूब . मालिनी ताई आज खूपच सुरेख गाईल्या. सुरुवातीचा नंद किती कंटाळवाणा होता पण.
एक तरुणी: (कौतुकमिश्रित चेहेर्याने त्याच्याकडे पाहत) हो ना . मलाही ना किती आवडला त्यांच गाणं. आपलं मत कायम एक असतं.
तिसरा : अरे चला चला बटाटेवडे संपतील.ते आधी महात्वाचे चला चला इथेच घेऊन येऊ .
ए हो रे परत असे पुढच्या वर्षीच खायला मिळतील.
थोडक्यात असले 'महोत्सव' इथेच घडतात . व भरपूर श्रोतेहि मिळतात.
................................................................................................
प्रसंग दुसरा
किती सुंदर होत्या हो कविता . ती 'सये ग सये तुझ्हेच तुला कळेना कसे' हि कविता नवीन होती नाही.
हो ना. दमलेल्या आज्जी च्या गोष्टीची पण. मला तर नं कायम रडू येतं. तू आज रडत नव्हतीस ते ?
नाही गं मी आज अंतर्मुख झ्हाले ती कविता ऐकून. तुला माहित्ये एक मुलगा तर चक्क हसत होता त्यावेळी.
शी. असे आरसिक लोकच वाट लावणार आपल्या भाषेची. डोळ्यात आसवं आलीच पाहिजेत गं. ते जुने कवी कसले दुर्बोध लिहायचे ग . हा कसा लिहितो सरळ, सोपं आयुष्यावरच.'असल्या कवींना ' समजून घेणारे आपणच गं
हो गं हो
................................................................................................
प्रसंग तिसरा
मग कसं वाटलं ?
कसं वाटलं ? काय साला भेनXX. साला यार तु तंदूर खायला नेतो म्हणून गल्ली बोळातून फिरवतो आणि तंदूर देतो ती पण असली ? यार तू नदी म्हणून नाला दाखवतो चौपाटी बरी त्यापेक्षा.
नाही पण अरे आम्हीही तंदुरी खातो. आम्हीही असले खातो आणि आम्हीही सर्व गोष्टी करून बसलो आहोत हे इथे दाखवावेच लागते नाहीतर तोही आजकाल फाउल धरतात. आम्ही जे करतो तेच खरे असते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इथे बकालपणा नाही. इथे ती लोकल ची गर्दी नाही .तुम्ही फक्त नवे ठेवा. तुम्हाला काय समजते
अरे यार काय बोलतोय तू यार लोकल काय गर्दी काय . आम्हाला कसलाही त्रास नाहीये. ए पक्या समजाव ना याला .
पक्या : ते समजावण्याच्या पलीकडे गेलेत.
....................................................................................................
प्रसंग चवथा
चला चला दुकान बंद व्हायच्या आत मिठाई आणू .
अरे पण गरज त्याला का तुला . १०० दुकानं आहेत
नाही एखाद्या फालतू गोष्टीचा उदो उदो कसा होईल मग
तर असे अनेक प्रसंग … ज्वलंत प्रसंग … जिवंत प्रसंग… याच स्थळी … नक्की भेट द्या. !!
वाचने
6372
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा पुणे
किंवा ...
In reply to पुन्हा पुणे by कपिलमुनी
किंवा
In reply to किंवा ... by सुनील
भांडे का बदलता???
In reply to पुन्हा पुणे by कपिलमुनी
सहमत.
हम्म्
__/\__
In reply to हम्म् by एस
तिसरा प्रसंग नीट उमगला नाही
+१
In reply to तिसरा प्रसंग नीट उमगला नाही by मनीषा
.
In reply to +१ by बॅटमॅन
सर्वश्री ब्याटम्यान यांच्याशी
अरे यार काय बोलतोय तू यार
पण मला एक कळत नाही मुंबैच्या
In reply to अरे यार काय बोलतोय तू यार by मृत्युन्जय
बॅटोबा
In reply to पण मला एक कळत नाही मुंबैच्या by बॅटमॅन
बास का नाखुकाका
In reply to बॅटोबा by नाखु
अरे यार काय बोलतोय तू यार
In reply to पण मला एक कळत नाही मुंबैच्या by बॅटमॅन
की मुंबैचे पुणेरीकरण झालेय???
In reply to पण मला एक कळत नाही मुंबैच्या by बॅटमॅन
हाहाहाहा
स्थळ साम्य
भारीच