मातृभाषा

तू काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत हळूहळू लिहित जातोस, तेव्हा मी तुझे राजस हात लोभस डोळे पहात राहते. तुझ्यात इतका जीव का गुंतावा? तू माझ्या हातांचे देवनागरी चुंबन घेऊन म्हणावे, मातृभाषा कि काय तिच्यातच जीव अडकतो बघ, आई गंssss म्हटल्याशिवाय प्राणसुद्धा जात नाही.... शाईचे बोट धरुन तू परत रात्रीच्या शांतप्रहरी काना, मात्रा, विलांटी, शिरोरेखा घेऊन माझ्या वहीत तुझेमाझे हितगुज हळूहळू लिहित राहतोस... शिवकन्या

जागतिक मराठी भाषा गौरव दिन (आवाहन)

लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेली २ वर्षे आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती. प्रमाणभाषेबरोबरच पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन संवर्धन करणे ही त्यासाठी आपली जबाबदारी आहे. २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

ग्रामीणांचा आहार

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा.

पुरस्कार वितरण सोहळा

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार ! महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सांयंकाळी ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्या जवळ मुंबई ४०० ०२१ येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मला देरसू उझाला या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्वांना माझे आग्रहाचे निमंत्रण. आपला, जयंत कुलकर्णी.

धोकेबाज

लेखनविषय:
प्रिय आई, काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

द्वा सुपर्णा

लेखनविषय:
लेखनप्रकार
द्वा सुपर्णा ब्रह्म (परमात्मा) व प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा यांचे एकमेकाशी असलेले संबंध काय ? हा भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो. ब्रह्म एकमेवाद्वितीय तर प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा तर विविध रुपात दिसतो. यातील संबंधांचा उकल करण्याचा प्रयत्न ऋग्वेदापासून झालेला दिसतो. पुढे उपनिषदांमध्ये याचा विस्तार झाला. {मनुस्मृतीवरील लेखावरून असे दिसते की काही वाचकांना संस्कृत श्लोक पाहिजे असतात. (देव या सुसंस्कृतांचे भले करो!) मी आज संस्कृत श्लोक देणार आहे. माझ्यापर्यंत पोचलेला अर्थही देत आहे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला. दुसरे दिवशी रात्री ‘क्लो ल्यूस’ या लिओनार्दोच्या प्राचीन निवासस्थानात खुद्द लिओनार्दो दा विंचीने मी त्याचा ‘लॉरेन्झो’ नामक पट्टशिष्य असल्याचे सांगून मला भूतकाळाच्या सफरीवर पाठवले… … या भागात ‘लॉरेंझो’ या माझ्या पंधराव्या शतकातील पूर्व- जन्माची हकीगत वाचा: लोरेंझो गेरार्दिनीची रोजनिशी : ( टोलेडो- स्पेन, ४ सप्टेंबर १४९२ ) मी लोरेंझो गेरार्दिनी .आजपासून मी रोजनिशी लिहिणे सुरु करत आहे.

गीताई माऊली माझी...

लेखनप्रकार
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

प्रवास

लेखनप्रकार
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....
Subscribe to वाङ्मय